Wednesday, 22 November 2023

ll श्री शंकर ll आज प्रबोधिनी एकादशी तसेच तुलसी शालिग्राम ( श्रीकृष्ण ) विवाहll श्रीतुलसीस्तुती ll तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ १॥मनः प्रसादजननि सुखसौभाग्यदायिनि ।आधिव्याधिहरे देवि तुलसि त्वां नमाम्यहम् ॥ २॥यन्मूले सर्वतीर्थानि यन्मध्ये सर्वदेवताः ।यदग्रे सर्व वेदाश्च तुलसि त्वां नमाम्यहम् ॥ ३॥अमृतां सर्वकल्याणीं शोकसन्तापनाशिनीम् ।आधिव्याधिहरीं नॄणां तुलसि त्वां नम्राम्यहम् ॥ ४॥देवैस्त्चं निर्मिता पूर्वं अर्चितासि मुनीश्वरैः ।नमो नमस्ते तुलसि पापं हर हरिप्रिये ॥ ५॥सौभाग्यं सन्ततिं देवि धनं धान्यं च सर्वदा ।आरोग्यं शोकशमनं कुरु मे माधवप्रिये ॥ ६॥तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भयोऽपि सर्वदा ।कीर्तिताऽपि स्मृता वाऽपि पवित्रयति मानवम् ॥ ७॥या दृष्टा निखिलाघसङ्घशमनी स्पृष्टा वपुःपावनीरोगाणामभिवन्दिता निरसनी सिक्ताऽन्तकत्रासिनी ।प्रत्यासत्तिविधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपितान्यस्ता तच्चरणे विमुक्तिफलदा तस्यै तुलस्यै नमः ॥ ८॥ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

Thursday, 19 October 2023

दंतासुरमर्दिनी कुमारी अंबेजोगाई,भवानी अंबेजोगाई lभाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई ll धृ llदोन नेत्रीच्या निरांजनाने तुजला ओवाळूमाते तुजला ओवाळू lसत्कर्माचा धूप सुगंधित तुझ्यापुढे जाळू llतवपदकमली लीन निरंतर पावे झणी मातेमजला पावे झणी माते lधावत येई अघरराशीचा नाश कराया ते ll १ llसद् भावाच्या फुलं वेलीवर भक्ती फुले आलीमाते भक्ती फुले आली lवेचूनिया ती तव पदकमलावर प्रेम अर्पियली llतुझ्या कृपेने दैन्य दुःख ही लोपूनिया गेलेवर दे सौख्य घरा आले lशांतीसुखाने मानस माझे आनंदित झाले ll २ llयोगेश्वरी हे कुलस्वामिनी आशिर्वच द्यावामजला आशिर्वच द्यावा lतव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा llनारायण नतमस्तक चरणी प्रार्थितसे आईप्रेमे प्रार्थितसे आई lहृदयमंदिरी वास कराया यावे लवलाही ll ३ llही योगेश्वरी देवीची आरती बहुसंख्य चित्पावन घरात सकाळ संध्याकाळ म्हंटली जाते....बोडणाला, नवरात्रात, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही आरती म्हणण्याची पद्धत आहेच तसेच शकुनाची कामे करताना, वर्षाचे पापड घालताना, भात कांडताना, दळण दळताना, हळद करताना, इत्यादी शुभ कामे करतानाही ही आरती वेगळ्या वेगळ्या चालीत म्हंटली जाते...अंबेजोगाई ला ' धन्य अंबापुर ' ही आरती म्हणण्याची पद्धत आहे...ती स्थान वर्णन करणारी आरती आहे...आणि ही भाव व्यक्त करणारी....शक्य झाल्यास ज्यांच्याकडे ही आरती म्हणत नाहीत त्यांनी या नवरात्री पासून ही आरती म्हणण्याची पद्धत सुरू करा...यातील प्रत्येक ओळीनुरुप भाव व्यक्त होऊन मन जास्तीत जास्त देवी जवळ जाण्यास मदत होईल...इति श्री©® अतिक श्वेता सुभाष वर्तक भाद्रपद कृ. नवमी, शके १९४५

