Wednesday, 7 July 2021
लग्नयोग कसा- केव्हा ? September 1, 2019 townparle 0 Comments(मुलाचं अथवा मुलीचं लग्नाचं वय झालं की, लग्न कधी होणार, प्रेमविवाह की ठरवून, जोडीदार कसा असेल असे अनेक प्रश्न घरच्यांच्या आणि मुलामुलींच्याही मनात रुंजी घालायला लागतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी भविष्यात डोकावण्याचा मार्ग म्हणजे ज्योतिष. दिशादिग्दर्शन करणा–या या शास्त्राच्या दृष्टीकोनातून ‘लग्न’ या विषयाचा निरनिराळ्या निष्णात ज्योतिषतज्ञांनी घेतलेला वेध या अंकात देत आहोत.)लग्न कुंडली आणि राशी कुंडली म्हणजे काय ?हा बहुसंख्य लोकांना नेहमीच पडणारा प्रश्न. याविषयी अगदी ढोबळमनाने सांगायचे तर- राशीकुंडली ही व्यक्तीच्या जन्माचे वेळी जी रास असते त्या राशीची कुंडली असते. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती जन्मणा–या व्यक्तीची रास असते. कुंडलीतील प्रथम स्थानात ती रास अंकरुपाने मांडलेली असते व त्या राशीपासून पुढील अंक कुंडलीच्या द्वितीय, तृतीय याप्रमाणे पुढील स्थानात क्रमाने मांडलेले असतात. चंद्र सुमारे सव्वादोन दिवस एका राशीत असतो. जन्म झाल्यावेळी तो ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची जन्मरास वा चंद्ररास असते.लग्नकुंडली म्हणजे व्यक्तीच्या जन्माचे वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते ती रास म्हणजे त्या व्यक्तीचे जन्मलग्न असते. लग्नकुंडलीचा आपण ज्याला ‘लग्न’ अथवा विवाह म्हणतो त्याच्याशी तसा काही संबंध नाही. मेष ते मीनपर्यंत बारा राशी पूर्वकडून पश्चिमेकडे ‘जायंट व्हिल’ प्रमाणे गोल फिरत असतात. प्रत्येक रास पूर्व क्षितिजावर सुमारे दोन तास असते. या दोन तासात जन्म झाला असता ती रास त्यावेळी जन्मणा–याचे लग्न असते. लग्नकुंडली मांडताना प्रथमस्थानात त्या राशीचा अंक मांडून पुढील स्थानात क्रमाने राशीचे अंक मांडलेले असतात. भविष्य वर्तविताना लग्नकुंडलीलाच जास्त महत्व असते. ज्यांना जन्मवेळ निश्चित माहीत नसते त्यांना राशी कुंडलीशिवाय पर्याय नसतो.लग्नकुंडली व राशीकुंडली म्हणजे काय आहे हे आपण बघितले. आता सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विवाह या विषयाची आपण माहिती करुन घेऊयात.विवाह केव्हा होईल ? जोडीदार कसा असेल ? दूरचा की जवळचा, वैवाहिक सौख्य लाभेल का ? असे अनेक प्रश्न मुला-मुलींच्या तसेच त्यांच्या पालकांच्या मनात सतत येत असतात.सोबत दिलेल्या कुंडलीत दर्शविलेले सप्तमस्थान हे विवाहाच्या बाबतीतील महत्वाचे स्थान आहे.काही महत्वाच्या गोष्टी –‘लग्न’ या विषयावर विचार करताना मुलाच्या कुंडलीत चंद्र-शुक्र तर मुलीच्या कुंडलीत रवि-शुक्र हे महत्वाचे ग्रह असतात.शनि, मंगळ आणि राहू हे ग्रह विवाहाला विलंब करतात. विवाहसौख्यात बाधा आणतात.गुरु ग्रह नेहमीच शुभ असतो. कुंडलीतील त्याच्या स्थितीवर वैवाहिक सौख्य अवलंबून असते.ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसला तरी राशी आणि ग्रह यांची अगदी थोडीतरी माहिती असणे योग्य ठरते.मेष ही मंगळाची, वृषभ ही शुक्राची, मिथुन ही बुधाची, कर्क ही चंद्राची, सिंह ही रविची, कन्या ही बुधाची, तूळ ही शुक्राची, वृश्चिक ही मंगळाची, धनु ही गुरुची, मकर आणि कुंभ शनिच्या आणि मीन ही गुरुची रास आहे.सप्तमस्थानात जी रास असते त्या राशीचा ग्रह हा वैवाहिक बाबतीत महत्वाचा ग्रह असते. उदा. सप्तम स्थानात कन्या रास असेल तर त्या राशीचा ग्रह बुध हा महत्वाचा ठरेल.