Sunday, 28 May 2023

*ज्योतिष शास्त्रानुसार तिथीला महत्त्व आहे = कोणत्या तिथीला कोणते कर्म करावे अथवा न करावे या बाबतीत माहिती*प्रतिपदा तिथी == कृष्ण पक्षातील प्रतिप्रदेत चंद्राला बलवान मानल गेलंय आणि शुल्क पक्षातील प्रतिपदेत चंद्राला निर्बल मानल गेले आहे. म्हणून प्रतिपदा तिथीत घराचे बांधकाम, गृहप्रवेश, वास्तू पूजा, लग्न, शांन्ति, यात्रा, प्राणप्रतिष्ठा इत्यादी चांगली कार्य केले जातात... शुक्ल पक्षातील प्रतिपदेत लग्न, यात्रा, व्रत, प्राणप्रतिष्ठा, सिमंन्त पूजन, चूडाकर्म, वास्तुकर्म, गृहप्रवेश इत्यादी कार्य करू नयेत....द्वितीया तिथी == विवाह मुहूर्त, यात्रा, दागिने खरेदी, शिलान्यास, देश वा राजकिय संबंधित कामे, वास्तुकर्म, उपनयन इत्यादी कार्य करणे शुभ मानल गेलयं परंतु या तीथीला तेल लावणे वर्जित आहे....तृतिया तिथी == शिल्पकला वा त्या संबंधित कार्य, सिमंतपूजन, चूडाकर्म, लग्न, गृहप्रवेश, उपनयन, राज्या संबंधित कार्य इत्यादी शूभ कार्य करतात....चतुर्थ तिथी == सर्व प्रकारच्या वीजेची कामं, शत्रूला हटलायचं काम, अग्नी संबंधित, शस्त्राचा वापर इत्यादी साठी ही तिथी चांगली आहे. परंतु क्रुर प्रवृत्ती च्या कामासाठी योग्य नाहीपंचमी तिथी = या तीथीला सर्व कार्यासाठी सर्व तीथींसाठी उपयुक्त मानली गेलीय. परंतु या तिथीत कूणालाहि कर्ज देऊ नये....षष्ठी तिथी = या तीथीला युध्दा साठी वापरले जाणारे शस्त्र, शिल्प कार्याला सुरवात, वास्तुकर्म, गृहप्रवेश, नवीन कपडे वापरणे अशा शुभ कार्या साठी योग्य मानली आहे. परंतु तेल अभ्यंग, पित्रांचे कार्य, आवाहन, दानकर्म, काष्ठकर्म, इत्यादी वर्जित मानल गेलय.... सप्तमी = ही तीथी लग्न मुहूर्त, संगीत कार्यासंबंधी दागिने बनविण्यासाठी नविन दागिने घालण्यासाठी, वधू प्रवेश, यात्रा, वधु प्रवेश, गृह प्रवेश, राजकिय कार्य, वास्तूकार्य, चूडाकर्म, उपनयन, संस्कार इत्यादी साठी शुभ मानली गेलीय....अष्टमी = या तिथीत लेखन, यूध्दासाठी चे कार्य, वास्तू कार्य, शिल्पा संबंधित, रत्ना संबंधित, आदानप्रदान संबंधित काम, अस्त्र - शस्त्र वापरण्यासंबंधित सूरवात करता येते.....नवमी स्थिती = या तिथीत शिकारीला जाणे, भांडण उकरून काढणे, सट्टा खेळणे, शस्त्रे निर्माण करणे, दारू निर्मिती अशी वाईट काम करतात...... दशमी तिथी = यात सरकार संबंधित राजकीय कार्याची सुरवात, हत्ती, घोडे, संबंधित कार्य लग्न, संगित, दागिने, कपडे, यात्रा, इत्यादी करता येतात गृह प्रवेश, वधु प्रवेश, चुडा कर्म, उपनयन, जेवण खाणे इत्यादी कामे करता येतात..... एकादशी = या तीथीत व्रत, सर्व धार्मिक कार्य, देवाचा उत्सव, उद्यापन, वास्तुकार्य, यूध्दाच्या