Thursday, 28 September 2023

#विकिर_प्रकिर_उच्छिष्ट ।१) #विकिर ब्रह्मदेवाने सृष्टि रचली त्या आधी तिच्या अन्नाची व्यवस्था केली , त्यात देवांसाठी सोमभाग योजला ,, म्हणजे सोमाची आहूति हे देवांचे अन्न आहे ।सोम ग्रहण करून देव पुष्ट होतात । पण अश्विनीकुमार हे वैद्य या यज्ञसंस्थेतून वर्जित झाले ,, कारण इंद्रादि देव अश्विनीकुमारांना आपल्या पंक्तीत स्थान देत नसत ।या अश्विनीकुमारांसाठी सर्वप्रथम च्यवन ऋषींनी सोमभाग अर्पण केला,, त्यानंतर श्रौत कर्मात 'सामवेदी बहिष्पवमान' आणि ऋग्वेदी 'आश्विनसाहस्र' या मंत्रांच्या साहाय्याने अश्विनी कुमारांना यज्ञभाग दिला जाऊ लागला ।पण सांप्रत काळात श्रौत कर्म घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे ।आज सर्वत्र स्मार्त कर्म घडते ।। स्मार्त कर्म म्हणजे ,,,गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या उपचारांनी पूजन अर्चन, यजन याजन,, होम हवन ,, कलश स्थापन , विग्रह पूजा,, श्राद्ध पक्ष... शांती, संस्कार, प्रतिष्ठा, पीडा परिहार,,, इत्यादी सर्व कर्मे हि स्मार्त कर्म आहेत ।यातील श्राद्ध कर्मामध्ये या असोमपा देवांसाठी अन्नाची व्यवस्था पूर्वसुरींनी केली आहे ।असोमपाश्च ये देवाः यज्ञभाग विवर्जिताः ।तेषामन्नं प्रदास्यामि विकिरं वैश्वदेविकम् ।।अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत । सर्व देवांना मानव आहूति देतो ,, आणि देव मानवांना समृद्धी देतात,, त्यांची पीडा दूर करतात ।देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ।। भगवद्गीता ३-११त्यामुळे जसे आपण देवांचे देणे लागतो तसेच देवांच्या वैद्यांचे सुद्धा देणे लागतो ।असोमपा देवांना ग्रासमात्र देऊन आपण आपलेच कल्याण करतो ।श्राद्ध विधीत पिंडदान झाल्यानंतर उरलेल्या पिंडासाठी कालवलेला जो भात उरतो त्यात तीन भाग काढले जातात,,, त्यात पहिला भाग हा असोमपा देवांसाठी असतो त्याला विकिर म्हणतात ।२) #प्रकिर संस्कार ! म्हणजे नामकरण, मुंज, विवाह इत्यादी न होता गेलेल्या जीवांना 'असंस्कृत' अशी संज्ञा आहे,, कोणत्याही कारणाने एखाद्या स्त्रीचा त्याग केला गेला असेल तर अशा स्त्रियांचे अंत्यकर्म नीट होत नाही ।पूर्वी हा प्रकार खूप घडायचा,, मूल होत नाही म्हणून दुसरा विवाह,, दुसरा विवाह केल्यावर दुसऱ्या पत्नीला जी संतति व्हायची ती सावत्र आईसाठी सर्व क्रिया करेलच याची शाश्वती नसते कुटुंबात जे कुमार कुमारिका लहान वयात जातात ,, ज्यांना दहन केले जात नाही,, पुरले जाते,, यांचे संपूर्ण और्ध्वदेहिक करायचे नसते गर्भस्राव होतो,, गर्भातच बालक मरते ,, (अथवा मुद्दाम मारले जाते) यांचे देखील काही दिवसकार्य होत नाही १)विवाह न होता गेलेली स्त्री, २)परित्यक्ता स्त्री, ३)मुंज/सोडमुंज/विवाह इत्यादी संस्कार न होता गेलेला मुलगा, ४)कुमारावस्थेत गेलेले जीव, ५)गर्भातच मरण पावलेले जीव यांच्या तृप्तीसाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक घास काढला जातो ज्याला #प्रकिर म्हणतात ।