विवाहाला विलंब –विवाहाला विलंब होण्यात शनि, मंगळ आणि राहू यांचा हात असतो. शनि प्रथमस्थानी, पंचमस्थानी, सप्तमस्थानी किंवा दशमस्थानी असता, मंगळ प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी किंवा बाराव्या स्थानी असता, तसेच राहू प्रथमस्थानी किंवा सप्तमस्थानी असता विवाहाला विलंब होतो.पत्रिकेत शनिदोष असता विवाह ३० वयानंतर होतो. मंगळदोष असता विवाह २८ वयानंतर होतो. राहूदोष असता ३२ ते ३५ वयापर्यंतही विवाह होत नाही.असमाधानकारक विवाह –विवाहाला विलंब लावणा–या योगाबरोबरच सप्तमात असणा–या राशीचा ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बराव्या स्थानी असता.सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानातील राशींचे ग्रह सप्तम स्थानात असता वा सप्तम स्थानाच्या राशीच्या ग्रहाबरोबर इतर कुठल्या स्थानात असता विवाह असमाधानकारक ठरतो.पुरुषाच्या कुंडलीत चंद्र, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहुबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.स्त्रीच्या कुंडलीत रवि, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहूबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.मंगळाची भूमिका –वैवाहिक बाबतीत मंगळ हा ग्रह खलनायकाची भूमिका बजावत असतो. मंगळ हा ग्रह प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी आणि बाराव्या स्थानी असता ‘मंगळाची कुंडली आहे’ असे समजले जाते. त्याचे हे वास्तव्य त्रासदायक असेच असते. त्यामुळेही विवाहाला उशीर होतो.मंगळ पाहण्याची आवश्यकता नाही, त्याचा फार बाऊ करु नये असे जरी मानले तरी वरील स्थानी मंगळ असता त्याचा अनुभव त्रासदायक असाच येतो. विवाह २८ वयानंतर होतो. लग्नाला उशीर होणे, लग्नात अडचणी येणे, ठरलेला विवाह मोडणे.प्रेमसंबंध फिसकटणे, लग्नानंतर मतभेद होणे, गृहसौख्यात कटकटी असे योग संभवतात. मंगळ पाहताना दुराग्रही भूमिका ठेवण्याची आवश्यकता नसली तरी त्याच्या फलिताची कल्पना अवश्य असावी.सुखी विवाह –चंद्र-गुरु, रवि-गुरु, सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरु यांचे शुभयोग असता विवाह योग्य यांचे शुभयोग असता विवाह योग्य वयात होतो. वैवाहिक जीवन सुखावह होते.‘शुभयोग’ म्हणजे गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून मोजले असता त्याच्या पाचव्या स्थानी, सातव्या स्थानी किंवा नवव्या स्थानी रवि, चंद्र किंवा सातव्या स्थानाचा ग्रह असणे.प्रेमविवाह –प्रेमाचे माणूस मिळावे, प्रेमविवाह व्हावा ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण त्यासाठी जन्माचे वेळी तसे ग्रह घेऊन यावे लागते. यादृष्टीने पाहता पाचवे आणि सातवे स्थान महत्वाचे असते. पाचव्या स्थानाचा ग्रह सातव्या स्थानी असणे, सातव्या स्थानाचा ग्रह पाचव्या स्थानी असणे, किंवा या कोणत्याही स्थानी दोन्ही ग्रह एकत्र असणे, हे ग्रह शुक्र या ग्रहाबरोबर असणे, चंद्र-गुरु, रवि-गुरु यांचा शुभयोग असणे, असे ग्रहमान प्रेमविवाहाला व सुखी विवाहालाही पोषक असते.विवाह केव्हा होईल ?पुरुषाच्या बाबतीत चंद्र-गुरु एकत्र असता तसेच चंद्र गुरुपासून पाच किंवा सातव्या स्थानात असता.स्त्रियांच्या बाबतीत रवि-गुरु एकत्र, रवि गुरुपासून पाचव्या किंवा सातव्या स्थानात असता होऊ शकतो. शनि, मंगळ, राहू यांच्यापैकी कशाचा दोष नसेल तर विवाहयोग लवकर म्हणजे योग्य वयात येतो.