संबंधित कार्य, शिल्प यज्ञैपवित, गृह प्रवेश यात्रा इत्यादी कार्य करतात..... द्वादशी= या तिथीत लग्न वा अन्य शुभ कार्य केले जातात परंतु तेलमर्दन, नवीन घराची निर्मिती, वा गृहप्रवेश, यात्रा या गोष्टी नाही केल्या पाहिजेत.... शुक्लपक्षी त्रयोदशी तिथी = यूध्दासाठी चे कार्य अस्त्र शस्त्र, राजकिय कार्य, वास्तू कार्य, संगीत विद्येशी संबंधित काम या तीथीत करता येतात परंतु यात्रा, गृह प्रवेश, नवीन दागिने, वस्त्र, यज्ञोपवित, वगैरे शुभ कार्य टाळले पाहिजे.....चतुर्थी = या तिथीत सर्व प्रकारच्या उग्र व क्रूर कार्यांना प्राधान्य दिले जाते. शस्त्र निर्माण इत्यादी प्रयोग केले जातात. यात्रा करणे वर्जित आहे.....पौर्णिमा = पौर्णिमेत शिल्प, दागिने, संबंधित कामे, यूध्द, विवाह, यज्ञ, बोटीतून प्रवास, शांती देणारे, योग्य मंगल कार्य करतात.....अमावस्या = पितृदोष, मुख्य रूपात केल जातं. महादान, ऊग्रकर्म केले जातात. या तिथीत चांगले शुभ काम व स्रि संग इत्यादी वर्जित म्हटलं आहे..... अमरनाथ परब वैदिक ज्योतिष, अंक ज्योतिष, वास्तु मार्गदर्शक व *सर्वसामान्य ज्योतिष* अयनांश म्हणजे खगोलातील ज्या स्थिर बिंदूपासून सूर्य, चंद्र वा ग्रह यांचे भोग दिलेले असतात, त्या स्थिर बिंदूचे वसंतसंपातापासून क्रांतिवृत्तावरील अंतर होय, आपण दोन अयन मानतो उत्तरायण आणि दक्षिणायन उत्तरायण = आपल्या पंचांग प्रमाणे मकर संक्रांतीला (१४/१५ जानेवारी) चालू होते. सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ डिसेंबर ला चालू होते. (लहान दिवस मोठी रात्र) दक्षिणायन = आपल्या पंचांगाप्रमाणे कर्क संक्रांतीला १६/१७ जुलै ला चालू होते सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ जूनला चालू होते. (मोठा दिवस लहान रात्र)आपण सहा ऋतू मानतो १. चैत्र वैशाख = वसंत ऋतू २. ज्येष्ठ आषाढ = ग्रीष्म ऋतू. ३. श्रावण भाद्रपद = वर्षाऋतू ४ अश्विन कार्तिक = शरद ऋतू ५.. मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू ६. माघ फाल्गुन शिशिर ऋतू महिने = १२ वर ऋतूत हिंदू महिने पण आलेत. दोन पक्ष शुक्ल ( शुद्ध) आणि कृष्ण (वद्य)तिथी = ३०शुक्ल ( शुद्ध) १. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी १५ पौर्णिमा. कृष्ण (वद्य)१. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी ३९ अमावस्या. नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा ह्या क्रमाने प्रतिपदेपासून तिथींची नवे आहेत. षष्टीपासून तीच पुनःपुन्हा येतात. योग आणि करण नावे आपण मागच्या भागात पाहिली आहेत. जुन्या ग्रंथांतून प्रत्येक गोष्टीची फळे दिली आहेत. ती पाहू. १. ऋतूफळ १. वसंतऋतुमध्ये जन्मणारा जातक उद्योगी, बुद्धिमान तेजस्वी, भरपूर काम करणारा आणि अनेक देशांशी व्यापार करणारा असतो २. ग्रीष्म ऋतू मध्ये जन्मणारा जातक भरपूर कामांचा आरंभ करणारा, क्रोध नसणारा, भुकेला, कामुक उंच, शूर, असतो ३. वर्षाऋतुमध्ये जन्मणारा जातक गुणवान, भोगी, राजकडून पूजला जाणारा, जितेंद्रिय, सत्य बोलणारा असतो. ४. शरदऋतुमध्ये जन्मणारा जातक व्यापारी, शेतकरी, धनधान्याने समृद्ध, तेजस्वी, लोकांमध्ये प्रसिद्ध असतो. ५. हेमंत ऋतुमध्ये जन्मणारा जातक बलवान, नीतिमान, गावात राहणार, सतत उद्योग करणारा, छोटे पाय लहान गळा असणारा असतो. ६. शिशिरऋतुमध्ये जन्मणारा जातक रूपवान, उत्कट मोठाली कामे करणारा, भुकेला (क्षुधायुक्त) आणि कामुक असतो. पक्ष फळ शुक्ल पक्षात जन्मणारा जातक पूर्णचंद्राच्या कांतीसारखा दिसणारा, श्रीमान, व्यावसायिक, अनेक शास्त्रे जाणणारा कुशल आणि ज्ञानी असतो. कृष्णपक्षात कठोर, दुर्मुख, मूर्ख, स्त्रीयांशी वैर करणारा, लोकांनी तिरस्कारलेला आणि दुसऱ्यांची सेवा करणारा असतो. वारफळ रविवारी जन्मणारा जातक मिष्टान्न खाणारा मानी, क्रोधी, मैथुनप्रिय, पित्त प्रकृती, आणि धनाची लालसा असणारा असतो. सोमवारी जन्मणारा जातक भोगी, कामी, शास्त्रवेत्ता, गुणी, मानी, जितेंद्रिय, उच्च शिक्षित, आणि शिलवन्त असतो. मंगळवारी जन्मणारा जातक मूर्खांमध्ये प्रिय, क्रोधी, धनी, श्रुतिस्मृतींची निंदा करणारा, नास्तिक, वेद न मानणारा असतो. बुधवारी जन्मणारा जातक वेदशास्त्राप्रमाणे वर्तन करणारा, दयाळू, भित्रा परंतु योगयुक्त असतो. गुरुवारी जन्मणारा जातक वेदाध्ययन करणारा अग्निहोत्री, मुलाबाळांनी युक्त, धनवान, भरपूर लोकसंग्रह असलेला पूर्ण विद्वान असतो. शुक्रवारी जन्मणारा जातक धनवान भोगी, शूर, भरपूर नोकर असणारा दयाळू, दैवज्ञ, आणि वेद जाणणारा असतो. शनिवारी जन्मणारा जातक वाईट लोकांमध्य वावरणारा, कुटिलमती, कृतघ्न, भावंडाना त्रास देणारा, सत्कर्मात अडथळे आणणारा, आणि रोगी होतो. टीप: ज्या वारी जन्म असेल तो ग्रह उपचय स्थानात (३,६,१०,११) स्थानात असेल तर फळ मिळते नाहीतर तसे फळ मिळत नाही.विश्वास गणपुले लेखनसीमा क्रमश:

Monday, 8 May 2023

[5/8, 11:35 AM] +91 94049 12121: तारास्तोत्रम् अथवा ताराष्टकं अथवा श्रीनीलसरस्वतीस्तोत्रम् श्रीगणेशाय नमः ।मातर्नीलसरस्वति प्रणमतां सौभाग्यसम्पत्प्रदेप्रत्यालीढपदस्थिते शवहृदि स्मेराननाम्भोरुहे ।फुल्लेन्दीवरलोचने त्रिनयने कर्त्रीकपालोत्पले खड्गंचादधती त्वमेव शरणं त्वामीश्वरीमाश्रये ॥ १॥वाचामीश्वरि भक्तिकल्पलतिके सर्वार्थसिद्धिश्वरिगद्यप्राकृतपद्यजातरचनासर्वार्थसिद्धिप्रदे ।