Sunday, 17 September 2017

||रामरक्षा अशा पद्धतीने सिद्ध करा||

**         *||लेखांक १ ला ||* मी रामरक्षेवर लिखाण करावे अशी कांही वाचकांनी सुचवल्यामुळे आज मुद्दाम हा लेख साधकांकरिता लिहीत आहे. *नवरात्रात रामरक्षेचे अनुष्ठान असे करा.* अनुष्ठानाकरता  प्रामुख्याने दोन नवरात्राला *अनन्यसाधारण* महत्व आहे. *१) चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी पर्यंतचे रामनवरात्र व* *२) अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंतचे शारदिय नवरात्र.* या दोन्ही नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते. *या स्तोत्राचे अनुष्ठान कसे कराल?* प्रथम प्रतिपदेला सकाळी लवकर स्नान करुन धूतवस्त्र परिधान करा. कपाळाला मंगल तिलक लावावे.स्त्रीयांनी हळद कुंकु लावावे. आचमन करुन कुलदेवतेला नारळ विडा ठेवून गणपती , कुलदेवता, इष्ट देवतेला नमस्कार करा.आई वडिलांना नमस्कार करुन अनुष्ठान सुरु करा. श्री गणेशायनमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथुन सुरुवात करुन *रामनाम वरानने इथ पर्यंत म्हणून , *इति श्री बुधकौशिक* न म्हणता परत *चरितं रघुनाथस्य* इथुन सुरुवात करुन *रामनाम वरानने* इथ पर्यंत म्हणावे व पुन्हा *चरितं रघुनाथस्य* इथुन सुरुवात करावी अशा पद्धतीने अकरा वेळा रामरक्षा एका आसनावर एका स्थानावर ( जागा बदलुनये) म्हणावी.अकराव्या वेळेस इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं संपूर्णम्|| असे म्हणून संपवावे.अशा पद्धतीने नऊ दिवस दररोज अकरा वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते.दहाव्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी.एखाद्या ब्राम्हणाला भोजन व यथाशक्ति दक्षणा व वस्त्र दान करावे. *याच पद्धतीने राम नवरात्रात* अनुष्ठान करावे. रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते.अपघातात देहाचे रक्षण होते, कुठलिही बाधा बाधत नाही.अनुष्ठान सिद्ध झाल्यानतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावला की त्याला लागलेली दृष्ट उतरते . अनुष्ठान चालु असताना अकरा वेळा रामरक्षा म्हणून होई पर्यंत  कोणाशीही बोलु नये, कांहीही खावु नये , अभक्षभक्षण करु नये, अपेय पान करु नये, ब्रह्मचर्य पाळावे, परान्न घेवु नये, नवु दिवस व्रतस्त रहावे, सदाचरणाने वागावे. सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते. ||श्रीराम जय राम जय जय राम||  *रामरक्षेचा सखोल अर्थ पुढील लेखमालेत पाहु* *कृपया लेख पुढे पाठवताना नावासकट पाठवा.* राष्ट्रीय कीर्तनकार  *हभप.श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे* 7887534167

1 comment:

  1. Ghudhi padavyachya divashi fakta 11 vela ramraksha mhananyani kahi fayada hoto??

    ReplyDelete