स्त्रीच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण तिच्या जन्मगुरुवरुन होते त्यावेळी ती समंजस होते. तसेच पुरुषाच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण त्याच्या जन्मराहूवरुन होते त्यावेळी हा योग येतो. लवकर किंवा उशीरा विवाह याची वयोमर्यादा देश, काल, जाती, समाजानुसार वेगवेगळी असू शकते. ती एकदा निश्चित झाल्यावर गोचर गुरुच्या भ्रमणावरुन त्याचा कालनिर्णय करता येतो.गोचरीचा गुरु ज्यावर्षी प्रथम, तृतीय, सप्तम किंवा एकादशस्थानी येतो, त्यावर्षी विवाहयोग संभवतो. त्याचवेळी जर चंद्र, रवि, शुक्र वा सप्तमस्थानाच्या राशीचा ग्रह यांच्याशी गुरुचा शुभयोग होत असेल तर विवाह होण्याची दाट शक्यता असते.लवकर विवाह –स्त्री-पुरुषांच्या कुंडलीत रवि-गुरु असे एकत्र किंवा शुभयोगात असता, सप्तमस्थानचा ग्रह गुरुच्या बरोबर किंवा गुरुच्या शुभयोगात असता, सप्तमस्थानात चंद्र किंवा शुक्र असता, सप्तमस्थानावर गुरुची दृष्टी असता म्हणजेच जन्मकुंडलीत गुरु प्रथम, तृतीय किंवा अकराव्या स्थानी असला तरी विवाह लवकर होतो.उशीरा विवाह –सप्तमस्थानात रवि, शनि, मंगळ किंवा राहू असता विवाहाला विलंब होतो. तसेच स्त्रीच्या कुंडलीत रवि-शनि, रवि-मंगळ, रवि-राहू अशा जोड्या असता विवाहाला विलंब होतो. तर पुरुषाच्या कुंडलीत चंद्र-शनि, चंद्र-मंगळ, चंद्र-राहू अशा जोड्या असता विवाहाला विलंब होतो.जोडीदार कोणत्या दिशेचा असेल –बारा राशींना दिशा वाटून देण्यात आल्या आहेत.पूर्व दिशा : मेष, सिंह धनु,पश्चिम दिशा : मिथुन, तूळ, कुंभदक्षिण दिशा : वृषभ, कन्या, मकरउत्तर दिशा : कर्क, वृश्चिक, मीनसर्वसाधारण सप्तमस्थानाचा ग्रह ज्या राशीत असेल त्या दिशेचा जोडीदार मिळेल असे मानले जाते. आणखी एक पद्धत अशी आहे की, स्त्रीच्या बाबतीत सप्तमस्थानाचा ग्रह किंवा आणि पुरुषांच्या बाबतीत सप्तमस्थानाचा ग्रह किंवा चंद्र १२,१, २ या स्थानी असता पूर्व दिशा, ३,४,५ या स्थानी असता उत्तर दिशा, ६,७,८ या स्थानी असता पश्चिम दिशा आणि ९,१०,११ या स्थानी असता दक्षिण दिशेचा जोडीदार मिळेल असे मानले जाते.जोडीदार जवळचा की दूरचा ?स्त्रीची कुंडली असता सप्तमचा ग्रह आणि रवि, तर पुरुषांची कुंडली असता सप्तमाचा ग्रह आणि चंद्र पत्रिकेत कुठे आहेत हे बघता – १,२,३, स्थानात असता अगदी जवळचा ४,५,६ स्थानात असता त्यापेक्षा थोडा दूरचा, ७,८,९ स्थानात असता ब–यापैकी दूरचा आणि १०,११,१२, या स्थानी असता फार दूरचा जोडीदार मिळतो.जोडीदाराचे रंगरुप –जोडीदार दिसायला कसा असेल हा तर प्रत्येकाच्याच मनातील सर्वात औत्सुक्याचा प्रश्न असतो. या करिता सप्तमस्थानातील राशी, सप्तमस्थानातील ग्रह यांचा विचार करावा लागतो. ग्रहांच्या स्वभावगुणधर्माप्रमाणे सहचराचे स्वभावगुण असतात आणि राशीप्रमाणे शरीरबांधा असतो. सप्तमस्थानी ज्या ग्रहाची रास असते त्या ग्रहाच्या वर्णनाप्रमाणे जोडीदाराचे वर्णन असते. किंवा एखादा ग्रह जर त्या स्थानात असेल तर त्या ग्रहाप्रमाणे त्याचे वर्णन असते. याकरिता प्रत्येक ग्रहाचा बारकाईने अभ्यास असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर, सप्तमस्थानी मंगळाची रास वा मंगळ असता किंवा मंगळ असता भांडखोर, तापट, अरेरावी करणारा, वाद घालणारा, हट्टी, तामसी, विषयासक्त, वर्चस्व गाजवणारा, उच्छृंखल स्वभावाचा, तांबूल किंवा कृष्णवर्णी असा जोडीदार असतो. सप्तमस्थानी शुक्राची रास