नीलेन्दीवरलोचनत्रययुते कारुण्यवारान्निधेसौभाग्यामृतवर्धनेन कृपयासिञ्च त्वमस्मादृशम् ॥ २॥खर्वे गर्वसमूहपूरिततनो सर्पादिवेषोज्वलेव्याघ्रत्वक्परिवीतसुन्दरकटिव्याधूतघण्टाङ्किते ।सद्यःकृत्तगलद्रजःपरिमिलन्मुण्डद्वयीमूर्द्धज-ग्रन्थिश्रेणिनृमुण्डदामललिते भीमे भयं नाशय ॥ ३॥मायानङ्गविकाररूपललनाबिन्द्वर्द्धचन्द्राम्बिकेहुंफट्कारमयि त्वमेव शरणं मन्त्रात्मिके मादृशः ।मूर्तिस्ते जननि त्रिधामघटिता स्थूलातिसूक्ष्मापरा वेदानां नहि गोचरा कथमपि प्राज्ञैर्नुतामाश्रये ॥ ४॥त्वत्पादाम्बुजसेवया सुकृतिनो गच्छन्ति सायुज्यतांतस्याः श्रीपरमेश्वरत्रिनयनब्रह्मादिसाम्यात्मनः ।संसाराम्बुधिमज्जने पटुतनुर्देवेन्द्रमुख्यासुरान्मातस्ते पदसेवने हि विमुखान् किं मन्दधीः सेवते ॥ ५॥मातस्त्वत्पदपङ्कजद्वयरजोमुद्राङ्ककोटीरिणस्तेदेवा जयसङ्गरे विजयिनो निःशङ्कमङ्के गताः ।देवोऽहं भुवने न मे सम इति स्पर्द्धां वहन्तः परेतत्तुल्यां नियतं यथा शशिरवी नाशं व्रजन्ति स्वयम् ॥ ६॥त्वन्नामस्मरणात्पलायनपरान्द्रष्टुं च शक्ता न तेभूतप्रेतपिशाचराक्षसगणा यक्षश्च नागाधिपाः ।दैत्या दानवपुङ्गवाश्च खचरा व्याघ्रादिका जन्तवोडाकिन्यः कुपितान्तकश्च मनुजान् मातः क्षणं भूतले ॥ ७॥लक्ष्मीः सिद्धिगणश्च पादुकमुखाः सिद्धास्तथा वैरिणांस्तम्भश्चापि वराङ्गने गजघटास्तम्भस्तथा मोहनम् ।मातस्त्वत्पदसेवया खलु नृणां सिद्ध्यन्ति ते ते गुणाःक्लान्तः कान्तमनोभवोऽत्र भवति क्षुद्रोऽपि वाचस्पतिः ॥ ८॥ताराष्टकमिदं पुण्यं भक्तिमान् यः पठेन्नरः ।प्रातर्मध्याह्नकाले च सायाह्ने नियतः शुचिः ॥ ९॥लभते कवितां विद्यां सर्वशास्त्रार्थविद्भवेत्लक्ष्मीमनश्वरां प्राप्य भुक्त्वा भोगान्यथेप्सितान् ।कीर्तिं कान्तिं च नैरुज्यं प्राप्यान्ते मोक्षमाप्नुयात् ॥ १०॥॥ इति श्रीनीलतन्त्रे तारास्तोत्रं अथवा ताराष्टकं सम्पूर्णम् ॥[5/8, 12:04 PM] +91 94049 12121: श्रीताराशतनामस्तोत्रम् १ :----श्रीशिव उवाच ॥ॐ तारिणी तरला तन्वी तारा तरुणवल्लरी ।तीव्ररूपा तरी श्यामा तनुक्षीणपयोधरा ॥ १॥तुरीया तरला(तरुणा) तीव्रगमना नीलवाहिनी ।उग्रतारा जया चण्डी श्रीमदेकजटाशिराः ॥ २॥तरुणी शाम्भवीछिन्नभाला च भद्रतारिणी ।उग्रा चोग्रप्रभा नीला कृष्णा नीलसरस्वती ॥ ३॥द्वितीया शोभना नित्या नवीना नित्यनूतना ।चण्डिका विजयाराध्या देवी गगनवाहिनी ॥ ४॥अट्टहास्या करालास्या चरास्या दितिपूजिता ।सगुणा सगुणाराध्या हरीन्द्रदेवपूजिता ॥ ५॥रक्तप्रिया च रक्ताक्षी रुधिरास्यविभूषिता ।बलिप्रिया बलिरता दुर्गा बलवती बला ॥ ६॥बलप्रिया बलरता बलरामप्रपूजिता ।अर्धकेशेश्वरी केशा केशवासविभूषिता ॥ ७॥पद्ममाला च पद्माक्षी कामाख्या गिरिनन्दिनी ।दक्षिणा चैव दक्षा च दक्षजा दक्षिणे रता ॥ ८॥