Sunday, 19 December 2021

ब्राह्मण 10 प्रकार वृत्तिनुसार दहा संज्ञा आहेत. अत्रिस्मृति.371.381.1)देवो मुनिर्व्दिजो राजा वैश्यः शूद्रो निषादकः।पशुम्लेच्छोऽपि चंडालो विप्रा दशविधाःस्मृताः।। देव, मुनी, व्दिज, राजा, वैश्य, शूद्र, निषाद, पशु, म्लेच्छ, चांडाल. हे दहा प्रकारचे ब्राह्मण सांगितले आहेत. देव. 1)सध्या स्नानं जपं होमं देवता नित्यपूजनम्। अतिर्थि वैश्वदेवं च देवब्राह्मण उच्चते।।मुनी.2)शाके पत्रे फले मूले वनवासे सदा रतः। निरतोऽहरहः श्राद्धे स विप्रो मुनुरुच्यते।।द्विज. 3) वेदांन्तं पठते नित्यं सर्व संग परित्यजेत् । सांख्ययोगविचारस्थः स विप्रो व्दिज उच्चते।।राजा.4) अस्राहताश्च धन्वानः संग्रामे सर्वसंमुखे। आरंभे निर्जितायेन स विप्रः क्षात्र उच्यते।।वैश्य.5)कृषिकर्मरतो यश्च गवां च प्रतिपालकः। वाणिज्यव्यवसायाश्च स विप्रो वैश्य उच्चते।।शूद्र.6) लाक्षालवणसंमिश्रं कुसुंभं क्षीरसर्पिषः। विक्रेता मधुमांसानां स विप्रः शूद्र उच्चते।।निषाद.7)चोरश्च तस्करश्चैव सूचको दंशकस्तथा।मत्स्यमांसे सदा लुब्धो विप्रो निषाद उच्चते।।पशु.8)ब्रम्हतत्वं न जानाति ब्रह्मसूत्रेण गर्वितः। तेनैव स च पापेन विप्रः पशुरुदाह्रृतः।।म्लेच्छ.9) वापीकूपतडागानामारामस्य सरःसु च । निश्शंकं रोधकश्चैव व विप्रो म्लेच्छ उच्चते।।चांडाल.10) क्रियाहीनश्च मूर्खश्च सर्व धर्म विवर्जितः। निर्दयः सर्वभूतेषु विप्रश्चांडाल उच्चते।। याप्रकारे अत्रि स्मृतित दहा प्रकारचे विप्र सांगितले आहेत. भूषणकाणे.पुणे.9421101126.

Monday, 22 November 2021

🌹 *श्री दुर्गा सप्तशती नवरत्न माला मंत्र* 🌹*या माया मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मूलिनी ।**या धूम्रेक्षण चंड मुंड मथनी या रक्त बीजाशनी ।**शक्तिः शुम्भनिशुम्भ दैत्य दलिनी या सिध्दिलक्ष्मीःपरा ।**सा चण्डी नवकोटिमूर्ति सहिता मां पातु विश्वेश्वरी ।।१।।**स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्देण दिनेषु सेविता ।**करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभि हंतु चापदः ।।२।।**या सांप्रतं चोध्दत दैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।**करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभि हंतु चापदः ।।३।।**या च स्मृता तत्क्षणमेव हंति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः ।**करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभि हंतु चापदः ।।४।।**सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि । एकमेव त्वया कार्यमस्मव्दैरि विनाशनम् ।।५।।**सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तु ते ।।६।।**सृष्टीस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाश्रये गुणमये नारायणि नमोsस्तु ते ।।७।।**शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोsस्तु ते ।।८।।**सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोsस्तु ते ।।९।।**फलश्रुती*जगन्मातेची पूजा करून । हें स्तोत्र अवश्य करावें पठण । हें सप्तशतींचे सार जाण । व्यासांनी निवडोन काढिलें ।। १।।असो सप्तशतीचा पाठ । जयासी न करवे स्पष्ट । तेणें हें म्हणावे उत्कुष्ट । फळ सर्व मंत्रांचे ।।२।।किंवा ही नवरत्नांची माळा । प्रेमे घालावी देवीच्या गळा ।। प्रसन्न होय देवी प्रेमळा । स्तोत्रपठनेंनियां ।।३।।ऐसें हे नवमंत्रांचे स्तोत्र । पठण करितां प्राणिमात्र ।। देवीचा अनुग्रह स्वतंत्र । तयावरी होतसे ।।४।।तैसेंचि जाण श्रवण करितां । सर्व बाधा नासती तत्वतां ।। पुरुषार्थाची आशा धरितां । नित्य पठण करावे ।।५।।*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Monday, 1 November 2021

🌹 *बालकास दृष्ट लागली असता उपाय* 🌹*वासुदेवो जगन्नाथ: पुतनातर्जनो हरिः। रक्षतु त्वरितो बालं मुंच मुंच कुमारकं।। कृष्ण रक्ष शिशून् शंख मधुकैटभ मर्दनं। प्रातः संगव मध्यान्हसायान्हेशु च संध्ययो:।। महानिशी सदा रक्ष कंसारिष्टनिशुदनं। यद्गोरज: पिशाचांश्च ग्रहांमातृग्रहानपी।। बाल ग्रहान् विशेषेण छिंधी छिंधी महाभयान्। त्राही त्राही हरे नित्यंत्वद्रक्षाभूषितंशिशूं।।* या मंत्राने भस्म(रक्षा) हातात धरून अभिमंत्रित करावी . (भस्म हातात घेऊन वरीलमंत्रांचे पठण करावे.) आणि ते भस्म बाळाच्या मस्तक, कपाळ, इत्यादी सर्वांगास लावावे. असे केल्याने दृष्टी दोष नाश पावतो.२) मीठ आणि मोहरी एकत्र करावी. मिठाचे प्रमाण जास्त आणि मोहरीचे प्रमाण अल्प असावे.पाच बोटे जुळवून त्यात मावेल एवढी मीठ-मोहरी दोन्ही हातांत घेऊन हातांच्या मुठी कराव्यात.वळलेल्या मुठी खालच्या म्हणजेच भूमीच्या दिशेने करून हातांची स्थिती ‘फुली’च्या आकारासारखी करून उभे रहावे.त्यानंतर दृष्ट काढणार्‍या व्यक्तीने तिचे हात खालून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने फिरवावेत.दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्‍यांवर जाळावी.३) दृष्ट शक्यतो सायंकाळी काढावी. त्रास दूर होण्यासाठी ती वेळ अधिक चांगली असते; तीव्र त्रास असल्यास तीन-चार वेळा सलग किंवा प्रत्येक घंट्याने (तासाने) किंवा दिवसातून तीन-चार वेळा दृष्ट काढावी.ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, तिला पाटावर बसवावे किंवा उंबरठ्यावर बसवावे .मीठ-मोहरी, मीठ-मोहरी-लाल मिरच्या, लिंबू, नारळ इत्यादी विविध घटक दृष्ट काढण्यासाठी वापरतात. ज्या घटकाने दृष्ट काढायची आहे, तो घटक दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या समोर हातात धरावा. ‘आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता- खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत दृष्ट काढायचा घटक त्रास असलेल्या व्यक्तीवरून सर्वसाधारणतः ३ वेळा ओवाळावा .दृष्ट काढायचा घटक ओवाळतांना प्रत्येक वेळी भूमीला हात टेकवावेत. दृष्ट काढतांना पुढून व पाठीमागून दोन्हींकडून ओवाळायला हवे.दृष्ट काढून झाल्यानंतर ती घेऊन जातांना मागे वळून पाहू नये. मिरच्या आणि लिंबू जाळावे, तर नारळ मारुतीच्या देवळात फोडावा किंवा पाण्यात विसर्जित करावा.*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Wednesday, 20 October 2021

विवाह संस्कार* 🌸💕

💕🌸 *
◆◆◆◆ विवाह संस्कार ◆◆◆◆

माणसाच्या आयुष्यात 16 संस्काराचे महत्व आहे. जन्मा पासून ते अंत्येष्टी (मृत्यू) पर्यन्त 16 संस्कार हिंदू धर्मात संगितले आहेत. त्यात सगळ्यांच्या आयुष्यात येणारा अत्यंत महवाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार..!
प्रत्येकाची इच्छा असते की आपले विवाहाचे विधी मात्र शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे... परंतु त्यात नक्की कोणते विधि केले जातात का केले जातात मुळात विवाह संस्कार म्हणजे काय? हा संस्कार का केला जातो? याची माहिती खुप लोकांना नसते. विवाह संस्कार हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा संस्कार. विवाहात केल्या जाणा-या विधींबद्दल हल्ली फार कमी लोकांना माहिती असते. 

विवाह या शब्दाची व्युत्पत्ती वि + वह् अशी आहे. ठराविक मार्गाचे जीवन, कुळ, समाज, वाहून नेणे हा त्याचा अर्थ आहे, आणि संस्कार म्हणजे कोणत्याही वस्तूचे आपल्या इच्छेप्रमाणे रुपांतर करून घेणे. हिंदू विवाहपद्धतीत लग्न हा करार नसून एक संस्कार आहे.

विवाह विधी मध्ये प्रामुख्याने वाङ् निश्चय , देवक, सीमान्तपूजन , मधुपर्क , गौरीहर , अन्तःपटधारण , कन्यादान , कंकणबंधन , मंगळसूत्र बंधन , विवाह होम (लाजा होम) , सप्तपदी , ऐरणी दान , गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन असे विधी केले जातात. या सर्व विधींची व त्यामागची भूमिका समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

💢 वाङ् निश्चय 💢

(वाक् = वाचा, निश्चय = निश्चिती ,शब्द देणे ) = वाङ् निश्चय म्हणजे शब्द देणे. पूर्वीच्या काळी विवाह हा चार दिवस चालत असे त्यामुळे परगावी असणाऱ्या वधूप्रमुखाकडे वरप्रमुखाने जाऊन वाङ् निश्चय केला जात असे. आता १ दिवसाच्या कार्यात आदल्या दिवशी वाङ् निश्चय केला जातो. प्रथम वरप्रमुखाकडून वधूप्रमुखाकडे मुलीची मागणी केली जाते. हि मागणी करताना दोघांच्या मागील तीन पिढ्यांचा उच्चार केला जातो कारण अनुवंशिकता, शारीरिक दोष साधारणपणे ३ पिढ्यांपर्यंत प्रामुख्याने उतरतात. सातव्या पिढी नंतर त्याचा परिणाम राहत नाही हे वैदिकशास्त्र सुद्धा मान्य करते पण वेदाने हे आधीच ओळखले आहे. आणि कोणतीही गोष्ट तीन वेळा विचारल्याबरोबर त्यामागचा त्यांचा उद्देश चांगला असतो अशी वधूप्रमुखाची खात्री पटते. अश्या प्रकारे मुलाकडून मुलीची मागणी घातल्या नंतर प्रथम स्वतः मग आपली पत्नी मग परिवाराचे व मुलीचे मत लक्षात घेऊनच वर प्रमुखाला शब्द दिला जातो .या नंतर वधूला यथाशक्ती अलंकार घालून तिचे पूजन केले जाते. कन्येच्या पित्याने गणपती पूजन करून कन्येच्या विवाह अंगभूत वाग्दान मी करतो असा संकल्प करायचा असतो.वधूवराच्या वंशावळीचा उच्चार करून वराची पारख करून कन्या देण्याचा शब्द द्यायचा व कन्येचे निरीक्षण करून तिच्यात काही दोष नाहीत याची खात्री करा असे वरपित्याला सांगावयाचे असते. (यात दोघान कडून सुपाऱ्या बांधून दिल्या जातात या आठवणीच्या म्हणून दिल्या जातात.) नंतर ब्राम्हणांनी आशीर्वाद द्यायचे,सुवासिनींनी औक्षण करायचं .उभय पक्षांनी ब्राम्हण पूजन करावे.वाङ् निश्चयाची सांगता व्हावी यासाठी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करावी.नंतर ब्राम्हणांनी सात ॠचात त्यांना आशीर्वाद द्यावयाचा. अश्या प्रकारे हा विधी पुरा होतो.