किंवा शुक्र ग्रह असता देखणी, प्रेमळ, शौकिन, कलावान, आनंदी, समंजस, कदर करणारा, शांत स्वभावाचा, उत्तम व्यक्तिमत्वाचा, आधुनिकतेची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाहयोग लवकर येतो. राहू, मंगळ, किंवा हर्षल याच्या कुयोगात असता प्रेमभंग, विभक्तपणा असे प्रसंग येतात. सप्तमस्थानी बुधाची रास किंवा बुध ग्रह असता चतुर, विश्र्वासू, हसतमुख, व्यवहारदक्ष, बोलका, बुद्धिमान, विनोदी स्वभावाचा, सतत हसत बोलणारा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, प्रेम करणारा, हलका कानाचा, उंचीने मध्यम, गुणी असा जोडीदार असतो. सप्तमस्थानी चंद्राची रास किंवा चंद्र असता चंचल स्वभावाचा, भावनावश, प्रेमळ, लहरी, कलावान, अनेक गोष्टींची आवड असलेला, सर्वांशी मिसळून राहणारा, समाजकार्याची आवड असणारा, संसारदक्ष, प्रसिद्ध प्रवासाची आवड, गौरवर्णी, छानछौकीने राहणारा, दिसण्यास आकर्षक असा असतो. विवाहयोग लवकर येतो. सप्तमस्थानी रविची रास किंवा रवि ग्रह असता मानी, गर्विष्ठ, तडफदार, रुबाबदार, हुकमत गाजवणारा, स्वाभिमानी, दुस–याला मदत करणारा, अन्यायाची चीड असणारा, एकमेकांविषयी आकर्षण कमी असलेला, उच्च घराण्यातील असतो. विवाहयोग उशीरा येतो. शुभग्रहांची साथ असता विवाह सुखावह होतो. सप्तमस्थानी गुरुची रास किंवा गुरु ग्रह असता विद्वान, प्रेमळ, हुशार, धार्मिक-सात्विक वृत्तीचा, ज्ञानी, ज्ञानदान करणारा, समाजकार्याची आवड असणारा, समंजस, शांत स्वभावाचा, व्यवहारी, आदरणीय व्यक्तिमत्वाचा असा असतो. स्वभावभिन्नतेमुळे आकर्षण कमी राहते. गुरुच्या दृष्टीत असता विवाह लवकर होतो. शनिच्या दृष्टीत असता विवाह उशीरा होतो.सप्तमस्थानी शनिची रास किंवा शनि असता अत्यंत धूर्त, कावेबाज, विश्र्वासास अपात्र, कर्तव्यनिष्ठ, कष्टाळू, सोशिक स्वभावाचा, हवतेत मनोरे बांधणारा, हलक्या कानाचा, राजकारणाची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाह उशीरा होतो. विवाहसौख्य साधारण मिळते.वर वर्णन केलेल्या स्वभावर्णनाचा अनुभव विशेषत: सप्तमस्थानी राशीपेक्षा ग्रह असता विशेष येतो.शनि बिघडला असता विषयवासना कमी असलेला वा नपुसंक सहचर असतो.घटस्फोट –पूर्णपणे विस्कळीत झालेले विवाहजीवन म्हणजे घटस्फोट ! या बाबतीत महत्वाची भूमिका बजावणारा ग्रह म्हणजे हर्षल. सुरुवातीला उल्लेख केलेले काही कुयोग असून जर हर्षल हा ग्रह सप्तमस्थानी किंवा प्रथमस्थानी असेल, तसेच कुंडलीत कोणत्याही स्थानी चंद्र-हर्षल, रवि-हर्षल, एकत्र किंवा समोरासमोर असतील तर घटस्फोटाची दाट शक्यता असते. या योगामुळे विवाहाच्या बाबतीत नाटयपूर्ण घटना, मतभिन्नता, फसवणूक इत्यादी घटना संभवतात.होराभूषण शोभा प्रभू, पुणेPc: google
Friday, 28 May 2021
पितृस्तोत्र
🌹 *पित्रृस्तोत्र* 🌹
मार्कण्डेय उवाच
एवं तु स्तुवतस्तस्य तेजसो राशिरुच्छ्रितः ।
प्रादुर्बभूव सहसा गगनव्याप्तिकारकः ॥ ३७ ॥
तद् दृष्ट्वा सुमहत्तेजः समाच्छाद्य स्थितं जगत् ।
जानुभ्यामवनीं गत्वा रुचिः स्तोत्रमिदं जगौ ॥ ३८ ॥
रुचिरुवाच
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ॥ १ ॥
इद्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान्नमस्यामि कामदान् ॥ २ ॥
मन्वादीनां च नेतारः सूर्याचन्द्रमसोस्तथा ।
तान्नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्युदधावपि ॥ ३ ॥
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा ।