वज्रपुष्पप्रिया रक्तप्रिया कुसुमभूषिता ।माहेश्वरी महादेवप्रिया पञ्चविभूषिता ॥ ९॥इडा च पिङ्गला चैव सुषुम्ना प्राणरूपिणी ।गान्धारी पञ्चमी पञ्चाननादि परिपूजिता ॥ १०॥तथ्यविद्या तथ्यरूपा तथ्यमार्गानुसारिणी ।तत्त्वप्रिया तत्त्वरूपा तत्त्वज्ञानात्मिकाऽनघा ॥ ११॥ताण्डवाचारसन्तुष्टा ताण्डवप्रियकारिणी ।तालदानरता क्रूरतापिनी तरणिप्रभा ॥ १२॥त्रपायुक्ता त्रपामुक्ता तर्पिता तृप्तिकारिणी ।तारुण्यभावसन्तुष्टा शक्तिर्भक्तानुरागिणी ॥ १३॥शिवासक्ता शिवरतिः शिवभक्तिपरायणा ।ताम्रद्युतिस्ताम्ररागा ताम्रपात्रप्रभोजिनी ॥ १४॥बलभद्रप्रेमरता बलिभुग्बलिकल्पिनी ।रामरूपा रामशक्ती रामरूपानुकारिणी ॥ १५॥इत्येतत्कथितं देवि रहस्यं परमाद्भुतम् ।श्रुत्वा मोक्षमवाप्नोति तारादेव्याः प्रसादतः ॥ १६॥य इदं पठति स्तोत्रं तारास्तुतिरहस्यकम् ।सर्वसिद्धियुतो भूत्वा विहरेत् क्षितिमण्डले ॥ १७॥तस्यैव मन्त्रसिद्धिः स्यान्ममसिद्धिरनुत्तमा ।भवत्येव महामाये सत्यं सत्यं न संशयः ॥ १८॥मन्दे मङ्गलवारे च यः पठेन्निशि संयतः ।तस्यैव मन्त्रसिद्धिस्स्याद्गाणपत्यं लभेत सः ॥ १९॥श्रद्धयाऽश्रद्धया वापि पठेत्तारारहस्यकम् ।सोऽचिरेणैव कालेन जीवन्मुक्तः शिवो भवेत् ॥ २०॥सहस्रावर्तनाद्देवि पुरश्चर्याफलं लभेत् ।एवं सततयुक्ता ये ध्यायन्तस्त्वामुपासते ।ते कृतार्था महेशानि मृत्युसंसारवर्त्मनः ॥ २१॥इति स्वर्णमालातन्त्रे ताराशतनामस्तोत्रं समाप्तम् ॥एवं चइति मुण्डमालातन्त्रे हरपार्वती-संवादे त्रयोदशपटलान्तर्गतंताराशतनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Sunday, 12 March 2023

मंगल कामना व शांतीपाठशरणं त्वां गतो नाथ संसारार्णवतारक| दिश:पश्य अध:पश्य व्याधिभ्योरक्ष नित्यश:| प्रसीद स्वस्य राष्ट्रस्य राज्ञ:सर्वबलस्यच | गर्भिणीनां च वृद्धांना व्रीहिणां च गवां तथा || ब्राम्हणानां च सततं शातिं करु शुभं करु || अन्नं कुरु सुवृष्टिं च सुभिक्षमभयं तथा | राष्ट्रं प्रवर्द्धंतु विभो शांति र्भवतु नित्यश: ||देवानां ब्राम्हणानां च भक्तानां कन्यकासु च | पशूंना सर्वभूतानां शांतिर्भवतु नित्यश: || संसार सागरातून उद्धार करणाऱ्या प्रभो आम्ही आपणास शरण आलो आहोत आपण प्रसन्न व्हावे आपली दिव्य रक्षा दृष्टी चतुदीक् बनली आहे आधी व्याधी पासून आपण आमचे रक्षण सदैव करता आमचे राष्ट्र शासन त्रिविध प्रकारचे सैन्यबळ यावर आपली विजयिनी वरददृष्टी सतत असावी गाई गर्भिणी स्त्रिया वृद्ध जन अशक्त दिन हीन विद्वान ब्राह्मण यावर आपली शुभ दृष्टी अनुग्रह दृष्टी सतत असावी आपण यांच्यावर प्रसन्न असावे आमच्या देशातील धनधान्य समृद्ध करावे आपण सर्वत्र सुवृष्टी करावी पर्याप्त अन्न व सुभिक्ष यांना प्रदान करावे आमची अन्न भंडारे भरावीत सर्वतः अभयदान असावे विभो आपण आमच्या राष्ट्राचे संवर्धन करावे सर्वत्र विश्वात शुभ शांती पसरावी देव ब्राह्मण भक्त संत महात्मे कन्या पशुपक्षी आणि समस्त जीव सदैव शांती प्राप्त करून घेवोत. सर्वत्र सर्वजण सुखाने समाधानाने नांदावेत.महादेव गोविंद गाडगीळ तळवणे सावंतवाडी