असंस्कृतप्रमीता ये त्यागिन्यो या कुलास्त्रियः ।ददामि तेभ्यः प्रकिरमन्नं ताभ्यश्च पैतृकम् ।।३) #उच्छिष्ट : व्यवस्था अशी आहे , कि जेव्हा विवाह होतो तेव्हा जे होम केले जातात , त्यातील एक होम आहे गृहप्रवेशनीय होम । हा होम करून मग नवीन दाम्पत्याने गृहप्रवेश करायचा आहे ।आणि दोघेही जिवंत असेपर्यंत त्या अग्नीचे रक्षण करायचे आहे ।आणि सूर्योदय-सूर्यास्त काळी त्या अग्नीत निर्धारित आहुत्या द्यायच्या आहेत ।आणि जेव्हा दोघांपैकी एक कोणीतरी मरण पावेल तेव्हा तो आयुष्यभर रक्षण केलेला अग्नि मातीच्या मडक्यात भरून स्मशानावर घेऊन जायचा ,, आणि त्याच अग्नीवर त्या गृहस्थाचे दहन करावे ,, सांप्रत काळात या पद्धतीचा बहुतांशी लोप झालेला आहे ।गृहप्रवेशनीय होमाच्या अग्नि व्यतिरिक्त अन्य लौकिक अग्नीवर आज आपण मृताचे दहन करतो ।अशा प्रकारे दहन झालेल्या जीवाला 'अनग्निदग्ध' म्हणतात ।ज्या दाम्पत्याने आयुष्यभर अग्नीचे रक्षण केले आहे,, आता दोघांपैकी एक गेल्यावर असलेला अग्नि त्या मृतासोबत स्मशानात गेला,, आता दोघांपैकी जो नंतर जाईल त्याच्या दहनासाठी अन्य गृहस्थाचा गृहयाग्नि मडक्यात घेतला आणि त्याचे दहन केले तर त्या जीवाला 'अग्निदग्ध' असे म्हणतात ।यांचे सर्व और्ध्वदेहिक होते ,, पण आयुष्य भर जी आहूति दिली गेली हवी होती ती न दिली गेल्यामुळे यांच्या तृप्तीत एक न्यूनता असते ।गृहस्थाला प्रतिदिन हवन करणे अनिवार्य आहे । यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।। भगवद्गीता ३-१३या पितरांच्या तृप्तीतील न्यूनता जावी यासाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक भाग काढला जातो त्याला #उच्छिष्ट पिंड असे म्हणतात ।आपल्या आयुष्यामध्ये दृश्यमान आणि अदृश्यमान अशा दोन्ही जगतांचे अस्तित्व असते आणि त्या दोन्ही घटकांचा आपल्यावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो ।श्राद्ध संस्थेत या सर्वांचा विचार करून त्यातून आपले हित कसे होईल आणि त्यासाठी आपण त्यांचे कसे करायला हवे याचे विधान आहे ।हे झाले नित्य श्राद्धातील एका अत्यंत छोट्या भागाबद्दल,, तेही संक्षिप्त स्वरूपात ।महालय श्राद्धात अधिक व्यापक विचार आहे ।त्यावर यथावकाश लिहिनच ।सर्वांना तृप्त करणारी श्राद्धसंस्था हि साक्षात कामधेनुच आहे ।सागर सुहास दाबके ।