💢 सीमांत-पूजन 💢

विवाहविधी मुलीच्या मंडपामध्ये करण्याचे शास्त्र आहे,पण लग्नापूर्वी हा विधी मंडपामध्ये न होता तो गावच्या सीमेवर होत असे.सीमांत पूजन म्हणजे सीमेवर केले जाणारे पूजन. वाङ् निश्चय झाल्यानंतर नियोजित दिवशी वर वधूच्या गावी गेला कि त्याचे गावच्या सीमेवर पूजन केले जाते. यात वराची पूजा करून त्याला यथाशक्ती अलंकार घातले जातात. यामध्ये वराचे पाय धुवून त्याला नवीन वस्त्रे देण्यात येतात . विहिणीचे देखील पाय धुवून तिला साडी-चोळी व शिधा देण्यात येतो. वराचे पूजन करण्यापूर्वी सीमांत पूजनाचा संकल्प वधूपिता करतो . निर्विघ्नतेसाठी गणेश पूजन करून वरपूजन करतात .
पाय धुण्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. आरोग्यशास्त्रात सुद्धा बाहेरुन आल्यानंतर पाय धुवूनच वस्त्रे बदलावी असे सांगितले आहे. गरम पाण्याने पाय धुतल्यामुळे रक्ताभिसरण सुधारून थकलेल्या गात्रांना उत्तेजन मिळते. सीमांत पूजनाचे वेळी मुलीची मोठी बहिण विवाहित असली तर जेष्ठ जावयाचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. हल्ली वरमातेबरोबर वराकडील इतर मान्यवरांचे पाय धुणे हा प्रकार केवळ वधूपक्षाला दबावाखाली ठेवण्यासाठी केला जातो, हे योग्य नव्हे. वेद हा स्वच्छतेचा भोक्ता आहे. यामुळे यातून स्वच्छता हाच हेतू असून पाय कोणी धुवावे हा भाग गौण आहे.

💢 घाणा भरणे 💢

हल्ली सोईनुसार लग्नाचा दिवशी सकाळीच घाणा भरला जातो. हा विधी लग्न अगोदर करायचा असेल तर लग्नापूर्वी तीन , सहा व नववा दिवस वर्ज्य करावा. यावेळी ओव्यासुद्धा म्हणल्या जातात. उखळात उडीद , हळकुंड, सुपारी, तांदूळ घालून पाच सुवासिनी मुलगी व आई वडील मिळून कांडतात.
धान्य कांडण्यामागे कार्याला आलेल्या सर्व आप्तांसाठी अन्न तयार करणे हा उदेश आहे. हळद लावण्यामागे देखील शास्त्र आहे . आयुर्वेदात हळद हे anti-septic व चांगली कांती देणारे सांगितले आहे. तेल हे त्वचेला मऊपण देणारे आहे .हळद व तेलामुळे वधू वराला सुकांती प्राप्त व्हावी असा हेतू आहे.

💢 रुखवत 💢

रुखवत हा न्याहारी देण्याचा एक प्रकार. सात्विक आहार म्हणून हा द्यावा.शास्त्र सांगते म्हणून यात शिरा, दहीपोहे, असे पदार्थ असतात त्यात वरण-भाता सारखे अन्न नसते. उपाशीपोटी असलेल्याला मुलगी देऊ नये असे शास्त्र सांगते (कन्यादानाचे वेळी वराने उपहार केलेला असावा.)
कार्यालयात एका बाजूला मुलीला द्यायच्या गोष्टी मांडलेल्या असतात. या सर्व गोष्टी देण्यामागे जावई या वस्तू घेऊ शकत नाही अथवा या गोष्टी त्याच्या घरी नाहीत हा हेतू मुळीच नसतो, कन्येच्या जन्मापासून या गोष्टी तिच्या माता पित्याने जमवलेल्या असतात. कन्या हि एक दिवस तिच्या पतीच्या घरी जाणार या भावनेतून यावस्तू साठवल्या जातात. या गोष्टी कौतुकास्पद व्हाव्यात म्हणून त्या मांडणी करण्याची पद्धत पडली असावी. कालमानाप्रमाणे यथाशक्ती संसारोपयोगी वस्तू मांडण्याची पद्धत आहे.
लग्नाच्या दिवशी नवरदेवला वाजत गाजत आणतात या मागचा उद्देश असा कि आम्ही जे स्वीकारले ते समाजात मिरवत आणायचे. नवरदेवाला मांडवात (दारात) पुन्हा औक्षण करून त्याला आत आणतात. या नंतर वराचे मधुपर्क पूजन करतात.

💢 मधुपर्क पूजन 💢

मधुपर्क म्हणजे मध आणि दही यांचे मिश्रण हे स्नातक म्हणजे पदवीधर असलेल्या वराला देऊन त्याचे पूजन केले जाते. मधुपर्क पूजन हे सर्वांचे करता येत नाही नवरदेव, यज्ञातील मुख्य गुरुजी, व राजाकडील विशेष अतिथी यांचीच मधुपर्काने पूजा करतात.
या पूजेतील धार्मिक भाग सोडला तर त्या मागचे विज्ञान समजून घेण्यासारखे आहे.
आयुर्वेदात दही हे पित्तनाशक असून मध हे अमृत आहे असे मानले आहे.मध हा षड्रसयुक्त आहे म्हणून दूरवरून आलेल्या वराचे पित्त-शमन होऊन शारीरिक संतुलन ठीक होण्यासाठी मधुपर्क देतात. पाय धुण्यामागे स्वच्छता हा हेतू आहे; तर वराला ७ ते ८ वेळा आचमन सांगितले आहे,प्रवासातून आलेल्याला पाणी देण्याची पद्धत आहे,एकदम पाणी पिण्यापेक्षा थोडे-थोडे प्यावे त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते असे आयुर्वेददेखील सांगतो आणि सोवळे हे शुचिर्भुत होण्यासाठी आणि विधींसाठी मित्रमंडळींतून व नातेमंडळींतून वराला वेगळे काढण्यासाठी दिले जाते; त्यामागे अर्थ असा, कि यापुढच्या आयुष्यात त्याने सगळी तडजोड करावयाची आहे, मित्रपरिवार, लोभ व मोहापासून दूर राहून संसारात रममाण व्हावयाचे आहे.

💢 तेलफळ 💢

लग्नाच्या दिवशी पहाटेच मुलाकडील सुवासिनी मुलीसाठी तेलफळ आणतात. गौरीहरापाशी पहिली ओटी भरावी असे शास्त्र आहे. येथे तिची ५ फळे व हिरवी साडीचोळी, एखादा दागिना देऊन ओटी भरली जाते.ह्या ओटीसह मुलगी विवाहाच्यावेळी उभी राहते. हा विधी सर्वांकडेच केला जातो असे नाही.

💢 गौरीहर 💢

दाक्षायणीने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्राप्त करून घेतले. महादेवासारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा केली जाते. सजवलेल्या मंडपिमध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करून गौरीहराची पूजा केली जाते, काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत आहे. अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी, बलवान, पती प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन. मुलगी ' गौरी गौरी सौभाग्य दे दारी आलेल्याला आयुष्य दे' अशी प्रार्थना करत थोड्या थोड्या अक्षता देवीवर वाहते.
अन्नपूर्णा देण्यामागे ज्या घरी ही मुलगी राहणार आहे त्या घरी तिने अन्नपूर्णे प्रमाणे वागून घरातील सर्वांची अन्नदात्री बनावे अशी धारणा. मंडपीची रचना करण्या मागे सुशोभित छताशिवाय देवाची आराधना करू नये असा संकेत आहे. लग्नाला उभी राहताना मुलगी मामाने दिलेली पिवळ्या रंगाची साडी नेसते. यालाच अष्टपुत्री म्हणतात. हे वस्त्र लग्न लागल्यानंतर दान करायला सांगितलेले आहे, ते दान करणय मागचा हेतू असा कि वधू या भूमिकेतून मुलगी आता पत्नी या भूमिकेत गेलेली असते म्हणून ते वस्त्र तिने परत नेसायचे नसते.

💢 औक्षण 💢

दिवा लागला कि अंधाराचा व क्लेशाचा नाश होतो , दिव्यामधून लक्ष्मीची उपासना सूचित होते. म्हणून दिवा हा महत्वाचा. कोणत्याही मंगलकार्या समयी औक्षण करतात. औक्षण हे आयुष्य-वृद्धीसाठी केले जाते. यामागे माणसाचे आनंदाने स्वागत करून प्रेम वृद्धिंगत व्हावे हा हेतू.

💢 अन्तःपटधारण 💢

मुहूर्त जवळ आल्यावर मंडपात मध्यभागी पूर्व पश्चिम अश्या तांदुळच्या राशी घालून राशीच्या मध्यभागी कुंकवाने दोन्ही बाजूंनी काढलेला अन्तःपट धरण्यात येतो. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख आणि वराला पूर्वेकडच्या राशीवर पश्चिमाभिमुख उभे करतात. वधूवरांना समोरासमोर येण्याचा हा पहिलाच प्रसंग असतो.अन्तःपटच्या मध्यभागी स्वस्तिक काढण्याचे कारण असे असावे कि वधूवरांना आपल्या जीवनासाठी सिद्ध व्हावे व स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे त्यावर दोघे लक्ष केंदित करू शकतात. याच वेळी मंगलाष्टके म्हणतात. मंगलाष्टक म्हणजे मंगल वचनांचे अष्टक म्हणजेच आठ श्लोकांचे असावे, मुहूर्ताची घटिका भरेपर्यंत हि गायली जातात, हल्ली दोन्ही पक्षांकडील नातेवाईक मंडळी हौसेनेपद्धतीत लाष्टके म्हणतात.हि चालू असताना संपूर्ण शांतता अभिप्रेत आहे. असे क्वचितच घडते. नातेवाईकांनी देखील मुलामुलींचे व आईवडिलांचे नाव गुंफून मंगलाष्टके रचून हौस भागवण्यापेक्षा मुलामुलींना ज्या आयुष्यात सामोरे जायचे आहे त्याची कल्पना देणे हे इष्ट.
मुहूर्तावर मंगलाष्टके संपल्यानंतर अन्तःपट दूर करून वधूवर एकमेकांना हार घालतात, व दोन्ही बाजूंच्या करवल्या दोघांच्या डोळ्यांना पाणी लावून औक्षण करतात.
हार घालण्यामागचे सूत्र असे कि लग्न लागताना कुलदेवतेचे स्मरण करून जे प्राप्त होईल त्याचा स्वीकार करण्यास सिद्ध होणे,जेथे स्वीकार तेथे हार ; देव, राजा, नेता यांना आपण हार घालतो कारण आपण त्यांचा स्वीकार करतो. मुंडावळ्या का घालाव्यात यामागेदेखील शास्त्र असे कि मोती कोणी धारण करावे यामागे काही नियम आहेत, राजाने शौर्याचे प्रतिक म्हणून हे धारण करावे, मांडवात वधू-वर ओळखून यावेत म्हणून मोत्याच्या मुंडावळ्या त्यांनी धारण कराव्या.
लग्न लागताना अक्षता उधळण्याची पद्धत आहे, वास्तविक हि पद्धत योग्य नव्हे. अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ, तांदूळ हे अन्न आहे ,अन्न हे पूर्ण ब्रम्ह असे आपण म्हणतो मग हे असे पायदळी तुडवणे बरोबर नाही. कारण हल्ली कार्यालयात खूप गर्दी असते, मागील लोकांच्या अक्षता वधू-वरापर्यंत पोहचत नाहीत व आपले अक्षतारुपी आशीर्वाद फुकट जातात त्यापेक्षा जेव्हा वधूवरांना भेटायला आपण स्टेजवर किंवा मांडवात जातो तेव्हा त्या त्यांच्या मस्तकावर वाहाव्यात. कांही पद्धतीत आता कालानुरूप आणि परिस्थिति अनुरूप बदल करणे अपरिहार्य आहे. 
अक्षता वाहून आशीर्वाद देणे हा निश्चितच शास्त्र-शुद्ध व श्रेष्ट विधी आहे , पूर्वी मंडपात चपला घालून लोक येत नसत. आता या टाकलेल्या अक्षतांवर चपला-बुटांचे पाय पडतात. अश्या पूर्णब्रम्ह अन्नाला पायदळी तुडवणे बरोबर नव्हे. ज्या अन्नाकरता आपण अहोरात्र कष्ट करतो ते अश्याप्रकारे अपमानित होउ नये हा उद्देश.

