Wednesday, 6 September 2017

*ज्योतिषशास्त्र* ---------------------- *बृहज्जातक*( मराठी ) *भाग : २* *💢राशींच्या दुसर्‍या काही संज्ञा* मेष -- किय, वृषभ -- तावुरि, मिथुन -- जितुमु, कर्क -- कुलीर, सिंह -- लेय, कन्या -- पाथोन, तूळ -- जूक, वृश्चिक -- कौपी, धनु -- तौक्षिक, मकर -- आकोकेर, कुंभ -- हद्रोग, मीन -- अंत्यभ अशा मेषादि राशींच्या आणखीं संज्ञा आहेत. ॥८॥ इं. क ( संबंध राशिचक्र ३६० अंशांचे, त्यांत १२ राशी म्हणून प्रत्येक राशि ३० - ३ असते ) प्रत्येक राशीचे सारखे ३ भाग केले असतां एक - एक भाग १५ अंशांचा होती अशा प्रत्येक भागास होरा असें म्हणतात. अर्थात् एका राशींत २ होरा असतात. क्षेत्र ( गृह ) होरा, द्रेष्काण, नवांश, द्वादशांश, त्रिंशांश अशा ( षड्वर्ग ) प्रकारांनी शुभाशुभफलांचा निर्णय करतात. ह्या ६ प्रकारांना शास्त्रकर्त्यांनी '' वर्ग '' असे नामाभिधान ठेवले आहे. '' होरा '' ही संज्ञा बहुधा सर्व ठिकाणी व सर्व ज्योतिषी राशीच्या अर्ध्या भागासच लावतात. क्वचित् लग्नासही लावतात असें ग्रंथकार म्हणतात परंतु तशी प्रथा कोठेंही आढळून येत नाही. हे ६ प्रकार अगर बर्ग ज्या राशीचा नावाचे असतात त्या राशीचा जो स्वामी ( अधिपति ) तोच त्या वर्गाचा अधिपति असतो. --------------------------------------------- 💢 *दिवाबली, रात्रिबली शीर्षोदयादी राशी* अर्थ -- मेष, वृषभ, धनु, कर्क, मिथुन आणि मकर ह्या राशी रात्रिबली व बाकीच्या दिवाबली समजाव्या. रात्रिबली लग्नास पृष्ठोदय राशी आणि दिवाबली लग्नास शीर्षोदय राशी म्हणतात. त्यांतील मीन व मिथुन हीं दोन लग्नें पृष्ठोदय व शीर्षोदय अशीं दुहेरी आहेत. म्हणून त्यांस उभयोदय अशी संज्ञा दिली आहे. -----------------श्रीधर------------------- *💢 होरा देष्काणादी सिद्धी* मेषादि बारा राशीपैकी ( १ - ३ - ५ - ७ - ९ - ११ ) ह्या विषमराशी असून त्यातील काही क्रूर ( उग्र ) आहेत व वृषभादि ( २ - ४ - ६ - ८ - १२ ) ह्या सम राशि असून त्यांतील वृश्चिक राशीशिवाय बाकी सर्व सौम्य स्वरुपाच्या आहेत. मेष, कर्क, तुला आणि मकर ह्या चर राशि होत. वृषण, सिंह, वृश्चिक आणि कुंभ ह्या स्थिर राशी समजाव्या. मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्या राशी पूर्वाधी स्थित व उत्तराधी चर असतात. म्हणून त्यांस द्विःस्वभावराशि म्हणतात. मेष, सिंह आणि धनु ह्या पूर्व दिशेच्या राशी होत. वृषभ, कन्या, मकर ह्या दक्षिण दिशेच्या; मिथुन, तुला, कुंभ ह्या पश्चिम दिशेच्या व कर्क, वृश्चिक, मीन ह्या उत्तर दिशेच्या राशी समजाव्या. त्यांचे जे अधिपती ते दिशाधिपति होत. मेषादि विषमराशींत पहिला होरा सूर्याचा व दूसरा चंद्राचा आणि वृषभादि समराशींत पहिला होरा चंद्राचा व दुसरा सूर्याचा, अर्थात् होराधिपति तेच ग्रह होतो. राशीचा जो स्वामी तोच ख्या राशीच्या पहिल्या द्रेष्काणाचा अधिपति. राशीपासून पांचव्या स्थानाचा जो अधिपति तो त्याच्या दुसर्‍या द्रेष्काणाच्या स्वामी आणि यापासून नवम स्थानाचा अधिपति तो त्याच्या तिसर्‍या द्रेष्काणाचा स्वामी असते. क्षेत्र - राशि - लग्न हें कुंडलींतील पाहिलें स्थान, त्यापासून पुढें बाराही स्थानें अनुक्रमानें समजावीं. त्यांना तनु, धन, सहज, सुहत् इत्यादि संज्ञा अनुक्रमानें आहेत. -----------------------श्री कु------------------- *💢 मतांतराने होराधिपती* पूर्वी होरानिर्णय सांगितला आहे व तो सर्वमान्य आहे. तथापि पहिला होरा लग्नाधिपतीचा व दुसरा एकादश - स्थानधिपतीचा, त्याचप्रमाणें पहिला द्रेष्काण लग्नाधिपतीचा, दुसरा द्वादश - स्थानाधिपतीचा व तिसरा एकादश -- स्थानाधिपतीचा असें क्वचित् -- कांही आचार्याचें मत आहे. परंतु तें प्रचारांत नाहीं. ॥१२॥ =======================💢 *श्रीधर कुलकर्णी* ९६६५६३२९५३

No comments:

Post a Comment