Thursday, 30 March 2023
Tuesday, 21 March 2023
Sunday, 12 March 2023
मंगल कामना व शांतीपाठशरणं त्वां गतो नाथ संसारार्णवतारक| दिश:पश्य अध:पश्य व्याधिभ्योरक्ष नित्यश:| प्रसीद स्वस्य राष्ट्रस्य राज्ञ:सर्वबलस्यच | गर्भिणीनां च वृद्धांना व्रीहिणां च गवां तथा || ब्राम्हणानां च सततं शातिं करु शुभं करु || अन्नं कुरु सुवृष्टिं च सुभिक्षमभयं तथा | राष्ट्रं प्रवर्द्धंतु विभो शांति र्भवतु नित्यश: ||देवानां ब्राम्हणानां च भक्तानां कन्यकासु च | पशूंना सर्वभूतानां शांतिर्भवतु नित्यश: || संसार सागरातून उद्धार करणाऱ्या प्रभो आम्ही आपणास शरण आलो आहोत आपण प्रसन्न व्हावे आपली दिव्य रक्षा दृष्टी चतुदीक् बनली आहे आधी व्याधी पासून आपण आमचे रक्षण सदैव करता आमचे राष्ट्र शासन त्रिविध प्रकारचे सैन्यबळ यावर आपली विजयिनी वरददृष्टी सतत असावी गाई गर्भिणी स्त्रिया वृद्ध जन अशक्त दिन हीन विद्वान ब्राह्मण यावर आपली शुभ दृष्टी अनुग्रह दृष्टी सतत असावी आपण यांच्यावर प्रसन्न असावे आमच्या देशातील धनधान्य समृद्ध करावे आपण सर्वत्र सुवृष्टी करावी पर्याप्त अन्न व सुभिक्ष यांना प्रदान करावे आमची अन्न भंडारे भरावीत सर्वतः अभयदान असावे विभो आपण आमच्या राष्ट्राचे संवर्धन करावे सर्वत्र विश्वात शुभ शांती पसरावी देव ब्राह्मण भक्त संत महात्मे कन्या पशुपक्षी आणि समस्त जीव सदैव शांती प्राप्त करून घेवोत. सर्वत्र सर्वजण सुखाने समाधानाने नांदावेत.महादेव गोविंद गाडगीळ तळवणे सावंतवाडी
Friday, 10 March 2023
*ब्राह्मणदक्षिणा व शास्त्र**मुहूर्ते समतीते तु,**भवेत् शतगुणा च सा |**त्रिरात्रे तद् दशगुणा,**सप्ताहे द्विगुणा मता ||**मासे लक्षगुणा प्रोक्ता,**ब्राह्मणानां च वर्धते |**संवत्सर व्यतीते तु,**त्रिकोटिगुणा भवेत् ||**कर्मं तद् यजमानानां,**सर्वञ्च निष्फलं भवेत् |**सब्रह्मस्व अपहारी च,**न कर्मार्हो शुचिर् नर: ||*अर्थात, ब्राह्मणांची दक्षिणा हवनाची पूर्णाहुति झाल्यावर एका मुहूर्ताच्या (२४ मिनिटाच्या) आत दिली पाहिजे, अन्यथा मुहूर्त निघून गेल्यावर शतपटीने वाढते. आणि तीन रात्री निघून गेल्यावर एक हजार पट, सप्ताहानंतर दोन हजार पट, महिन्यानंतर एक लाख पट, आणि संवत्सर निघून गेल्यावर तीन करोड पट दक्षिणा यजमानाने दिली पाहिजे. जर याप्रकारे न दिली तर त्याचे कर्म निष्फल होते, व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. त्याच्या हाताने केले जाणारे हव्य-कव्य देवता व पितर कधीच प्राप्त करत नाही. म्हणून ब्राह्मणांची दक्षिणा लवकरात लवकर दिली पाहिजे. हे शास्त्रप्रमाण आहे.म्हणून चाणक्य म्हणतात, *"नास्ति यज्ञसमो रिपु:"* अर्थात यज्ञादि कर्म विधिने सम्पन्न झाल्यावर लाभ, अन्यथा सर्वात जास्त हानीपर असते. गीतेतही भगवंतांनी स्वयं सांगितले आहे,*विधिहीनं असृष्टान्नं,**मन्त्रहीनं अदक्षिणं |**श्रद्धाविरहितं यज्ञं,**तामसं परिचक्षते ||*अयोग्य विधिने बनवलेले भोजन जसे परिणामात नुकसान करते, तसेच ब्राह्मणाने सांगितलेले मन्त्र दक्षिणा न दिल्यावर नुकसान करते.शास्त्र सांगते कि लोखंडाचे फुटाणे किंवा तुकडे देखील व्यक्ति पचवू शकतो परन्तु ब्राह्मणांच्या धनाला पचवू शकत नाही. कोणत्याही उपायाने ब्राह्मणांचे धन घेणारा नेहेमी दु:खच प्राप्त करतो. यावर महाभारतात एक कथानक आले आहे.