💢 कन्यादान 💢

लग्न लागल्या नंतर महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान . कन्यादानापेक्षा कन्यानिवेदन हा शब्द योग्य कारण अपत्य दान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, दत्तक देऊ शकता. योग्य वराकडे संस्काराच्या माध्यमातून योग्य कन्या निवेदन करायची थोडक्यात तिचा पालकत्व त्याच्या परिवाराकडे सोपवायचे. कन्येचा स्वीकार करताना 'धर्माप्रजा सिध्यर्थं कन्यां प्रतिगृण्हामि' असे वर म्हणतो, प्रजा हि सर्वांचीच वाढत असते पण धर्माप्रजा म्हणजे काहीतरी विचार करून निर्माण केलेली प्रजा. आपली येणारी पुढची पिढी हि आपल्यापेक्षा विकसित व चांगली असावी हा उद्देश.पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी , पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून विष्णूस्वरूप वराला आपली लक्ष्मीस्वरूप कन्या सुपूर्त करावी. कन्या देताना वराला काही अटी घालूनच देतात, 'धर्मेच नातिचरामी' 'अर्थेच नातिचरामी' 'कामेच नातिचरामी ' असे त्याच्या कडून वदवून घेऊनच त्याला कन्या देतात. याचा अर्थ असा कि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्यातले पहिले तीन हे गृहस्थाश्रमात प्राप्त होतात ते उपभोगुनच चौथ्या पुरुषार्थ प्राप्त करायचा पण हे उपभोगताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक होता कामा नये. म्हणून वर तिथे नातिचरामी म्हणजेच कोणत्याही बाबतीत मी अतिरेक करणार नाही असे वचन देतो.या संस्कारात वधूपिता कोठेही 'इदं न मम' असे म्हणत नाही. या संस्काराची सांगता व्हावी, आपली प्रतिष्ठा व महत्व वाढावे म्हणून सोळा प्रकारच्या वस्तू कन्येस द्यायला सांगितल्या आहेत यज्ञाचे पुण्य मिळावे म्हणून धेनुदान, वराहाने धारण केलेली पृथ्वी स्थिर व्हावी म्हणून भूदान, मुलीच्या सेवेसाठी नोकरचाकर,विष्णू हा शेषशाई आहे म्हणून वराला शैय्यादान , सर्व सोपस्कार पूर्ण व्हावे म्हणून गृहदान , दुध-तुपासाठी म्हैस ....अर्थात या सर्व गोष्टी देणे आजकाल अशक्य व गैरसोईचे आहे तरी किमान पंचधातू हे या वेळी द्यावेत.
यामागे अजून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या गोष्टी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून दिल्या जातात, स्वतःच्या मुलीपेक्षा त्यांना कोणचीही गोष्ट मौल्यवान नाही व किती दिले हे महत्वाचे नसून या मागच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.
हा विधी करताना कन्येचे हात हा सगळ्यात खाली त्यावर वराचे हात त्यावर कन्येच्या पित्याचा हात असा क्रम असतो, वास्तविक जी गोष्ट द्यायची ती मध्ये पाहिजे; म्हणजे घेण्या-याचे हात सगळ्यात खाली पाहिजेत. पण या ठिकाणी कन्येचे हात खाली असतात कारण कन्या हि भूमी स्वरूप म्हणजे स्थिर आहे. विवाहानंतर ती तिच्या सासरी गेली व ती तिथे पत्नी,काकू,मामी,आई या कोणत्याही नात्यात गेली तरी माहेरी तिची कन्या म्हणूनच भूमिका राहते,लग्नानंतर कितीही वर्षांनी ती माहेरी आली तरी अमुकांची सून घरी आली असा उल्लेख न करता लेक घरी आली असेच सर्वजण म्हणणार ;म्हणजेच कन्या हि तिच्या भूमिकेत स्थिर आहे. भूदान करताना आपण भूमी उचलून देऊ शकत नाही ती तिथेच राहते.

💢कंकणबंधन 💢

कन्यादानाच्या विधी नंतर वर कन्येच्या उजव्या कुशीला स्पर्श करून देवाकडे आवडती संतती देण्याची आकांक्षा करतो.नंतर दोघांना समोरासमोर बसवून दुधात भिजवलेल्या पांढ-यासुताने त्यांच्या कंठाला व कटीला चार अथवा पाचवेळा वेढे देतात नंतर कटीचे सुत दोघांच्या वरून व कंठाचे सुत जमिनीवर ठेवून ते काढून घेतात त्याला हळद व कुंकू लावून हळकुंड बांधून कमरेजवळच्या सुताने केलेले कंकण वराच्या उजव्या मनगटाला वधू बांधते. व कंठाजवळच्या सुताने केलेले कंकण वर वधूच्या डाव्या मनगटाला बांधतो. याला कंकणबंधन असे म्हणतात.व्रतस्थ असणा-या वधूवरांनी बंधनात (नियमावलीत) राहावे म्हणून हे बंधन. हे चार दिवसांनी सोडतात. सुतामुळे संरक्षण मिळते हा देखील त्यामागचा हेतू.

💢 मंगळसूत्रबंधन 💢

वरमातेने दिलेले वस्त्र परिधान केल्यानंतर वराने मंगळसूत्र वधूच्या कंठात बांधायचे. यामागचा उद्देश असा असावा की मंगल म्हणजे पवित्र ,सूत्र म्हणजे दोरा, वस्त्राने लज्जारक्षण होते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांमुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळते. दोन वाट्या चार मणी हे सुवर्णाचे हवे त्यापैकी एक वाटी दोन मणी सासरचे व एक वाटी दोन मणी माहेरचे. हे सोन्याचे करण्यामागे कन्येला अलंकृत करणे हा हेतू. मंगळसूत्र हे सौभाग्यचिन्ह विशिष्ट रीतीने गुंफून ते घालायचे व सासर-माहेर दोन्ही कुटुंबे एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला द्यायचा. मंगळसुत्रामुळे विवाहित स्त्रीला प्रतिष्ठा मिळते. धर्माने मंगळसूत्र हे रक्षणार्थ दिले आहे कायद्याने ते बंधनकारक नसले तरी मंगळसुत्रातून संरक्षणाचा विश्वास दिला आहे म्हणजे स्त्री हि अबला आहे असा अर्थ काढू नये. अन्य सौभाग्यअलंकारामध्ये जोडवी, बांगड्या, यांचा समावेश होतो. जोडवी घालण्यामागे शास्त्राधार आहे मधल्या बोटाच्या नसा विशिष्ट प्रकारे दाबल्या जातात (Acupressure) त्यामुळे शरीरावर योग्य परिणाम होतो. कुंकू लावण्यामागे देखील शास्त्र आहे की मधल्या बोटाने कपाळावर विशिष्ट ठिकाणी ऊर्ध्व दिशने दाब देऊन कुंकू लावतात. त्या ठिकाणी मेंदूकडे जाणारी नस असते ती दिवसातून ३ - ४ वेळा दाबली तर मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. पुरुषांनी गंध लावण्यामागे हाच हेतू. कुंकुवामुळे भालप्रदेशाला शोभा येते ते वेगळे.

💢 विवाह होम 💢

विवाह हि प्रतिज्ञा आहे. ती आत्तापर्यंत वधूवरांनी घेतलीच. या विधीत तीच प्रतिज्ञा आता अग्नीच्या साक्षीने घेतली जाते, देवाग्निद्विजसंनिधौ म्हणजेच देव, अग्नी व ब्राम्हण
यांच्या साक्षीने.याठिकाणी योजक नावाच्या अग्नीची स्थापना केली जाते. प्रत्येक संस्कारातील अग्निंची नावे वेगळी आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण होत नाही कारण यात साजूकतुपाचीच आहुती दिली जाते याने वातावरण शुद्ध होते. अग्नी सिद्ध केला म्हणजे बोलावला , तो यज्ञकुंडात असल्याने मर्यादित आहे. जो मर्यादित आहे तो उपकारक आहे. पसरला कि त्याची आग बनते.
वराने अग्नीसमोर पाणिग्रहण करायचे आहे. पत्नीचा उजवा हात उताणा अंगठ्यासहित हातात घ्यायचा आहे याचाच अर्थ असा कि तिला सर्व गुणदोषासहित स्वीकारायची आहे. आपण हस्तांदोलन करताना अंगठा बाहेर ठेवतो. मात्र लग्नात वराने व मुंजीत पित्याने अंगठ्यासहित हात हातात धरायचा आहे. म्हणजेच त्याचा पुर्णत्वाने स्वीकार करावयाचा.
पाणिग्रहण योग्य मुहूर्तावर व्हावे असे शास्त्र सांगते पण मग लग्नाचे दोन मुहूर्त काढायचे का?....याचे उत्तर असे कि मंगलाष्टके कधीही म्हणावीत पण मंत्र योग्यवेळीच म्हणले गेले पाहिजेत. अर्थात विवाहात सर्व समाजाला सामाविष्ट करायचे आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ हवी म्हणून लग्नाचा मुहूर्त काढायची पद्धत पडली. शास्त्रापेक्षा रूढी व परंपरा श्रेष्ठ ठरतात असा पूर्वापार संकेत आहे. या साठी पाणीग्रहणाऐवजी विवाह मुहूर्त काढला जातो.