Friday, 10 March 2023

*ब्राह्मणदक्षिणा व शास्त्र**मुहूर्ते समतीते तु,**भवेत् शतगुणा च सा |**त्रिरात्रे तद् दशगुणा,**सप्ताहे द्विगुणा मता ||**मासे लक्षगुणा प्रोक्ता,**ब्राह्मणानां च वर्धते |**संवत्सर व्यतीते तु,**त्रिकोटिगुणा भवेत् ||**कर्मं तद् यजमानानां,**सर्वञ्च निष्फलं भवेत् |**सब्रह्मस्व अपहारी च,**न कर्मार्हो शुचिर् नर: ||*अर्थात, ब्राह्मणांची दक्षिणा हवनाची पूर्णाहुति झाल्यावर एका मुहूर्ताच्या (२४ मिनिटाच्या) आत दिली पाहिजे, अन्यथा मुहूर्त निघून गेल्यावर शतपटीने वाढते. आणि तीन रात्री निघून गेल्यावर एक हजार पट, सप्ताहानंतर दोन हजार पट, महिन्यानंतर एक लाख पट, आणि संवत्सर निघून गेल्यावर तीन करोड पट दक्षिणा यजमानाने दिली पाहिजे. जर याप्रकारे न दिली तर त्याचे कर्म निष्फल होते, व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. त्याच्या हाताने केले जाणारे हव्य-कव्य देवता व पितर कधीच प्राप्त करत नाही. म्हणून ब्राह्मणांची दक्षिणा लवकरात लवकर दिली पाहिजे. हे शास्त्रप्रमाण आहे.म्हणून चाणक्य म्हणतात, *"नास्ति यज्ञसमो रिपु:"* अर्थात यज्ञादि कर्म विधिने सम्पन्न झाल्यावर लाभ, अन्यथा सर्वात जास्त हानीपर असते. गीतेतही भगवंतांनी स्वयं सांगितले आहे,*विधिहीनं असृष्टान्नं,**मन्त्रहीनं अदक्षिणं |**श्रद्धाविरहितं यज्ञं,**तामसं परिचक्षते ||*अयोग्य विधिने बनवलेले भोजन जसे परिणामात नुकसान करते, तसेच ब्राह्मणाने सांगितलेले मन्त्र दक्षिणा न दिल्यावर नुकसान करते.शास्त्र सांगते कि लोखंडाचे फुटाणे किंवा तुकडे देखील व्यक्ति पचवू शकतो परन्तु ब्राह्मणांच्या धनाला पचवू शकत नाही. कोणत्याही उपायाने ब्राह्मणांचे धन घेणारा नेहेमी दु:खच प्राप्त करतो. यावर महाभारतात एक कथानक आले आहे.महाभारत युद्ध चालू होते, युद्धमैदानात वाघासारखे हिंसक जीव योद्ध्यांचे गरमगरम रक्त पीत होते. एवढ्यातच धृष्टद्युम्नाने तलवारीने पुत्रशोकाने दु:खी निःशस्त्र द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचार्याचे गरमगरम रक्त पिण्यासाठी एक वाघीण पळतपळत येते, तेंव्हा वाघ वाघिणीला म्हणतो, प्रिये, *"विप्र-रक्तोsअयं गलद् दगलद् दहति"*अर्थात, ते ब्राह्मणाचे रक्त आहे, ते पिउ नको, ते शरीराला दहन करुन (गाळून गाळून) नष्ट करेल तेंव्हा त्या वाघिणीने देखील ब्राह्मण द्रोणाचार्याचे रक्तपान केले नाही.