द्दावापृथिव्योश्र्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः ॥ ४ ॥
प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्र्वरेभ्यश्र्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः ॥ ५ ॥
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वायम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ॥ ६ ॥
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ॥ ७ ॥
अग्निरुपांस्तथैवान्यात्रमस्यामि पितृनहम् ।
अग्निसोममयं विश्र्वं यत एतदशेषतः ॥ ८ ॥
ये च तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः ।
जगत्स्वरुपिणश्र्चैव तथा ब्रह्मस्वरुपिणः ॥ ९ ॥
तेभ्योsखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः ।
नमो नमो नमस्तेsतु प्रसीदन्तु स्वधाभुजः ॥ १० ॥
मार्कण्डेय उवाच
एवं स्तुतास्ततस्तेन तेजसो मुनिसत्तमाः ।
निश्र्चक्रमुस्ते पितरो भासयन्तो दिशो दश ॥ ११ ॥
निवेदनं च यत्तेन पुष्पगन्धानुलेपनम् ।
तद्भूषितानथ स तान् ददृशे पुरतः स्थितान् ॥ १२ ॥
प्रणिपत्य रुचिर्भक्त्या पुनरेव कृताञ्जलिः ।
नमस्तुभ्यं नमस्तुभ्यमित्याह पृथगादृतः ॥ १३ ॥
॥ इति श्री गरुड पुराणे रुचिकृतं पित्रृस्तोत्रं संपूर्णम् ॥
*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
Tuesday, 11 May 2021
जवळ जवळ आला मीलनाचा मुहूर्तउभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थझटपट आता मित्र हो दूर साराअधीर बहुत झाला पंख येती जीवाला (1)रडूनि रडुनी डोळे लाल झाले या मुलीचेकवण कथित सारे दुःख त्या माऊलीचेहळू हळू मग कन्या नीट मार्गासी जाईपुसत पुसत डोळे राहिली माय मागे(2)मधुर मधुर वाद्ये वाजती मोहदायीवधु वर करी माला घेऊनि सज्ज होईजवळ जवळ आली ही घडी मीलनाचीमुदीत मुदीत प्रेमे भेट दोन्ही जीवांची (3)आता सावध सावधान समयो आला समीप असेआशीर्वाद हा पलार्ध घटिका संपूर्ण आली असे चित्ती गौरीहरा शची सुरवरा श्री रुक्मिणी माधवाचिंतावे कुलदेवता सततही कुर्वन्तु वो मङ्गलम् (4)चांदण्यात चांदणे पौर्णिमेचेलुगड्यात लुगडे पैठणीचे नवे लुगडे नेसता हर्ष वाटेपती पाहता ठेंगणा स्वर्ग वाटे (5)रमत गमत येता आज नवरदेव चढत चढत जाई नवऱ्या मुलीस चेवसरत सरत येई वेळ मुहूर्ताचीभरत भरत आली घटिका हि विवाहाचीअजब गजब घटना परत परत नाही रडत रडत नवरी सासुरासी जाई (6)
Saturday, 17 April 2021
Tuesday, 13 April 2021
गोरखमुडी
(वनस्पती तंत्र )
गोरखमुंडी वनस्पती एक दिव्य वनस्पती.
प्रत्येकाने हि पोस्ट एक ऋण समजून शेअर करावी.
सर्वांच्या माहितीसाठी म्हणून हे पोस्ट टाकत आहे लेख लिहायला खूप मेहनत लागते याचा सर्व सदस्यांनी विचार करूनच पोस्ट शेअर करावी.
चला तर गोरखमुंडी ला तंत्र शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलेल आहे. तर त्याला त्या वनस्पती बद्दल आपण जाणून घेऊ का आणि त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे काय आहेत ते पण आज आपण जाणून घेणार आहोत. या वनस्पतीला महाश्रवणी किंवा श्रवणी असेही म्हणतात या वनस्पतीची गणना 64 दिव्य वनस्पती मध्ये केली जाते.
ही वनस्पती त्रिदोषनाशक आहे. शरीरातील तिन्ही दोषांना दूर करण्याची ताकत हिच्यात आहे.
जर गोरखमुंडी चैत्र मासा कोणत्याही शुभ वारी गोरखमुंडी वनस्पती चे फळ किंवा बोंड जर का गिळले न चावता तर गेले दृष्टी परत येते. पण वनस्पती गिळल्यानंतर पाणी वरून आजीबात प्यायचं नाहीं हे कशात ठेवा कमीत कमी 2 तास तरी.