💢 लाजा होम 💢

विवाहहोमाजवळ मुलीचा भाऊ उत्तराभिमुख बसतो. प्रथम त्याचे हात निर्जंतुक व्हावेत म्हणून त्याच्या हाताला तूप लावले जाते.नंतर भाऊ मुलीच्या ओंजळीत लाह्या घालतो. नंतर विशिष्ट मंत्राने वधूवरांनी ह्या लाह्या अग्नीत द्यायच्या.नंतर अग्नीला प्रदक्षिणा करून पाट्यावर अथवा सहाणेवर मुलीने उभे राहायचे. असे तीन वेळा केले जाते.
ह्या ठिकाणी लाह्या वापरल्या जातात कारण आपले जीवन ज्या अन्नाशी निगडीत आहे असे अन्न अग्नीला द्यावे ; लाह्या ह्या साळीच्या असतात व ते पूर्ण अन्न आहे व भाजलेल्या असल्याने त्याला दोष नाही.
प्रत्येक प्रदक्षिणे नंतर वधू पाट्यावर किंवा सहाणेवर उभी राहते याचा अर्थ असा कि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जसा पाषाण स्थिर असतो तशी संसारात तू स्थिर राहा.
यानंतर या विधीत लाह्या देऊन मदत केल्याबद्दल वधूच्या भावाचा काहीतरी देऊन मान केला जातो. कानपिळी हा विधी शास्त्रात नाही. कारण ज्यावराला आपण विष्णुस्वरूप मानतो त्याचा कानपिळणे कितपत योग्य? कानपिळी यातून शिक्षा अभिप्रेत होते.भावाचा सन्मान करावा याबद्दल देखील शास्त्र असे कि, धर्म कोणाचेही ऋण ठेऊ देत नाही, आणि म्हणून सुवासिनीने औक्षण केल्याबद्दल लगेच तिला कुंकू लावून लगेच ऋणमुक्त व्हावे व आहेर करणा-या व्यक्तीला आहेर घेतल्यानंतर किमान नारळ परत द्यावा.

💢 सप्तपदी 💢

सप्तपदी या विधीत वधूवरांनी एकत्र सात पावले चालायची असतात. प्रत्येक पावलामागे वर विविध आशा व्यक्त करतो.
पहिल्या पावलात तिचे स्वागत आहे.दुस-या पावलात तिने उर्जा व बल द्यावे अर्थात अन्नपूर्णा म्हणून यावे असे सांगितले आहे. तिस-या पावलात तिने सर्वांना माया धन व ऐश्वर्यसंपन्न करणारी हो अशी अपेक्षा आहे.चौथ्या पावलात सर्व कुटुंबाला माया, प्रेम देऊन बांधून ठेवणारी हो अशी अपेक्षा आहे. पाचव्या पावलात वंशवृद्धीसाठी संततीवर्धक हो अशी अपेक्षा. सहाव्या पावलात प्रत्येक ऋतूमध्ये मला साथ देणारी हो सातवे पाऊल सखा सप्तपदी भव म्हणजेच आपले हे नाते नवराबायको प्रमाणेच चांगले मित्रमैत्रिणीचे असो हि अपेक्षा व्यक्त केली आहे. या नंतर कलशातील जलाने उभयतांवर अभिषेक केला जातो.यात आशीर्वाद देऊन तुम्ही दोन्ही जीव एकमेकांना कल्याणकारक होवो अशी इच्छा व्यक्त केली जाते.
गृहप्रवेशनीय होम हा घरी केला जातो पण हल्ली कार्यालयात हा होम केला जातो. हा होम झाल्यानंतर येथे स्थापन केलेला अग्नी घरी नेण्यास सांगितला आहे पण ते शक्य नसल्याने एक पळसाची समिधा अग्नीवर तापवून तो अग्नी त्या समिधेत प्रविष्ट झाला अशी कल्पना करून ती समिधा बांधून वराकडे दिली जाते मग घरी जाऊन हा अग्नी कुंडात स्थापन करून पुढे होणारे सर्व संस्कार यावर करण्यास सांगितले आहे आणि तो आयुष्याच्या शेवटी दहना पर्यंत वापरायचा असे सांगितले आहे. या ठिकाणी होमाजवळचे तूप वधूच्या हृदयाला लावले जाते, हृदयशुद्धता हा यामागचा हेतू असावा.
नंतर वधूवरांना धृवादी ताऱ्यांचे दर्शन घ्यायला सांगितले आहे.या मागे ध्रुव जस आपल्या ठिकाणी अढळ आहे तसे तुम्ही संसारात अढळ राहा हा संदेश.
गौरीहरात पूजलेली देवी वराने आपल्या घरी न्यावी यावेळी काही ठिकाणी आंबा शिंपणे हा विधी केला जातो. याला शास्त्राधार नाही. गौरीहरापाशी बसवून वराला दूध प्यायला द्यायचे व वधूची तिच्या आईने मालत्यांनी ओटी भरायची असेते. दिवसभराच्या कार्याने दमलेल्या मुलीला घरी गेल्यावर काही स्वयंपाक करायला लागू नये फक्त या मालत्या दुधात भिजवून साखर घातली कि त्याची खीर होते थोडक्यात 'instant food'!! अर्थात पौष्टिक; हा उद्देश असावा. देवी का द्यायची तर देवीची मूर्ती घरातल्या देवघरात ठेवायची म्हणजे तेथे तिला जागा करूनच ठेवली जाते. तशीच आमच्या चालत्या बोलत्या मुलीला तुमच्या घरात मानाचे स्थान देऊन समाविष्ट करून घ्या अशी कल्पना त्यामागे असावी.

💢 ऐरणी दान 💢

कन्यादान व  विवाहसंस्काराची सांगता या विधीने होते ; या कर्माचे फळ प्राप्त होण्यासाठी हा विधी केला जातो. हा विधी चौथ्या दिवशी केला जातो पण हल्ली त्याच दिवशी कार्यालयात हा विधी केला जातो.या ठिकाणी वरमातेचे यथाशक्ती पूजन करून तिची पांढरी साडीचोळी, सौभाग्यवायन (आरसा, कंगवा, कुंकू, मणी, मंगळसूत्र ) दिले जाते. नंतर सुपात / रोवळीत सोळा दिवे ठेऊन प्रथम उमा-महेश्वराची पूजा करून हे दिवे कन्येचा पिता प्रथम कन्येच्या मग वराच्या मग सासू सासऱ्यांच्या डोक्यावर धरत जातात. आई दिव्याखाली कापड धरते . नंतर ते सूप अथवा रोवळी वरमातेला दान केली जाते. दिवे डोक्यावर धरण्याचा अर्थ असा कि आज पासून त्यांनी मुलीची जबाबदारी तुच्यावर सोपवली आहे. याठिकाणी वेळूपासून तयार केलेले पात्र वापरण्यामागचे कारण असे कि वेळू म्हणजे बांबू ; हे झाड कापले तरी त्यातून पुन्हा कोंब फुटून नवीन झाड तयार होते ते मरत नाही, असाच आमच्या वंशाचा विस्तार होत राहावा हा उद्देश. सूप व रोवळी यांना वंश पात्र या करताच म्हणले जाते.
गौरीहरासमोरून देवी उचलली कि त्या पाट्यावर वराकडच्यांनी सौभाग्यवायन ठेवायचे असते, त्याला पाट्यावरचे वाण असे म्हणतात हे मुलीच्या मामीकरता असते.ते स्थान रिकामे राहू नये म्हणून हे वाण मांडले जाते.
ह्या ठिकाणी वरपक्षाची प्रार्थना केली जाते त्याचा थोडक्यात अर्थ असा कि हि मुलगी आजपर्यंत आम्ही आमच्या मुलाप्रमाणे वाढवली आहे ती आता तुमच्या घरची सून आहे तिला तुमच्याकडील रिती-रिवाज या बद्दल माहिती नाहीये तरी तिला तुमच्याकडील सर्व गोष्टी समजावून सांगून तिचा तुमच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा.

💢 सुनमुख 💢

सासूने प्रथम सुनेचे मुखावलोकन करणे याला सुनमुख असे म्हणतात,धर्माने कोणत्या मांडीवर कोणाला बसवावे ह्याचे विवेचन केले आहे. सून हे अपत्य म्हणून स्वीकारायचे म्हणून सासूला मध्यभागी बसवून एका मांडीवर सुनेला व दुस-या मांडीवर मुलाला बसवायचे व आरश्यात सुनेचा चेहेरा पहायचा, तिच्या पाठीवरून हात फिरवायचा तिची वेणी घालायची.आरश्यात पहायचे कारण असे कि अलंकृत अश्या मुलीला दृष्ट लागू नये कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही 'रूप हे आरश्यात पहायचे व स्वरूप हे डोळ्यात साठवून ठेवायचे.मुलीची बावरलेली नजर आरश्यात दिसते तिला सासूने धीर द्यायचा थोडक्यात यापुढे आईची माया तिला द्यायची जबाबदारी सासूची. सासूने मुलीच्या भांगेत कुंकू घालून तिला सौभाग्याची जाणीव करून द्यायची. अलंकार अनेक केले जातात पण मंगळसूत्र व कुंकू अनेक प्रकारची एकाच वेळी घालू शकत नाही कारण मंगळसूत्र धारणाचा अधिकार तपामुळे प्राप्त होतो तो मुलीने स्वतःच्या कर्तुत्वाने व विश्वासावर टिकवायचा आहे.

💢 गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन 💢

ऐरणी दान झाल्यानंतर मुलीकडचे सर्व विधी संपतात. वधुवराला वरातीतून मिरवून वराच्या घरी आल्यानंतर दारातील तांदुळाने भरलेले माप ओलांडून वधू गृहपवेश करते यालाच गृह प्रवेश म्हणतात. वधु हि लक्ष्मी स्वरूप असते म्हणून पुढचा विधी लक्ष्मीपूजन हा असतो. यात गणपती पूजन, स्वस्ति-पुण्याह वाचन करून तांदुळाने भरलेल्या ताटात सोन्याच्या अंगठीने नववधूचे नामकरण केले जाते. सासूरवाडीतून आणलेल्या देवीची पूजा करून प्रतिष्ठा केली जाते. पूर्वीच्या काळी सर्वानुमते येणारी मुलगी कोणत्या नावाने स्वीकारायची हा ठरवण्याचा अधिकार मुलाकडच्यांचा असे म्हणून हा विधी. आताच्या काळात नाव बदलावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा विधी सुद्धा हल्ली सोयीनुसार कार्यालयातच केला जातो.

🙏🏻🙏🏻🙏🏻💐💝💝💐🙏🏻🙏🏻

🔸▶ अजिंक्य कुळकर्णी ◀🔸
जन्मपत्रिका विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन

       🔵【सशुल्क मार्गदर्शन】 🔵
9422353522 / 7723073522
समस्या नाही असा मनुष्य नाही, अन उपाय नाही अशी समस्या नाही..!