Wednesday, 5 July 2023

#श्री_योगेश्वरी_प्रगट_दिन🙏🏻🌼🙏🏻#अंबाजोगाई 🙏🏻🌼🙏🏻#कुलदेवता 🙏🏻🌼🙏🏻दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई , भवानी अंबाजोगाईभाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई ||दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू माते तुजला ओवाळू सत्कर्माचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळूतवा पदकमली लीन निरंतर पावे झणी माते मजला पावे झणी माते धावत येईल अघराशींचा नाश करायाते ||सदभावांच्या फुले वेलींवर भक्ती फुले आली माते भक्ती फुले आली वेचूनिया ती पदकमलांवर प्रेमे अर्पियलीतुझ्या कृपेने दैन्य दुःख ही लोपूनिया गेले वरदे सौख्य घरा आले शांती सुखाने मानस माझे आनंदित झाले ||योगेश्वरी हे कुलस्वामिनी आशीर्वच द्यावामजला आशीर्वच द्यावा तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा नतमस्तक मी होऊनी चरणी प्रार्थितसे आई, प्रेमे प्रार्थितसे आईह्रदयमंदिरी वास कराया यावे लवलाही ||आरती शब्द - श्री. नारायण बापट

Wednesday, 14 June 2023

विषय : कुंडलीची रचनालेखक : ज्योतिष मित्र मिलिंदसंदर्भ : संदर्भ : ज्योतीर्मयुखनमस्कार,अनेक समस्यां वा संधी जाणून घेण्यासाठी ज्योतीषाकडे जाऊन कुंडली दाखवून मार्गदर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. परंतू कुंडली म्हणजे काय हे अनेक जणांना माहीत नसते. कसले तरी चौकोन आखून त्यात आकडे व ग्रह लिहून काय सांगितले जाते हे तर अगाध ज्ञान.वास्तविक पणे ज्योतिष शास्त्र आपली सूर्यमाला व त्यातील ग्रहांची आकाशस्थ स्थिती, ग्रहांची गती व त्यांचा एकेमेकांशी साधला जाणारा कोन आणि या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर आधारित आहे.आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांचा क्रम पहिला तर लक्षात येईलसूर्यबुधशुक्रपृथ्वीमंगळगुरुशनीआता या वर्तुळाकार मार्गास मधून छेद दिला असता त्याचे डावा व उजवा असे दोन भाग होतील.आता पृथ्वी वरून सूर्यमाला पाहिली असता पृथ्वी सोडून सूर्य, इतर ६ ग्रह व सूर्याचा प्रकाश पृथ्वी वर परावर्तीत करणारा चंद्र आपल्या नजरेस वास्तविक क्रमाने दिसतील.या सर्व आकाशस्थ स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मांडलेला नकाशा म्हणजे कुंडली.कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला जी ची मांडणी अत्यंत वास्तविक व थक्क करणारी आहे.सूर्यमालेत ज्याप्रमाणें ग्रहांचा अनुक्रम वास्तविक आहे, त्याप्रमाणे राशींची वाटणी केली गेलीं आहे. सर्व राशींत जी सिंह राशि तिचें स्वामित्व दैदीप्यमान व जगाचें उत्पत्तिस्थान असा मुख्य ग्रह जो सूर्य त्याच्याकडे आलें.सूर्याच्या खालोखाल चंद्राचें तेज असल्यामुळें सूर्यराशीच्या पूर्वीची जी कर्क राशि तिचें आधिपत्य चंद्राकडे आलें.नंतर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध त्याच्या राशी सिंह राशीच्या पुढील कन्या व कर्क च्या मागील मिथुन असा बुधाचा पट्टा विभागला गेला.बुधाच्या नंतर शुक्र आहे, म्हणून बुधाच्या ज्या दोन राशि मिथुन व कन्या त्यांच्या मागील एक व पुढील एक म्हणजे वृषभ व तूळ अशा दोन राशींवर, वरील न्यायानें शुक्राचें स्वामित्व ठरलें.शुक्राच्या नंतर मंगळ आहे. म्हणून शुक्राच्या मागील व पुढील एक एक राशि म्हणजे मेष व वृश्चिक अशा दोन राशि मंगळाच्या झाल्या.मंगळानंतर गुरु आहे, म्हणून मेष च्या मागील एक व वृश्चिक च्या पुढील एक म्हणजे मीन व धनु अशा दोन राशि गुरूच्या झाल्या.शेवटीं शनि आहे म्हणून मीन च्या मागील राशि कुंभ व धनु राशीच्या पुढील राशि मकर अशा दोन राशींवर शनीचें स्वामित्व ठरलें. आता लक्षात येईल कि शनीच्या दोन्ही राशी शेजारी का येतात.खरोखर ही रचना पाहून मनास अत्यानंद वाटतो. ज्योतिषांत अशा तऱ्हेचें सयुक्तिक व चमत्कारिक प्रकार अनेक असतील; किंबहुना प्रत्येक गोष्टीविषय असें मौजेचें कांहींतरी असेल. परंतु आपल्या अल्प बुद्धीला तें गम्य नाहीं इतकेंच. शिवाय आमच्या प्राचीन विद्वान ज्योतिर्विदांनी जरी अनेक शोध, मूल्यवान विचार ग्रंथित करून ठेविले आहेत सोबत दिलेल्या सूर्यमालेच्या आकृतीवरून कुंडलीची रचना सहज समजून येईल.ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)संपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Tuesday, 30 May 2023

