Saturday, 7 October 2017

१) पहिले स्थान -लग्नस्थान :- या स्थाना वरून माणसाचे आयुष्य, रंग, उंची, रूप, स्वभाव, डोके, मेंदू या गोष्टी पहिल्या जातात. You २) दुसरे स्थान – धनस्थान :- या स्थाना वरून माणसाला मिळणारा पैसा, त्याचे डोळे, बोलणे, वाणी (मधुरता, कुटुंबातील व्यक्ती, त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात. ३) तिसरे स्थान -पराक्रम स्थान :- या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश, छोटे प्रवास, लहान भावंडे, हात, श्वसनसंस्था पहिली जातात. ४) चौथे स्थान -सुख स्थान :- या स्थानावरून प्राथमिक शिक्षण (10/12 पर्यंतचे) वाहनसुख, गाडी, बंगला, मालमत्ता, आई, माणसाचे मन, जमीन या गोष्टी पाहतात. ५) पाचवे स्थान -संतती स्थान/विद्या/महालक्ष्मी स्थान :- नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, उच्च शिक्षण, विवाह स्थळ, शेयर मार्केट,सट्टा बाजार, यश, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन, पाठीचा कणा या गोष्टी पाहतात ६) सहावे स्थान -रिपू स्थान :- या स्थानावरून आपले शत्रू , आजार, रोग, पोट, मामा, पाळीव प्राणी, कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात ७) सातवे स्थान –विवाह स्थान :- हे जोडीदाराचे स्थान आहे. जोडीदाराचे रंग रूप, स्वभाव, इत्यादी, शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात. ८) आठवे स्थान -मृत्युस्थान :- यावरून मृत्युच्या वेळची परिस्थिती, गुप्तधन, वारसा हक्काचे धन, गुप्त गोष्टी पहिल्या जातात. ९) नववे स्थान – भाग्य स्थान/ पुर्व जन्म कर्म स्थान/ धर्मस्थान :- या वरून दूरचे प्रवास, यात्रा, धार्मिक गोष्टी, न्यायखाते, उपासना, नातू,पणतू (मुलाचे मुल), पाय या गोष्टी पाहतात. १०)दहावे स्थान -कर्मस्थान :-  पिता, व्यापार, व्यवसाय, माणसाचा नोकरी धंदा, पदोन्नती, त्यातील यश, गुडघे या गोष्टी पाहतात . ११) अकरावे स्थान -लाभ स्थान/धन संचय स्थान :- या स्थानावरून वेगवेगळे लाभ, मित्र परिवार, कान या गोष्टी पाहतात, आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे म्हणून फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट च्या माध्यमातून सर्वाना एवढा मोठा मित्र परिवार मिळाला . १२) बारावे स्थान -व्यय स्थान :- या वरून परदेशी जाणे, हॉस्पिटल, जेल, गुंतवणूक, खर्च होणे या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात

No comments:

Post a Comment