ऋषिमुनिंचे कररुपात रक्त घेतल्यानेच रावणकुळाचा संहार झाला, म्हणूनच जीवनात कधीही ब्राह्मणांचे द्रव्य अपहरण कोणत्याही रुपात करु नये.*वित्तशाट्ठ्यं न कुर्वीत,**सति द्रव्ये फलप्रदम |*अनुष्ठान, पाठ-पूजन केल्यावर ब्राह्मणांना उचित दक्षिणा दिली पाहिजे, आणि दक्षिणे-अतिरिक्त त्यांच्या येण्याजाण्याचे भाडेही वेगळे दिले पाहिजे. त्यानंतर विनम्रतेने ब्राह्मणांना वचनाद्वारे देखील सन्तुष्ट करत आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्यावर ब्राह्मण मुखाने नाही तर हृदयाने आशीर्वाद देतो, आणि तेंव्हा यजमानाचे कल्याण होते.*यत्र भुंड्क्ते द्विजः तस्मात्,**तत्र भुंड्क्ते हरि: स्वयम् ||*ज्याच्या घरात अशा प्रकारे श्रद्धेने ब्राह्मणभोजन होते, तिथे ब्राह्मणरुपात स्वयं भगवानच भोजन करतात.

Sunday, 11 December 2022

*तरच मी लग्नाला तयार होईल अशी मागणी ऐकून थक्क झालो*दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला. ✅#संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅1. ✅कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.✅2. ✅वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.✅3. ✅विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल. ✅4. ✅विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील ✅5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.✅6. ✅गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही. ✅7.✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.✅9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल. ✅10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही...11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही...12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल...13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत...14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत...15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे, व भेटणे फोटो काढणे मला आवडणार नाही...16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीय पद्धतीने विवाह असेल तर मी तयार होईल...17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात, जीवापाड जपतात लग्न साठी कर्जबाजारी होतात, हा वायफळ खर्च टाळा हा संदेश,,, आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले. आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.बघा जमतय का ? *ही काळाची व संस्कृती जपण्याची गरज आहे ...*🚩....…Cp