थंड जागेवर उगाणारी वनस्पती आहे.
जसे की नादी तलाव अशा ठिकाणी.
हिमाचल प्रदेशात ही वनस्पती मोठया प्रमाणात आढळते.
अशा काही दुर्मिळ वनस्पती नष्ट होत चालल्या अहेत आपल्याला प्रत्येक वनस्पतीच संवर्धन करायचे आहे प्रत्येक वनस्पतीला जपायचं आहे म्हणून हा लेखांकाचा खटाटोप मी करत आहे जेणेकरून दुर्मिळ वनस्पती वाचल्या पाहिजेत.
हृदयातील कमजोरी, कावीळ, लिव्हर, अर्ध डोकेदुखी अशा बऱ्याचशा रोगांवर अशा बऱ्याच समस्यांवर कामाला येते.
शरीरात रक्तशुद्धीकरण करणारी वनस्पती आहे.
ज्या महिलांना गर्भाशयाचे आजार असतील किंवा गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ गर्भाशयामध्ये टिकत नसेल तर त्या वेळेस या वनस्पतीचा उपचार करून त्या स्त्रीला गर्भ टिकण्यास मदत होते.
या वनस्पतीला विशिष्ट अशा प्रकारचा वास असतो. तिखट वास असतो.
गोरख म्हणजे गोरक्षनाथ यांच्या नावावरून या वनस्पती त हे नाव मिळाले आहे.
मुंडी म्हणजे त्या वनस्पतीचा बोंड डोक्या प्रमाणे दिसत म्हणून गोरखमुंडी असे नाव दिलेले आहे.
म्हणजेच डोक्यातील आजार डोक्याचे आजार मेंदूचे आजार या सर्व रोगावर ही वनस्पती चालते.
ज्या व्यक्तीचा अर्ध डोकं दुखत असेल त्या साईडच्या नाकपुडी मध्ये या वनस्पतीचा 2 थेंब रस सोडावा लगेच डोकेदुखी थांबते.
तर चला याचा तांत्रिक उपयोग कसा होतो याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) दिवाळीच्या वेळेस या वनस्पती सिद्ध केल्या जातात किंवा अमावस्या-पौर्णिमेला सुद्धा सुद्धा केल्या जातात. सिद्ध केलेली वनस्पती किंवा वनस्पतीचे फळ किंवा बोंड जर का तिजोरीमध्ये ठेवले तर अपार संपत्ती मिळण्यास मदत होते.
2) कोर्टकचेरीच्या कामांमध्ये सुद्धा उपयोगी पडते सिद्ध केल्यानंतर सोबत घेऊन जावे.
3) तंत्र बाधा करणीबाधा भूत बाधा पिशाच्च बाधा सर्व बाधेवर अशी उपयुक्त वनस्पती आहे अमावस्याला सिद्ध करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे. त्यानंतर सिद्ध करून गळ्यामध्ये धारण करावी.
5) तंत्रातील सर्व प्रकारचे कामे या वनस्पतीपासून होतात.
वशीकरण, सम्मोहन, उच्चाटन, जारण-मारण, स्थमभन. या सर्व प्रकारची कामे या वनस्पतीपासून केली जातात.
6) ज्या स्त्रीला संतती होण्यास अडचणी येत आहेत. त्या स्त्रीने पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे मुळी सिद्ध करून आपल्या कमरेला काळ्या दोऱ्यामध्ये बांधावी.
लवकरच संतानप्राप्ती चा योग्य निर्माण होऊन घरामध्ये बाळकृष्ण खेळू लागेल.
7) या वनस्पतीचे नियमितपणे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला दुर्धर आजारापासून मुक्तता होते आणि विशिष्ट प्रकारची वाचासिद्धी प्राप्त होते.
8) पुरुषांसाठी सुद्धा उपयुक्त अशी वनस्पती आहे कामशक्ती वाढवण्यासाठी तसेच दुर्बलता कमी करण्यासाठी या वनस्पतीचे व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल ग्राहकपुरुषांनी रोज सेवन करावे अचंबित होणारा लाभ मिळेल.
9) व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल दुकानांमध्ये माल असूनही ग्राहक पाठ फिरवत आहात असतात त्यासाठी सिद्ध केलेली वनस्पती आपल्या तिजोरी मध्ये ठेवून द्यावी किंवा दुकानांमध्ये पूर्व दिशेला लाल वस्तू गुंडाळून ठेवून द्यावी. नक्कीच व्यवसायामध्ये नोकरीमध्ये लाभ मिळेल.