🙏🏻🍁☘☘🍁🍁☘☘🍁🙏🏻

Saturday, 9 October 2021

🌹 *वंशवृद्धीकर दुर्गाकवच - वंशकवच* 🌹संतती होण्यास अडथळे , त्रास होत असेल किंवा सतत गर्भपात होत असेल , किंवा संतती जगत नसेल त्यांनी एखाद्या शुभदिवसापासून शुभदिवसापर्यंत किंवा अकरा किंवा एकवीस दिवस या स्तोत्राचे श्रद्धा-भक्ति पुर्वक नियमित पठण - श्रवण करावे. या स्तोत्र पठणाने देवीची कृपा प्राप्ती होऊन संतती प्राप्तीमधील दैवी दोष - अडथळे दूर होण्यास मदत होते. *॥ वंशवृद्धिकरं दुर्गाकवचम् अथवा वंशकवचम् ॥**भगवन् देव देवेशकृपया त्वं जगत् प्रभो । वंशाख्य कवचं ब्रूहि मह्यं शिष्याय तेऽनघ । यस्य प्रभावाद्देवेश वंश वृद्धिर्हिजायते ॥ १॥* *॥ सूर्य ऊवाच ॥* *शृणु पुत्र प्रवक्ष्यामि वंशाख्यं कवचं शुभम् ।* *सन्तानवृद्धिर्यत्पठनाद्गर्भरक्षा सदा नृणाम् ॥ २॥* *वन्ध्यापि लभते पुत्रं काक वन्ध्या सुतैर्युता । मृत वत्सा सुपुत्रस्यात्स्रवद्गर्भ स्थिरप्रजा ॥ ३॥* *अपुष्पा पुष्पिणी यस्य धारणाश्च सुखप्रसूः । कन्या प्रजा पुत्रिणी स्यादेतत् स्तोत्र प्रभावतः ॥ ४॥* *भूतप्रेतादिजा बाधा या बाधा कुलदोषजा । ग्रह बाधा देव बाधा बाधा शत्रु कृता च या ॥ ५॥* *भस्मी भवन्ति सर्वास्ताः कवचस्य प्रभावतः । सर्वे रोगा विनश्यन्ति सर्वे बालग्रहाश्च ये ॥ ६॥* *॥ अथ दुर्गा कवचम् ॥* *ॐ पुर्वं रक्षतु वाराही चाग्नेय्यां अम्बिका स्वयम् । दक्षिणे चण्डिका रक्षेन्नैऋत्यां शववाहिनी ॥ १॥* *वाराही पश्चिमे रक्षेद्वायव्याम् च महेश्वरी । उत्तरे वैष्णवीं रक्षेत् ईशाने सिंह वाहिनी ॥ २॥* *ऊर्ध्वां तु शारदा रक्षेदधो रक्षतु पार्वती । शाकंभरी शिरो रक्षेन्मुखं रक्षतु भैरवी ॥ ३॥* *कण्ठं रक्षतु चामुण्डा हृदयं रक्षतात् शिवा । ईशानी च भुजौ रक्षेत् कुक्षिं नाभिं च कालिका ॥ ४ ॥* *अपर्णा ह्युदरं रक्षेत्कटिं बस्तिं शिवप्रिया । ऊरू रक्षतु कौमारी जया जानुद्वयं तथा ॥ ५॥* *गुल्फौ पादौ सदा रक्षेद्ब्रह्माणी परमेश्वरी । सर्वाङ्गानि सदा रक्षेद्दुर्गा दुर्गार्तिनाशनी ॥ ६॥* *नमो देव्यै महादेव्यै दुर्गायै सततं नमः । पुत्रसौख्यं देहि देहि गर्भरक्षां कुरुष्व नः ॥ ७॥* *ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं श्रीं ऐं ऐं ऐं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रुपायै नवकोटिमूर्त्यै दुर्गायै नमः ॥ ८॥* *ह्रीं ह्रीं ह्रीं दुर्गार्तिनाशिनी संतानसौख्यम् देहि देहि बन्ध्यत्वं मृतवत्सत्वं च हर हर गर्भरक्षां कुरु कुरु सकलां बाधां कुलजां बाह्यजां कृतामकृतां च नाशय नाशय सर्वगात्राणि रक्ष रक्ष गर्भं पोषय पोषय सर्वोपद्रवं शोषय शोषय स्वाहा ॥ ९॥* *॥ फल श्रुतिः ॥* *अनेन कवचेनाङ्गं सप्तवाराभिमन्त्रितम् । ऋतुस्नात जलं पीत्वा भवेत् गर्भवती ध्रुवम् ॥ १॥* *गर्भ पात भये पीत्वा दृढगर्भा प्रजायते । अनेन कवचेनाथ मार्जिताया निशागमे ॥ २॥* *सर्वबाधाविनिर्मुक्ता गर्भिणी स्यान्न संशयः । अनेन कवचेनेह ग्रन्थितं रक्तदोरकम् ॥ ३॥* *कटि देशे धारयन्ती सुपुत्रसुख भागिनी । असूत पुत्रमिन्द्राणां जयन्तं यत्प्रभावतः ॥ ४॥* *गुरूपदिष्टं वंशाख्यम् कवचं तदिदं सुखे । गुह्याद्गुह्यतरं चेदं न प्रकाश्यं हि सर्वतः ॥ ५॥**धारणात् पठनादस्य वंशच्छेदो न जायते । बाला विनश्यंति पतन्ति गर्भास्तत्राबलाः कष्टयुताश्च वन्ध्याः ॥ ६ ॥* *बाल ग्रहैर्भूतगणैश्च रोगैर्न यत्र धर्माचरणं गृहे स्यात् ॥* *॥ इति श्रीज्ञानभास्करे वंशवृद्धिकरं वंशकवचं सम्पूर्णम् ॥*याबरोबर औषधी उपाय - वैद्यकीय चिकित्सा सुद्धा चालू असावी. *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Friday, 6 August 2021