महाभारत युद्ध चालू होते, युद्धमैदानात वाघासारखे हिंसक जीव योद्ध्यांचे गरमगरम रक्त पीत होते. एवढ्यातच धृष्टद्युम्नाने तलवारीने पुत्रशोकाने दु:खी निःशस्त्र द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचार्याचे गरमगरम रक्त पिण्यासाठी एक वाघीण पळतपळत येते, तेंव्हा वाघ वाघिणीला म्हणतो, प्रिये, *"विप्र-रक्तोsअयं गलद् दगलद् दहति"*अर्थात, ते ब्राह्मणाचे रक्त आहे, ते पिउ नको, ते शरीराला दहन करुन (गाळून गाळून) नष्ट करेल तेंव्हा त्या वाघिणीने देखील ब्राह्मण द्रोणाचार्याचे रक्तपान केले नाही.ऋषिमुनिंचे कररुपात रक्त घेतल्यानेच रावणकुळाचा संहार झाला, म्हणूनच जीवनात कधीही ब्राह्मणांचे द्रव्य अपहरण कोणत्याही रुपात करु नये.*वित्तशाट्ठ्यं न कुर्वीत,**सति द्रव्ये फलप्रदम |*अनुष्ठान, पाठ-पूजन केल्यावर ब्राह्मणांना उचित दक्षिणा दिली पाहिजे, आणि दक्षिणे-अतिरिक्त त्यांच्या येण्याजाण्याचे भाडेही वेगळे दिले पाहिजे. त्यानंतर विनम्रतेने ब्राह्मणांना वचनाद्वारे देखील सन्तुष्ट करत आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्यावर ब्राह्मण मुखाने नाही तर हृदयाने आशीर्वाद देतो, आणि तेंव्हा यजमानाचे कल्याण होते.*यत्र भुंड्क्ते द्विजः तस्मात्,**तत्र भुंड्क्ते हरि: स्वयम् ||*ज्याच्या घरात अशा प्रकारे श्रद्धेने ब्राह्मणभोजन होते, तिथे ब्राह्मणरुपात स्वयं भगवानच भोजन करतात.
Sunday, 11 December 2022
*तरच मी लग्नाला तयार होईल अशी मागणी ऐकून थक्क झालो*दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला. ✅#संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅1. ✅कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.✅2. ✅वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.✅3. ✅विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल. ✅4. ✅विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील ✅5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.✅6. ✅गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही. ✅7.✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.✅9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल. ✅10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही...11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही...12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल...13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत...14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत...15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे, व भेटणे फोटो काढणे मला आवडणार नाही...16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीय पद्धतीने विवाह असेल तर मी तयार होईल...17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात, जीवापाड जपतात लग्न साठी कर्जबाजारी होतात, हा वायफळ खर्च टाळा हा संदेश,,, आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्याचे मान्य केले. आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.बघा जमतय का ? *ही काळाची व संस्कृती जपण्याची गरज आहे ...*🚩....…Cp
Saturday, 26 November 2022
Thursday, 17 November 2022
Subscribe to:
Posts (Atom)