10) लहान मुलांचा अभ्यासात जर मन लागत नसेल तर मुलांना एका ताईतात भरून ही वनस्पती गळ्यात धारण करावी.
म्हणूनच या वनस्पतीला गोरख (मुंडी) मुंडी म्हणजे डोके डोक्यात लक्षात राहण्यासाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
टीप ~ चोरांनी या लेखापासून सावधान रहावे लेखक चोरी करत असताना विचार करावा की लेखकाने किती या लिखाणासाठी मेहनत घेतली असेल जशाचा तसा लेख शेअर करावा या मध्ये फेरफार बदल करू नये. नावासकट लेख शेअर करावा.
जर का लेख चोरलेला कुठे आढळून आला तर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
©लेखक ~ ओम स्वामी श्री क्षेत्र नकुलेश्वर देवस्थान बोरगाव.
संपर्क whatsapp~9665958865.
या समूहावर आम्ही अध्यात्मिक तसेच धार्मिक माहिती टाकतो रोज नवनवीन माहिती वाचण्यासाठी आपल्या समूहाला ऍड व्हा मी खाली समूहाची लिंक देत आहे.
https://www.facebook.com/groups/547195975928818/?ref=share
Friday, 26 February 2021
(दैवी शक्ती लाभलेल्या वनस्पती भाग-10) 🌳चंदन एक दैवी वृक्ष🌳 प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करावी प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला ही नवीन माहिती समजेल आणि त्यांच्या आयुष्यातील कष्ट दूर होतील.©लेखक ~ओम स्वामी~{9665958865}नमस्कार मंडळी🙏💐 आज आपल्याला चंदन वृक्षाबद्दल माहिती देणार आहे त्याचा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धार्मिक कार्यामध्ये आयुर्वेदिक उपयोग कसा होतो ते मी आज आपल्याला सांगणार आहे.🕉️ मुख्यत्वे चंदनाचे दोन प्रकार असतात एक पांढरा चंदन आणि एक लाल चंदन🕉️पूजा सामग्री म्हणून वापरल्या जाणार्या चंदनाला खूप शुभ लाकूड मानले जाते. चंदन उगाळून कपाळावर टिळक( लेप ) म्हणून वापरले जाते . याचा उपयोग सरपण म्हणून केला जातो. याशिवाय त्वचेची समस्या दूर करण्यासाठी चंदन पावडर देखील वापरली जाते. चंदनाचे वाळली लाकूड होम हवनामध्ये सुद्धा वापरले जाते. आज आपण असेच काही चंदनाच्या झाडा मुळे आपल्या आयुष्यातील समस्या कशा सुटू शकतील किंवा कशा सुटतील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि याबद्दल काही तोडगे आपल्याला मी सांगणार आहे🕉️वास्तू दोष दूर कराजर आपल्या घरात कोणीतरी आजारी असेल तर. घरात राहणारे लोक नकारात्मक विचार करत राहतात. जर नोकरी व्यवसायात प्रगती करत नसेल तर ते आपल्या घराच्या चुकांमुळे देखील होऊ शकते. घराचे वास्तू दोष दूर करण्यासाठी विशेष हवन करा. या हवनसाठी गाईच्या दुधात चंदन पावडर, अश्वगंध आणि कापूर मिसळा आणि सुमारे 40 दिवस सतत हवन करा.40 दिवस हवन करणे शक्य नसेल तर घराच्या हद्दीत चंदनचे झाड लावा. या झाडाने घराच्या सीमारेषाला स्पर्श केला पाहिजे किंवा त्यामध्ये लावावे. घरात चंदनाचे झाड अस्तित्त्वात असल्यामुळे घराच्या सर्व वस्तू काढून टाकल्या जातात व कुटूंबाला त्रास होत नाही. जर तुमच्या घरात आजार येत असतील तर हा उपाय करून पहा.🕉️झाड लावण्याची दिशा चंदनाचे झाड शक्यतो गार्डन मध्येच लावावे दक्षिण किंवा पश्चिम या दिशेला लावावे. जर गार्डन नसेल तर कमीत कमी घराच्या जवळ 15 फूट अंतर सोडून झाड लावावे. 🕉️जर शारीरिक संबंधांमध्ये पती-पत्नीमध्ये काही अडचणी येत असतील तर असलेशा किंवा पुष्य नक्षत्रावर चंदनाचे मुळी काढून आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुऊन त्यामुळे पंचोपचार पूजन करून ती मुळी काळ या दौऱ्यामध्ये दोघांनी स्वतःच्या कमरेला बांधावी यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होईल.