श्रीयोगेश्र्वरी सहस्त्रनामश्रीगणेशायनमः ॥ श्रीयोगेश्र्वर्यैनमः ॥ अथ मूल मंत्रः ॐ र्‍हीं नमो भगवति रक्तचामुंडे योगेश्र्वरी, योगिनीं र्‍हीं स्वाहा इति मंत्रः ।रक्तचामुंडायै विद्महे भूत संहारिण्यै च धीमहि ।तन्नो योगेश्र्वरी प्रचोदयात् ॥ गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतं जपं ।सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादात्त्वयि स्थितिः ।लं, हं, यं, रं, वं ।अथ महामंत्रः ॐ अस्य योगेश्र्वरी महामन्त्रस्य महादेव ऋषिः ।अनुष्टुप् छंदः । श्री योगेश्र्वरी देवता । र्‍हीं बीजम् ।श्रीं शक्तिः । क्लीं कीलकम् । मम चतुर्विधपुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।अथ न्यासः ॐ र्‍हीं अंगुष्ठाभ्यां नमः ।ॐ यं तर्जनीभ्यां नमः ।ॐ यां मध्यमाभ्यां नमः । ॐ रुद्रदेवतायै अनामिकाभ्यां नमः ।ॐ योगेश्र्वर्यै कनिष्ठिकाभ्यां नमः । ॐ स्वाहा करतलकर पृष्ठाभ्यां नमः ।एवं हृदयादि न्यसेत् ।अथ ध्यानम् ॐ देवी भक्तजनप्रियां सुवदनां खड्गं च पात्रं तथा ।स्वर्णालङ्कृतलाङ्गलं सुमुसलं हस्तैर्दधानां श्रियम् ॥विद्युत्कोटिरवीन्दुकान्ति धवलां दन्तासुरोन्मूलिनीं ।ब्रह्मेन्द्राद्यभिवन्दितां च वरदां योगेश्र्वरीं संभजे ॥ १ ॥लं पृथिव्यादि पंच मानसोपचारैः संपूज्य जपेत् ॐ लं पृथिव्यात्मने गन्धं परिकल्पयामि नमः ॐ हं आकाशात्मने पुष्पं परिकल्पयामि नमः ॐ यं वायव्यात्मने धूपं परिकल्पयामि नमःॐ रं अग्न्यात्मने दीपं परिकल्पयामि नमःॐ वं अमृतात्मने नैवेद्यं परिकल्पयामि नमःॐ सं सर्वात्मने फलं तांबूलं दक्षणांच परिकल्पयामि नमःअथ मन्त्रःॐ र्‍हीं यं यां रुद्रदेवतायै योगेश्र्वर्यै स्वाहाउत्तर न्यासं कृत्वा गुह्यातिगुह्यगोप्त्रीत्वं गृहाणास्मत्कृतं जपम् ।सिद्धिर्भवतु मेदेवित्वत्प्रसादात्सुरेश्र्वरि ॥इति ॐ ॐ ॐ अथ श्री योगेश्र्वरी सहस्त्रनाम प्रारंभः ।ॐ या तुरीया परादेवी दोषत्रयविवर्जिता ।सदानंदतनुः शांता सैवाहमहमेव सा ॥ १ ॥यस्याः संस्मरणादेव क्षोयंते भवभीतयः । तां नमामि जगद्धात्रीं योगिनीं परयोगिनीम् ॥ २ ॥महदादि जगद्यस्या जातं रज्जुभुजगंवत् ।सा अंबापुरसंस्थाना पातु योगेश्र्वरी ॥ ३ ॥सच्चिदानंदरुपाय प्रतीचेनंत रुपिणे ।नमो वेदांतवेद्याय महसेमिततेजसे ॥ ४ ॥श्री ईश्र्वर उवाच ।यो नित्यं पुजयेद्देवीं योगिनीं योगवित्तमां ।तस्यायुः पुत्रसौख्यं च विद्यादात्री भवत्यसौ ॥ ५ ॥यो देवीभक्तिसंयुक्तस्तस्य लक्ष्मीश्च किंकरी ।राजानो वश्यतां यांति स्त्रियो वै मदवोव्हलाः ॥ ६ ॥यो भवानीं महामायां पूजयेन्नित्य मादृतः । ऐहिकं च सुखं प्राप्य परे ब्रह्मणि लीयते ॥ ७ ॥श्रीविष्णुरुवाच ।देव देव महादेव नीलकंठ उमापते । रहस्यं प्रष्टुमिच्छामि संशयोऽस्ति महामते ॥ ८ ॥चराचरस्य कर्ता त्वं संहर्ता पालकस्तथा । कस्या देव्यास्त्वया शंभो क्रियतेस्तुतितन्वहम् ॥ ९ ॥ जप्यते परमो मंत्रो ध्यायते किं त्वया प्रभो ।वद शंभो महादेव त्वतः का परदेवता ॥ १० ॥ प्रसन्नो यदि देवेश परमेश पुरातन ।रहस्यं परया देव्या कृपया कथय प्रभो ॥ ११ ॥विनायासं विनाजाप्यं विनाध्यानं विनार्चनम् ।प्राणायामं विना होमं विनानित्योदितक्रियाम् ॥ १२ ॥विनादानं विनागंधं विनापुष्पं विनाबलिम् ।विनाभूतादिशुद्धि च यथा देवी प्रसीदति ॥ १३ ॥ईति पृष्टस्तदा शंभुर्विष्णुना प्रभविष्णुना ।प्रोवाच भगवान्देवी विकसन्नेत्र पंकजः ॥ १४ ॥श्रीशिव उवाच ।साधु साधु सुरश्रेष्ठ पृष्ठवानसि सांप्रतं ।षण्मुखस्यापि यद्गोप्तं रहस्यं तद्वदामि ते ॥ १५ ॥पुरा युगक्षये लोकान्कर्तुमिच्छुः सुरासुरम् ।गुणत्रयमयी शक्तिश्चिद्रूपाद्या व्यवस्थिता ॥ १६ ॥तस्यामहं समुत्पन्नो मत्तस्त्वं जगतःपिता ।त्वत्तोब्रह्मा समुद्भूतो लोककर्ता महाविभुः ॥ १७ ॥ब्रह्मणो ऋषयो जातास्तत्त्वैस्तैर्महादिभिः ।चेतनेति ततः शक्तिर्मां काप्यालिंग्य तिष्ठति ॥ १८ ॥आराधिता स्तुता सैव सर्वमंगलकारिणी ।तस्यास्त्वनुग्रहादेव मया प्राप्तं परं पदम् ॥ १९ ॥स्तौमि तां च महामायां प्रसन्ना च ततः शिवा ।नामानि ते प्रवक्ष्यामि योगेश्र्वर्याः शुभानि च ॥ २० ॥एतानि प्रपठेद्विद्वान्नमोंतानि सुरेश्वर ।तस्या स्तोत्रं महापुण्यं स्वयंकल्पात्प्रकाशितम् ॥ २१ ॥गोपनीयं प्रयत्नेन पठनीयं प्रयत्नतः ।तव तत्कथयिष्यामि श्रुत्वा तदवधारय ॥ २२ ॥यस्यैककालपठनात्सर्वे विघ्नाः पलायितः ।पठेसहस्त्रनामाख्यं स्तोत्रं मोक्षस्य साधनम् ॥ २३ ॥प्रसन्ना योगिनी तस्य पुत्रत्वेनानुकल्पते ।यथा ब्रह्मामृतैर्ब्रह्मकुसुमैः पूजितापरा ॥ २४ ॥प्रसीदति तथा तेन श्रुत्वा देवी प्रसीदति ।अस्य श्री योगेश्र्वरी सहस्त्रनामस्तोत्रमंत्रस्य श्रीमहादेव ऋषिः ।अनुष्टुप छंदः । श्रीयोगेश्र्वरी देवता ।मम सकलकामना सिद्धर्थं अंबापुरवासिनी प्रीत्यर्थं सहस्त्रनाम स्तोत्र जपे विनियोग ।अथन्यासः ॐ र्‍हीं अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ यं तर्जनीभ्यां नमः ।ॐ यां मध्यमाभ्यां नमः । ॐ रुद्रदेवतायै अनामिकाभ्यां नमः ।ॐ योगेश्र्वर्यै कनिष्ठिकाभ्यां नमः । ॐ स्वाहा करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।एवंहृदयादि षडंगन्यासः ।ॐ र्‍हीं हृदयाय नमः । ॐ यं शिरसे स्वाहा ।ॐ यां शिखायै वषट् । ॐ रुद्रदेवत्यायै कवचायहुं ।ॐ योगेश्र्वर्यै नेत्रत्रयाय वौषट् । ॐ स्वाहा अस्त्राय फट् ।ॐ भूर्भुवस्वरोमिति दिग्बंधः । अथ ध्यानं ।ॐ कालाभ्राभ्यां कटाक्षैरलिकुलभयदां मौलिबद्धेंदुरेखां ।शंखं चक्रं कपालं डमरुमपि करैरुद्वहंतीं त्रिनेत्रां । सिंहस्कंधाधिरुढां त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयंतीं,ध्यायेदंबां जयाख्यां त्रिदशपरिणतां सिद्धिकामो नरेंद्रः ॥ १ ॥ अथ सहस्त्रनाम स्तवनम् ।ॐ योगिनी योगमाया च योगपीठस्थितिप्रिया ।योगिनो योगदीक्षाच योगरुपाच योगिनी ॥ १ ॥योगगम्या योगरता योगीहृदयवासिनी । योगस्थिता योगयुता योगमार्गरता सदा ॥ २ ॥योगेश्र्वरी योगनिद्रा योगदात्री सरस्वती ।तपोयुक्ता तपःप्रितिः तपःसिद्धिप्रदापरा ॥ ३ ॥निशुंभशुंभसंहत्रीं रक्तबीज विनाशिनी ।मधुकैटभहंत्री च महिषासुरघातिनी ॥ ४ ॥शारदेंदुप्रतीकाशा चंद्रकोटिप्रकाशिनी ।महामाया महाकाली महामारी क्षुधातृषा ॥ ५ ॥निद्रातृष्णा चैकवीरा कालरात्रीर्दुरत्यया ।महाविद्या महावाणी भारतीवाक् सरस्वती ॥ ६ ॥आर्या ब्राह्मी महाधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी ।कराला विकरालाख्या अतिकालातिदीपका ॥ ७ ॥ एकलिंगा योगिनी च डाकिनी भैरवी तथा ।महाभैरवकेंद्राक्षी त्वसितांगी सुरेश्वरी ॥ ८ ॥शांति चंद्रार्धमाकर्षी कलाकांति कलानिधीः ।सर्वसंक्षोभिणी शक्तिः सर्वाल्हादकरी प्रिया ॥ ९ ॥ सर्वाकर्षिणिकाशक्तिः सर्वविद्राविणी तथा ।सर्वसंमोहिनीशक्तिः सर्वस्तंभनकारिणी ॥ १० ॥सर्वजृंभनिका नाम शक्तिः सर्ववशंकरी ।महासौभाग्यगंभीरा पीनवृत्तघनस्तनी ॥ ११ ॥रत्नपीठाविनिक्षिप्ता साधकेप्सितभूषणा ।नानाशस्त्रधरादिव्या वसतीहर्षितानना ॥ १२ ॥खड्गपात्र धरादेवी दिव्यवस्त्रा च योगिनी ।सर्वसिद्धिप्रदादेवी सर्वसंपत्प्रदानता ॥ १३ ॥सर्वप्रियंकरीचैव सर्वमंगलकारिणी ।सा वैष्णवी सैव शैवी महारौद्री शिवा क्षमा ॥ १४ ॥कौमारी पार्वती सैव सर्वमंगलदायिनी ।ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी परा ॥ १५ ॥वाराही चैव माहेंद्री चामुंडा सर्वदेवता ।अणिमा महिमा सिद्धिर्लघिमा शिवरुपिका ॥ १६ ॥वशित्वसिद्धिः प्राकाम्या भुक्तिरिच्छाष्टमी परा ।सर्वांकर्षणिकाशक्तिः सर्वाल्हादकरी प्रिया ॥ १७ ॥सर्वसंमोहिनीशक्तिः सर्वस्तंभनकारिणी सर्वजृंभनिका नाम शक्तिः सर्ववशंकरी ॥ १८ ॥सर्वार्थरंजिनीशक्तिः सर्वमोदनकारिणी ।सर्वार्थसाधकीशक्तिः सर्वसंपत्तिपूरकी ॥ १९ ॥सर्वमंत्रमयीशक्तिः सर्वद्वद्वक्षयंकरी ।सर्वकामप्रदादेवी सर्वदुःखप्रमोचनी ॥ २० ॥सर्वमृत्युप्रशमनी सर्वविघ्ननिवारिणी ।सर्वांगसुंदरादेवी सर्वसौभाग्यदायिनी ॥ २१ ॥सर्वरक्षाकरीदेवी अक्षवर्णविराजिता । नोमितां जगतां धात्री योगनिद्रास्वरुपिणीम् ।सर्वस्याद्या विशालाक्षी नित्या बुद्धिःस्वरुपिणी ॥ २२ ॥श्वेतपर्वतसंकाशा श्वेतवस्त्रा महासती ।नीलहस्ता रक्तमध्या सुश्वेतस्तनमंडला ॥ २३ ॥रक्तपादा नीलजंघा सिचित्रजघना विभो ।चित्रमाल्यांबरधरा चित्रगंधानुलेपना ॥ २४ ॥जपाकुसुमवर्णाभा रक्तांबरविभूषणा । रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकुंचितमूर्घना ॥ २५ ॥सर्वस्याद्या महालक्ष्मीनित्याबुद्धिस्वरुपिणी ।चतुर्भुजा रक्तदंता जगद्व्याप्यव्यवस्थिता ॥ २६ ॥नीलांजनचयप्रख्या महाद्रंष्टा महानना ।विस्तीर्णलोचनादेवी वृत्तपीनपयोधरा ॥ २७ ॥एकवीरा कालरात्रिः सैवोक्ता कामदा स्तुता ।भीमा देवीति संपूज्या चैत्रपुत्र प्रदायिनी ॥ २८ ॥या सात्त्विकगुणा प्रोक्ता मायाविष्टसरस्वती ।सा देवकार्यवसति स्वरुपमपरं दधौ ॥ २९ ॥देवस्तुता तदा गौरी स्वदेहात्तरुणीं सृजत् ।ख्याता वै कौशिकी देवी ततः कृष्णाभवत्सती ॥ ३० ॥हिमाचलकृतस्थाना कालिकेति च विश्रुता । महासरस्वतीदेवी शुंभसुरनिबर्हिणी ॥ ३१ ॥श्वेतपर्वतसंकाशा श्वेतवस्त्राविभूषणा ।नानारत्नसमाकीर्णा वेदविद्याविनोदिनी ॥ ३२ ॥शस्त्रव्रातसमायुक्ता भारती सा सरस्वती ।वागीश्वरी पीतवर्णा सैवोक्ता कामदालया ॥ ३३ ॥कृष्णवर्णा महालंबा नीलोत्पलविलोचनी ।गंभीरनाभिस्त्रिवली विभूषिततनूदरी ॥ ३४ ॥सुकर्कशा चंद्रभासा वृत्तपीनपयोधरा । चतुर्भुजा विशालाक्षी कामोनीपद्मलोचना ॥ ३५ ॥शाकंभरी समाख्याता शताक्षी वनशंकरी ।त्रिपुरा विजया भीमा तारा त्रैलोक्यसुंदरी ॥ ३६ ॥शांभवी त्रिजगन्माता स्वरात्रिपुरसुंदरी ।कामाक्षी कमलाक्षी च धृतिस्त्रिपुरतापिनी ।शुचौ शाकंबरीदेवी पूजनीया प्रयत्नतः ॥ ३७ ॥ जया जयंर्गती शिवदा जलेशी च रणप्रिया ।गजवक्रा त्रिनेत्रा च शंखिनी चापराजिता ॥ ३८ ॥महिषघ्नी शुभानंदा स्वधा स्वाहा शिवासना ।विद्युज्जिव्हा त्रिवका च चतुर्वक्रा सदाशिवा ।कोटराक्षी शिखिरवा त्रिपदा सर्वमंगला ।मयुरवदनासिद्धिर्बुद्धिः काकरवासती ॥ ३९ ॥हुंकार तालकेशी च सर्वतारा च सुंदरी ।सर्पास्या च महाजिव्हा पाशपाणिर्गरुत्मती ॥ ४० ॥ पद्मावती सुकेशी च पद्मकेशी क्षमावती । पद्मावती सुरमुखी पद्मवक्रा षडानना ॥ ४१ ॥त्रिवर्गफलदा माया रक्षोघ्नी पद्मवासिनी ।प्रणवेशी महोल्काभा विघ्नेशीस्तंभनी खला ॥ ४२ ॥ मातृकावर्णरुपा च अक्षरोच्चारिणी गृहा ।अजपा मोहिनी श्यामा जपरुपा बलोत्कटा ॥ ४३ ॥वाराही वैष्णवी जंभा वार्ताली दैत्यतापिनी ।क्षेमंकरी सिद्धिकरी बहुमाया सुरेश्र्वरी ॥ ४४ ॥ छिन्नमूर्धा छिन्नकेशी दानवेंद्रक्षयंकरी ।शाकंभरी मोक्षलक्ष्मीर्जंभिनी बगलामुखी ॥ ४५ ॥अश्वारुढा महाक्लिन्ना नारसिंही गजेश्र्वरी ।सिद्धेश्र्वरी विश्वदुर्गा चामुंडा शववाहना ॥ ४६ ॥ज्वालामुखी कराली च चिपटा खेचरेश्र्वरी ।शुंभघ्नी दैत्यदर्पघ्नी विंध्याचलनिवासिनी ॥ ४७ ॥योगिनी च विशालाक्षी तथा त्रिपुरभैरवी ।मातंगिनी करालाक्षी गजारुढा महेश्र्वरी ॥ ४८ ॥पार्वती कमलालक्ष्मीः श्वेताचलनिभात्द्युमा ।कात्यायनी शंखरवा धुर्धुरा सिंहवाहिनी ॥ ४९ ॥नारायणीश्वरी चंडी घंटाली देवसुंदरी ।विरुपावामनी कुब्जा कर्णकुब्जा घनस्तनी ॥ ५० ॥नीला शाकंभरी दुर्गा सर्वदुर्गार्तिहारिणी ।द्रंष्ट्राकितमुखा भीमा नीलपत्रशिरोधरा ॥ ५१ ॥ महिषघ्नी महादेवी कुमारी सिंहवाहिनी ।दानवांस्तर्जयंती च सर्वकामदुधा शिवा ॥ ५२ ॥कन्या कुमारिका चैव देवेशी त्रिपुरा तथा ।कल्याणी रोहिणी चैव कालिका चंडिका परा ॥ ५३ ॥शांभवी चैव दुर्गा च सुभद्रा च यशस्विनी ।कलात्मिका कलातीता कारुण्यहृदयाशिवा ॥ ५४ ॥ कारुण्यजननी नित्या कल्याणी करुणाकरा ।कामाधारा कामरुपा कालदंड स्वरुपिणी ॥ ५५ ॥कामदा करुणाधारा कालिका कामदा शुभा ।चंडवीरा चंडमाया चंडमुंडविनाशिनी ॥ ५६ ॥चंडिका शक्तिरत्युग्रा चंडिका चंडविग्रहा ।गजानना सिंहमुखी गृध्रास्या च महेश्र्वरी ॥ ५७ ॥उष्ट्रग्रीवा हयग्रीवा कालरात्रिर्निशाचरी ।कंकाली रौद्रचीत्कारी फेत्कारी भूतडामरी ॥ ५८ ॥वाराही शरभास्या च प्रेताक्षी मांसभोजनी ।कंकाली डाकिनीकाली शुल्कांगीकलहप्रिया ॥ ५९ ॥ उलूकिका शिवारावा धूम्राक्षी चित्रनादिनी ।उर्ध्वकेशी भद्रकेशी शवहस्तांत्रमालिनी ॥ ६० ॥कपालहस्ता रक्ताक्षी श्येनी रुधिरदायिनी ।खड्गिनी दीर्घलंबोष्ठी पाशहस्ता बलाकिनी ॥ ६१ ॥काकतुंडा पाशहस्ता धूर्जटी विषभक्षिणी ।पशुघ्नी पापहंत्री च मयूरी विकटानना ॥ ६२ ॥भयविध्वंसिनी चैव प्रेतास्या प्रेतवाहिनी ।कोटराक्षी लसज्जिव्हा अष्टवक्रा सुरप्रिया ॥ ६३ ॥व्यात्तास्या धूमनिःश्वासा त्रिपुरा भुवनेश्र्वरी ।बृहत्तुंडा दंडहस्ता प्रचंडा चंडविक्रमा ॥ ६४ ॥स्थूलकेशी बृहत्कुक्षी यमदूती करालिनी ।दशवक्रा दशपदा दशहस्ता विलासिनी ॥ ६५ ॥अनाद्यंतस्वरुपा च क्रोधरुपा मनोगति ।मनःश्रुतिस्मृतिघ्राणचक्षुस्त्वग्रसनात्मिका ॥ ६६ ॥योगिनीमानसंस्था च योगिसिद्धिप्रदायिका । उग्रिणी उग्ररुपा च उग्रतारा च उग्रिणी ॥ ६७ ॥उग्ररुपधरा चैव उग्रेशी उग्रवासिनी । भीमा च भीमकेशी च भीममूर्तिश्च भामिनी ॥ ६८ ॥भीमा च भीमरुपा च भीमरुपा जगन्मया ।खड्गिन्यभयहस्ता च घंटाडमरुधारिणी ॥ ६९ ॥पाशिनी नागहस्ता च योनिन्यंकुशधारिणी ।यज्ञा च यज्ञमूर्तिश्च दक्षयज्ञविनाशिनी ॥ ७० ॥यज्ञदीक्षा धरादेवी यज्ञसिद्धिप्रदायिनी ।हिरण्यबाहुचरणा शरणागतपालिनी ॥ ७१ ॥ अनाम्न्यनेक नाम्नीच निर्गुणा च गुणात्मिका ।नमो जगत्प्रतिष्ठा च सर्वकल्याणमूर्तिनी ॥ ७२ ॥ब्रह्मादिसुर वंद्या च गंगाधरजटास्थिता । महामोहा महादीप्ति सिद्धिर्विद्या च योगिनी ॥ ७३ ॥योगिनी चंडिका सिद्धा सिद्धसिद्धा शिवप्रिया ।शरयूर्गोमती भीमा गौतमी नर्मदा मही ॥ ७४ ॥भागीरथी च कावेरी त्रिवेणी गंदकी शरा ।सुषुप्तिर्जागृतिर्निद्रा स्वप्नातुर्या च चक्रिणी ॥ ७५ ॥ अहिल्यारुंधती चैव तारा मंदोदरी तथा ।देवी पद्मावती चैव त्रिपुरेशस्वरुपिणी ॥ ७६ ॥एकवीरा महादेवी कनकाद्याश्चदेवता ।शूलिनी परिघास्त्रा च खड्गिन्याबाह्यदेवता ॥ ७७ ॥कौबेरी धनदा याम्याग्नेयी वायुतनुर्निशा ।ईशानी नैर्ऋतिः सौम्या माहेंद्री वारुणी तथा ॥ ७८ ॥सर्वर्षिःपूजनीयांघ्रिः सर्वयंत्राधिदेवता ।सप्तधातुमयीमूर्तिः सप्तधात्वंतराश्रया ॥ ७९ ॥देहपुष्टिर्मनस्तुष्टिरत्नपुष्ठिर्बलोद्धता ।तपोनिष्ठा तपोयुक्ता तापसःसिद्धिदायिनी ॥ ८० ॥ तपस्विनी तपःसिद्धिः तापसी च तपःप्रिया ।औषधी वैद्यमाता च द्रव्यशक्तिःप्रभाविनी ॥ ८१ ॥वेदविद्या च विद्या च सुकुला कुलपूजिता । जालंधरशिरःछेत्री महर्षिहितकारिणी ॥ ८२ ॥योगनीतिर्महायोगा कालरात्रिर्महारवा ।अमोहा च प्रगल्भा च गायत्रीहरवल्लभा ॥ ८३ ॥विप्राख्या व्योमकारा च मुनिविप्र प्रियासती ।जगत्कीर्तिर्जगत्कारी जगश्वासा जगन्निधिः ॥ ८४ ॥जगत्प्राणा जगद्दंष्ट्रा जगज्जिव्हा जगद्रसा ।जगचक्षुर्जगत्घ्राणा जगच्छोत्रा जगन्मुखा ॥ ८५ ॥ जगच्छत्रा जगद्वक्रा जगद्भर्त्रीजगत्पिता ।जगत्पत्नी जगन्माता जगद्धात्री जगत्सुहृत् ॥ ८६ ॥जगद्धात्री जगत्प्राणा जगद्योनिर्जगन्मती ।सर्वस्तंभी महामाया जगद्दीक्षाजया तथा ॥ ८७ ॥ भक्त्यैयलक्ष्या द्विविधा त्रिविधा च चतुर्विधा ।इंद्राक्षी पंचरुपा च सहस्त्ररुपधारिणी ॥ ८८ ॥मूलादिवासिनी चैव अंबापुर निवासिनी ।नवकुंभा नवरुचिः कामज्वाला नवानना ॥ ८९ ॥ गर्भज्वाला तथा बाला चक्षुर्ज्वाला नवांबरा ।नवरुपा नवकला नवनाडी नवानना ॥ ९० ॥नवक्रीडा नवविधा नवयोगिनिका तथा ।वेदविद्या महाविद्या विद्यादात्री विशारदा ॥ ९१ ॥कुमारी युवती बाला कुमारीव्रत चारिणी ।कुमारी भक्तसुखिनी कुमारीरुपधारिणी ॥ ९२ ॥भवानी विष्णुजननी ब्रह्मादिजननी परा ।गणेशजननी शक्तिः कुमारजननीशुभा ॥ ९३ ॥भाग्याश्रया भगवती भक्ताभीष्टप्रदायिनी ।भगात्मिका भगाधारा रुपिणी भगमालिनी ॥ ९४ ॥ भवरोगहरा भव्या सुभ्रुःपरममंगला ।शर्वाणी चपलापांगी चारुचंद्राकलपरा ॥ ९५ ॥ विशालाक्षी विश्वमाता विश्ववंद्या विलासिनी ।शुभप्रदा शुभावार्ता वृत्तपीनपयोधरा ॥ ९६ ॥अंबासंसारमथिनी मृडानी सर्वमंगला ।विष्णुसंसेविता शुद्धाब्रह्मादिसुरसेविता ॥ ९७ ३परमानंदशक्तिश्च परमानंदरुपिणी ।परमानंदजननी परमान्नंदप्रदायिनी ॥ ९८ ॥परोपकारनिरता परमाभक्तवत्सला ।आनंदभैरवी बाला भैरवी बटुभैरवी ॥ ९९ ॥ श्मशान भैरवी काली भैरवी रुरुभैरवी ॥ १०० ॥पूर्णचंद्राभवदना पूर्णचंद्रनिभांशुका ।शुभलक्षणसंपन्ना शुभानंतगुणार्णवा ॥ १०१ ॥शुभसौभाग्यनिलया शुभाचाररताप्रिया ।सुखसंभोगभवना सर्वसौख्यनिरुपिणी ॥ १०२ ॥अवलंबा तथा वाग्मी प्रवरा वाद्यवादिनी । घूर्णादिपट्टला कोपादुतीर्णकुटिलानना ॥ १०३ ॥पापदा पापनाशा च ब्रह्माग्नीशापमोचनी ।सर्वातीता च उच्छिष्टा चांडाली परिघायुधा ॥ १०४ ॥ॐ कारी वेदकारी च र्‍हींकारी सकलगमा ।यंकारी चर्चिता चर्ची चर्चिता चक्ररुपिणी ॥ १०५ ॥महाव्याधवरारोहा धनुर्बाणधरा धरा ।लंबिनी च पिपासा च क्षुधा संदेशिका तथा ॥ १०६ ॥ भुक्तिदा मुक्तिदा देवी सिद्धिदा शुभदायिनी ।सिद्धिदा बुद्धिदा माता वर्मिणी फलदायिनी ॥ १०७ ॥चन्डिका चन्डमथिनी चंडदर्पनिवारिणी ।चंडमार्तंडनयना चंद्राग्निनयना सती ॥ १०८ ॥सर्वांगसुंदरी रक्ता रक्तवस्त्रोत्तरीयका ।जपापावकसिंदुरा रक्तचंदनधारिणी ॥ १०९ ॥कर्पूरागरुकस्तूरीकुंकुमद्रवलेपिनी ।विचित्ररत्नपृथिवी कल्मषांघ्रीतलास्थिता ॥ ११० ॥भगात्मिका भगाधारा रुपिणी भगमालिनी ।लिंगाभिधायिनी लिंगप्रियलिंगानिवासिनी ॥ १११ ॥भगलिंगस्वरुपा च भगलिंगसुखावहा ।स्वयंभूकुसुमप्रीता स्वयंभूकुसुमार्चिता ॥ ११२ ॥स्वयंभुकुसुमस्नाता स्वयंभूपुष्पतर्पिता ।स्वयंभूपुष्पतिलका स्वयंभूपुष्पधारीणी ॥ ११३ ॥पुंडरीककरा पुण्या पुण्यदा पुण्यरुपिणी ।पुण्यज्ञेया पुण्यवंद्या पुण्यमूर्तिः पुरातना ॥ ११४ ॥ अनवद्या वेदवेद्या वेदवेदांतरुपिणी । मायातीता सृष्टमाया माया धर्मात्मवंदिता ॥ ११५ ॥असृष्टा संगरहिता सृष्टिहेतुः कपर्दिनी ।वृषारुढा शूलहस्ता स्थितिसंहारकारिणी ॥ ११६ ॥मंदस्थितिः शुद्धरुपा शुद्धचित्तमुनिस्तुता ।महाभाग्यवती दक्षा दक्षाध्वर विनाशिनी ॥ ११७ ॥ अपर्णानन्यशरणा भक्ताभीष्टफलप्रदा ।नित्या सुंदरसर्वांगी सच्चिदानंदलक्षणा ॥ ११८ ॥कामजा केलिका केलि कर्षा कर्बुरकालजा ।गिरिजागर्वजा गोत्रा अकुला कुलजा तथा ॥ ११९ ॥दिनजा दिनमाता च वेदजा वेदसंभृता ।क्रोधजा कुटजा धारा परमा बलगर्विता ॥ १२० ॥सर्वलोकोत्तरा भावा सर्वकालोद्भवात्मिका ।कुंडगोलोद्भवा प्रीता कुंडगोलोद्भवात्मिका ॥ १२१ ॥कुंदपुष्पसदाप्रीति पुष्पगोलसदारतिः ।शुक्रमूर्तिः शुक्रदेहा शुक्रपुजितमूर्तिनी ॥ १२२ ॥विदेहा विमला शुक्रा चौंडा कर्नाटकी तथा ।त्रिमाता उत्कला मौंडी विरेखा वीरवंदिता ॥ १२३ ॥शामला गौरवी पीना मागधेश्वर वंदिता ।पार्वती कर्मनाशा च कैलासवासिका तथा ॥ १२४ ॥शालिग्रामशिला माली शार्दूला पिंगकेशिनी ।नारदा शारदा चैव रेणुका गगनेश्वरी ॥ १२५ ॥ धेनुरुपा रुक्मिणी च गोपिका यमुनाश्रया ।सुकंठा कोकिला मेना चिरानंदा शिवात्मिका ॥ १२६ ॥कंदर्पकोटिलावण्या सुंदरा सुंदरस्तनी ।विश्वपक्षा विश्वरक्षा विश्वनाथ प्रियासती ॥ १२७ ॥योगिनी योगयुक्ता च योगांगध्यानशालिनी ।योगट्टधरा मुक्ता मुक्तानांपरामागतिः ॥ १२८ ॥कुरुक्षेत्रवती काशि मथुरा कांत्यवंतिका ।अयोध्या द्वारका माया तीर्था तीर्थकरीप्रिया ॥ १२९ ॥त्रिपुष्करा प्रमेया च कोशस्था कोशवासिनी ।कुशावर्ता कौशिकी च कोशांबा कोशवर्धिनी ॥ १३० ॥पद्मकोशा कोशदाक्षी कुसुंभकुसुमप्रिया । तुलाकोटि च काकुत्स्था कुक्कुटा च रवाश्रया ॥ १३१ ॥ॐ र्‍हीं यं यां रुद्र दैवत्यायै योगेश्वर्ये स्वाहा ।पुत्रदा पौत्रदा पौत्री दिव्यादा दिव्यभोगदा ॥ १३२ ॥स्त्रुक्स्त्रुवा सामिधेनी च सुश्रद्धा श्राद्धदेवता । माता मातामही तृप्तिः पितुर्माता पितामही ॥ १३३ ॥स्नुषा दौहित्रिणी पुत्री दोलाक्रीडाभिनंदिनी ।पोषिणीशोषिणीशक्तिर्दीर्घकेशी सुलोमशा ॥ १३४ ॥सप्ताब्धिसंश्रयानित्या सप्तद्विपाब्धिमेखला ।सूर्यदीप्तिर्वज्रशक्तिर्मदोन्मत्ता च पिंगला ॥ १३५ ॥ सुचक्रा चक्रमध्यस्था चक्रकोणनिवासिनी ।सर्वमंत्रमयी विद्या सर्वमंत्राक्षरावरा ॥ १३६ ॥सर्वज्ञदा विश्वमाता भक्तानुग्रहकारिणी ।विश्वप्रिया प्राणशक्तिर्नंतगुणनामधीः ॥ १३७ ॥पंचाशद्विष्णुशक्तिश्च पंचाशन्मातृकामयी ।द्विपंचाशद्वपुश्रेणी त्रिषष्ट्यक्षरसंश्रया ॥ १३८ ॥चतुःषष्टिमहासिद्धिर्योगिनी वृंदवंदिनी ।चतुःषड्वर्णनिर्णेयी चतुःषष्टिकलानिधिः ॥ १३९ ॥अष्टषष्टिमहातीर्थक्षेत्रभैरववासिनी ।चतुर्नवतिमंत्रात्मा षण्णवत्याधिकाप्रिया ॥ १४० ॥सहस्त्रपत्रनिलया सहस्त्रफणिभूषणा । सहस्त्रनामसंस्तोत्रा सहस्त्रक्षबलापहा ॥ १४१ ॥प्रकाशाख्या विशालाक्ष्या प्रकाशिकविमर्शका ।निर्वाणचरणदेवी चतुश्चरणसंज्ञका ॥ १४२ ॥चतुर्विज्ञानशक्त्याढ्या सुभगा च क्रियायुता ।स्मरेशा शांतिदा इच्छा इच्छाशक्तिसमन्विता ॥ १४३ ॥निशांबरा च राजन्यपूजिता च निशाचरी । सुंदरी चौर्ध्वकेशी च कामदा मुक्तकेशिका ॥ १४४ ॥ मानिनीतिसमाख्याता वीराणांजयदायिनी ।यामलीति समाख्याता नासाग्रबिंदुमालिनी ॥ १४५ ॥या कंका च करालांगी चंद्रकाला च संश्रया ।चक्रिणी शंखिनी रौद्रा एकपादा त्रिलोचना ॥ १४६ ॥भीषणीर्भैरवी भीमा चंद्रहासा मनोरमा । विश्वरुपा महादेवी घोररुपा प्रकाशिका ॥ १४७ ॥कपालमालिकायुक्ता मूलपीठस्थिता रमा ।योगिनी विष्णुरुपा च सर्वदेवर्षिपूजिता ॥ १४८ ॥सर्वतीर्थपरादेवी तीर्थदक्षिणतःस्थिता ।श्रीसदाशिवउवाच ।दिव्यनाम सहस्त्रं ते योगेश्वर्यामयोदितं ॥ १४९ ॥यः पठेत्पाठयेद्वापि स मुक्तो नात्र संशयः ।अष्टम्यां भूतपौर्णम्यां नवम्यां दर्शभौमयोः ॥ १५० ॥अयनेषूपरागे च पुण्यकाले विशेषतः ।सर्वसौभाग्यसिद्धर्थं जपनीयं प्रयत्नतः ॥ १५१ ॥सर्वाभिष्टकरं पुण्यं नित्यमंगलदायकं ।इयं नामावली तुभ्यं मयाद्य समुदीरिता ॥ १५२ ॥गोपनीया प्रयत्नेन नाख्येया च कदाचन ।भक्ताय ज्येष्ठपुत्राय देयं शिष्याय धीमते ॥ १५३ ॥ आवहंतीतिमंत्रेण युक्तान्येतानि सादरं ।यो जपेत्सततं भक्त्या सकामांल्लभतेध्रुवम् ॥ १५४ ॥ कार्याण्यावाहनादीनि देव्याशुचिरतात्मभिः ।आवहंतीति मंत्रेण प्रत्येकं च यथाक्रमम् ॥ १५५ ॥कर्तव्यं तर्पनं चापि तेन मंत्रेण मूलवत् ।तदन्वितैश्च होमोपि कर्तव्यं स्तैश्च मूलतः ॥ १५६ ॥एतानि दिव्य नामानिश्रुत्वा ध्यात्वाऽपि योनरः । ध्यात्वा देवीं च सततं सर्वकामार्थसिद्धये ॥ १५७ ॥एतज्जपप्रसादेन नित्यतृप्तोवसाम्यहं ।संतुष्टहृदयो नित्यं वसाम्यत्रार्चयं शिवाम् ॥ १५८ ॥स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले विशेषतः । तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत् ॥ १५९ ॥राजद्वारे सभास्थाने विवादे विप्लवे तथा ।चोरव्याघ्रभयं नास्ति संग्रामे जयवर्धनम् ॥ १६० ॥क्षयापस्मारकुष्ठादितापज्वर निवारणम् । महाज्वरं तथात्युग्रं शीतज्वरनिवारणम् ॥ १६१ ॥दोषादिसंन्निपातं च रोगाणां हंति सर्वशः ।भूतप्रेतपिशाचाश्च रक्षां कुर्वंतिसर्वशः ॥ १६२ ॥जपेत्सहस्त्रनमाख्यं योगिन्याः सर्व कामदम् ।यं यं चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् ॥ १६३ ॥ त्रिकालमेककालं वा श्रद्ध्या प्रयतः पठेत् ।सर्वान् रिपून्क्षणाज्जित्वा यः पुमांश्र्रियमाप्नुयात् ॥ १६४ ॥डाकिनी शाकिनी चैव वेतालब्रह्मराक्षसां ।कूष्मांडादिभयं सर्वं नश्यति स्मरणात्ततः ॥ १६५ ॥वने रणे महाघोरे कारागृहनियंत्रके ।सर्वसंकटनाशार्थं स्तोत्रपाठः सुसिद्धये ॥ १६६ ॥वंध्या वा काकवंध्या वा मृतवंध्या च यांगना । श्रुत्वा स्तोत्रमिदं पुत्रांल्लभते चिरजीविनः ॥ १६७ ॥स्वयंभुकुसुमैः शुक्रैः सुगंधिकुसुमान्वितैः ।कुंकुमागरुकस्तुरीसिंदूरादिभिरर्चयेत् ॥ १६८ ॥फलपुष्पादिभिर्युक्तैः मध्वाज्यैःपायसान्वितैः ।पक्वाने षड्रसैर्भोज्यैः स्वाद्वंनैश्च चतुर्विधैः ॥ १६९ ॥कुमारीं पूजयेत्भक्त्या ब्राह्मणांश्च सुवासिनीः ।शक्तितो दक्षिणां दत्वा वासोलंकारभूषणैः ॥ १७० ॥अनेन विधिना पूज्या देव्या संतुष्टकारकम् ।सहस्त्रनामपाठात्तु कार्यसिद्धिर्नसंशयः ॥ १७१ ॥रमाकांत सुराधीश प्रोक्तं गुह्यतरं मया ।नासूयकाय वक्तव्यं न मूर्खायाततायिने ॥ १७२ ॥सत्यं सत्यं पुनः सत्यं उध्दृत्य भुजमुच्यते । नानया सदृशी विद्या न देव्या योगिनी परा ॥ १७३ ॥इति श्रीरुद्रयामले उत्तरखंडे देवीचरित्रे विष्णुशंकरसंवादे योगेश्र्वरीसहस्त्रनाम स्तोत्रं संपूर्णम् ॥