*गदिमांची मंगलाष्टके*तेजःपुंज दिसे प्रवालगिरिसा, रक्तांबरा नेसलादेवांचा अधिदेव तो गणपती या मंडपी बैसलापूजा मान्‍य करी, प्रसन्‍न वदनें स्‍वीकारली वंदना आता एकच मागणे गजमुखा ‘कुर्यात् बटोर्मंगलम्.... अंबा अष्‍टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्‍वामिनीआली लग्‍नघरी निवास करण्‍या आवाहना ऐकुनी आता तीच उभी मुठीत मिटल्‍या घेऊनिया अक्षतामाते, हो वरदायिनी वधुवरा, ‘कुर्यात् बटोर्मंगलम् !अग्‍नी, ब्राम्‍हण, आप्‍त, मित्र, अवघ्‍या आवाहिता देवताआनंदे नवदंपतीस बघती, अन् वर्षती अक्षताआशीर्वाद म्‍हणून तांदुळ धरा हे आपुल्‍या मस्‍तकीमागा हेच पुनःपुनः वरवधू, ‘कुर्यात् सदा मंगलम्’घेई जन्‍म नवा शिवास वरण्‍या दाक्षायणी ना वृथा तर्कातीत तरीहि सार्थ पहिल्‍या मातापित्‍यांची कथाप्रीतीभाव असा चिरंजिवपणें जन्‍मांतरी नांदतोश्रद्धा हीच तुम्‍हांस सौख्‍यद ठरो, ‘कुर्यात् सदा मंगलम्’प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्‍य ध्‍यानी धरा आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्‍यापित्‍यांनी दिलेत्‍यांचे श्रेय सुखप्रद तुम्‍हां, ‘कुर्यात सदा मंगलम्’वडिलपण मुलांनो, आमुचे धन्‍य व्‍हावेचढत चढत तुम्‍ही जीवनी उंच जावे मनसि वसत आहे, तोच आतून बोलेसकळ शुभद झाले, सौरभा सूर आलेआता बाळपणा सरे, उभयता ठाका उभे जीवनीस्‍वामी मान पतीस तू परिणिते, होई खरी स्‍वामिनीलाभू द्या धनसंपदा, यश, तुम्‍हां दीर्घायु सौख्‍यप्रदवाढू द्या यशवंत वंश तुमचा, कुर्यात् सदा मंगलम्अण्णा माडगूळकर******************************जवळ जवळ आला मीलनाचा मुहूर्तउभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थझटपट पट आता मित्र हो दूर साराअधीर बहुत झाला पंख येती जीवाला (1)रडूनि रडुनी डोळे लाल झाले मुलीचेकवण कथित सारे दुःख त्या माऊलीचेहळू हळू मग कन्या नीट मार्गासी जाईपुसत पुसत डोळे माय ती तीस पाही (2)मधुर मधुर वाद्ये वाजती मोहदायीवधु वर करी माला घेऊनि सज्ज होईजवळ जवळ आली ही घडी मीलनाचीमुदीत मुदीत प्रेमे भेट दोन्ही जीवांची (3)आता सावध सावधान समयो आला समीप असेआशीर्वाद हा पलार्ध घटिका संपूर्ण आली असे चित्ती गौरीहरा शची सुरवरा श्री रुक्मिणी माधवाचिंतावे कुलदेवता सततही कुर्वन्तु वो मङ्गलम् (4)चांदण्यात चांदणे पौर्णिमेचेलुगड्यात लुगडे पैठणीचे नवे लुगडे नेसता हर्ष वाटेपती पाहता ठेंगणा स्वर्ग वाटे (5)रमत गमत येता आज नवरदेव चढत चढत जाई नवऱ्या मुलीस चेवसरत सरत येई वेळ ती मुहूर्ताचीभरत भरत आली घटिका हि विवाहाचीअजब गजब घटना परत परत नाही रडत रडत नवरी सासुरासी जाई (6)*******************************