🕉️जर आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची जर प्रगती खुंटलेली असेल किंवा कोणत्याही कामांमध्ये आपल्याला अपयश येतं किंवा कोणतेही काम आपलं सहजासहजी होतच नाही सतत घरामध्ये काही ना काही अडचणी येतच राहतात. अशावेळी चंदनाच्या झाडा जवळ पौर्णिमेदिवशी जाऊन चंदनाला हळद मिक्स केलेले तांदूळ आणि कच्चे दूध वाहून चंदनाला प्रार्थना करावी. आणि चंदनाचे एक लाकूड घरी आणून ते लाल कपड्यांमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टाकावे (आतून)🕉️जर घरामध्ये मोठे व्यक्ती असतील लहान बाळ असेल ज्यांना कोणाला नजर लागली असेल त्यांच्यासाठी एक उपाय सांगतो. चंदनाची साल काढून आणावी आणि सालीचा धूर एका टोपल्यांमध्ये करून ते टॉपलेस सात वेळेस पुढून आणि सात वेळेस त्या व्यक्तीच्या मागून उतरावे याने नजर लागली असेल तर निघून जाते.🕉️खूप जणांना अशी समस्या असते की खूप पयसे कमवतात पण घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो. तर त्यावेळेस मंगळवारी लाल चंदन म्हणजे रक्तचंदन घेऊन अनिल लाल गुलाबाचे फूल घरी आणून लक्ष्मी मातेचा मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि लाल कपड्यामुळे गुलाबाचे फूल आणि लाल चंदन गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे आणि लक्ष्मी टिकते (चंदनाचे आयुर्वेदिक उपयोग ) ⚛️चंदन पावडर पाण्यात उकळून घ्यावी व अंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून अंघोळ केल्याने संपूर्ण दिवस शरीर ताजेतवानं राहते. ⚛️ उन्हाळ्यात चंदनाचा लेप त्वचेवर लावल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्याचबरोबर शरीर दिवसभर सुगंधित राहते. ⚛️गुलाब पाण्यात चंदन टाकून त्याचा लेप लावल्याने पिंपल्स येत नाहीत. ⚛️कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवावी व ही पेस्ट चेहर्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो. ⚛️आगीमुळे शरीर भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाला तुपात मिसळून लावल्याने शरीराची दाह कमी होण्यास मदत होते व जखम लवकर भरते. ⚛️चंदन व मध मिसळून डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात. ⚛️कोरड्या त्वचेला चंदनाच्या तेलाने मॉलिश केल्याने त्वचा नितळ बनते. ⚛️उन्हाळ्यात होणार्या घामोळ्यांवर चंदनाचा लेप लावल्याने घामोळ्या लवकर बर्या होतात.© लेखक ~ ओम स्वामी श्री क्षेत्र नकुलेश्वर देवस्थान बोरगाव पीठाचार्य.संपर्क ~9665958865 आम्ही या ग्रुपवर आध्यात्मिक असे धार्मिक नवनवीन माहिती टाकतो नवनवीन माहिती वाचण्यासाठी या समूहामध्ये सामील व्हा ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांच्यासाठी मी खालील लिंक देत त्या लिंकद्वारे समूहामध्ये सामील होऊ शकता.https://www.facebook.com/groups/547195975928818/?ref=share
Monday, 1 February 2021
🌹🌹 स्वामी प्रभात 🌹🌹 🪔शिव सुप्रभातम 🔱स्नात्वा जले शीतलितान्तरङ्गाः स्पृष्ट्वा च पुष्पाणि सुवासिताङ्गाः .वीजन्ति प्रभातमरुत्तरङ्गाः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. १..नन्दीश्वरांभानिनदं मनोघ्य़ं वर्षाब्दगर्ज्जामिव मन्यमानः .केकी कुमारस्य करोति नृत्यं उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. २..लोकैकबन्धुं प्रसविष्यतीति प्राचीं समर्च्याञ्जलिबद्धहस्तैः .स्तोतुं भवन्तं मुनयः प्रवृत्ताः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ३..ब्रह्मादि-देवोदित-वेद-मन्त्रैः दिग्पाल-भूषा-मणिनां णिनादैः .कोलाहलो द्वारि च संप्रभूतः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ४..आभाति शैलोपरि लम्बमाना मेघालिरेषा गजचर्मनीला .नीतेव शाटी हरिणा त्वदर्थं उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ५..प्राच्या समन्तात.ह प्रविकीर्यमाणैः लिप्तो .अद्य लोकः सितकान्तिपुञ्जैः .धत्ते त्वदीयां रुचिराङ्गशोभां उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ६..🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏
Subscribe to:
Posts (Atom)