Friday, 21 October 2022

आज आश्विन कृ. १२ गोवत्स द्वादशी (वसुबारस)या निमित्त सर्वांसाठी गो पूजन विधी देत आहे ज्याला शक्य आहे त्याने आज सायंकाळी खालील प्रमाणे यथाविधी वासरासहित गायीचे पूजन करावे अशक्ताने किमान चारा देऊन गायीला प्रदक्षिणा करावी त्याने सर्व पापांचा नाश होऊन गो व भगवत्कृपेचा लाभ होईल.गोपूजन साहित्यहळदकुंकुअष्टगंधफुलंहारउदबत्ती,तुपाचा दिवावस्त्रअलंकारगोग्रासविडासुपारीदक्षिणा ।। गोपूजन विधी ।।सर्व प्रथम खालील प्रमाणे यथाविधी आचमन व प्राणायाम करावाआचमन १- केशवाय नमः२- नारायणाय नमः३- माधवाय नमः४-गोविंदाय नमः५-विष्णवे नमः६-मधुसुदनाय नमः७-त्रिविक्रमाय नमः८- वामनाय नमः९-श्रीधराय नमः१०-हृषीकेशाय नमः११- पद्मनाभाय नमः१२-दामोदराय नमः१३-संकर्षणाय नमः१४-वासुदेवाय नमः१५- प्रद्युम्नाय नमः१६-अनिरुद्धाय नमः१७-पुरुषोत्तमाय नमः१८-अधोक्षजाय नमः१९-नारसिंहाय नमः२०-अच्युताय नमः२१- जनार्दनाय नमः२२-उपेंद्राय नमः२३- हरये नमः२४- श्रीकृष्णाय नमःयातील पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे. व चौथ्या नावाने उजव्या सरळ हाताने पाणी सोडावे. बाकी नावांचा नुसता उच्चार करावा नंतर प्राणायाम करावा. त्यानंतर उजव्या हातात फुल,अक्षता व पाणी घेऊन खालील प्रमाणे संकल्प करावासंकल्पतिथीर्विष्णु स्तथा वारो नक्षत्रं विष्णु रेव च ।योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।अद्य पुर्वोच्चरित एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ ———— गोत्रोत्पन्न: ———— नाम्नः/ नाम्नीं अहं ( इथे स्वतः च्या गोत्राचा आणी नावाचा उच्चार करावयाचा आहे )मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं सकल पाप क्षयार्थं सवत्स धेनु कृपा प्रसाद सिध्यर्थं यथा ज्ञानं यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादी षोडशोपचारैःपुजनम् अहं करिष्येहातातील फुल अक्षत् पाणी सोडावेआवाहनआगच्छ देवि कल्याणी शुभां पूजां गुहाण च।वत्सेन सहितां त्वा हं देविमावाहयाम्यहम् ।।सवत्स गवे नमःआवाहयामीअक्षता वाहाव्यातआसननानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितम्।आसनं ते मया दत्तं गृहाण जगदंबिके।।सवत्स गवे नमःआसनार्थे पुष्पाक्षतां समर्पयामीफुल व अक्षता वाहाव्यातपाद्यसौरभेयी सर्वहिते पवित्रे पापनाशिनी।गृहिष्वेतं मयादत्तं पाद्यं त्रैलोक्यवंदिते।।सवत्स गवे नमःपदयोः पाद्यं समर्पयामीमागील पायावर पाणी घालावेअर्घ्यसर्वदेवमये देवी सर्वतीर्थमये शुभे।गृहाणार्घ्यं मया दत्तं सौरभेयी नमोस्तुते।।सवत्स गवे नमःहस्तयोः अर्घ्यं समर्पयामीपुढील पायांवर पाणी घालावेआचमनदेहस्थितासी रुद्राणी शंकरस्य सदा प्रिया।धेनुरुपेण सा देवी मम पापं व्यपोहतु।।सवत्स गवे नमःआचमनीयं समर्पयामीफुलाने पाणी शिंपडावेस्नानया लक्ष्मीः सर्वलोकेषु या च देवेष्ववस्थिता।धेनुरुपेण सा देवी मम पापं व्यपोहतु।।सवत्स गवे नमःस्नानीयं समर्पयामीफुलाने पाणी शिंपडावेवस्त्रआच्छादनं गवे दद्यां सम्यक् शुद्धं सुशोभनम्।सुरभीर्वस्त्र दानेन प्रीयतां परमेश्वरी।।सवत्स गवे नमःवस्त्रं समर्पयामीवस्त्र अर्पण करावेचंदनसर्वदेवमये देवि चंदनं चंद्रसंनिभम्।कस्तुरी कुंकुमाढ्यश्च सुगंधी प्रतिगृह्यताम् ।।गंध,हळद,कुंकु वहावेमाल्यादिनी सुगंधीनी मालत्या दिन वै प्रभो।मया हृतानी पुजार्थं पुष्पाणी प्रतिगृह्यताम्।।सवत्स गवे नमःपुष्पाणी समर्पयामीफुलं वहावीतअलंकारअलंकारान्मया देवी सुवर्णेन विनिर्मिता।प्रित्यर्थं तव देवेशी भुषणं प्रतिगृह्यताम्।।यथाशक्ती अलंकार अर्पण करावेधुपदेवद्रुम रसोद्भूतो गोघृतेन समन्वितः।प्रयच्छामि महाभागे धूपो यं प्रतिगृह्यताम्।।सवत्स गवे नमःधुपं आघ्रापयामीउदबत्ती दाखवावीदीपआनंदकृत् सर्वलोके देवानाश्च सदा प्रियः।गौस्त्वमादि जगन्नाथे दीपो यं प्रतिगृह्यताम्।।सवत्स गवे नमःदीपं दर्शयामीदिवा दाखवावागोग्रास/नैवेद्यसुरभिस्त्वं जगन्मात र्देवी विष्णुपदे स्थिता।सर्वदेवमये ग्रासं मया दत्त मिमं ग्रस।।सवत्स गवे नमःनैवेद्यं समर्पयामी गोग्रासाभोवती पाणी फिरवुन गायीला द्यावा नंतर विडा व दक्षिणा द्यावीप्रदक्षिणागवां दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्याच्चैव प्रदक्षिणम्।प्रदक्षिणीकृता तेन सप्तद्विपा वसुंधरा।।मातरः सर्वभुतानां गाव सर्वसुखःप्रदाः।वृद्धिमाकांक्षता नित्यं गावः कार्याः प्रदक्षिणाः।।सवत्स गवे नमःप्रदक्षिणां समर्पयामीगायीभोवती ३ प्रदक्षिणा घालाव्यानमस्कारपंचगावःसमुत्पन्ना मध्यमाने महोदधौ।तासां मध्ये तु या नंदा तस्यै देव्यै नमो नमः।।सर्वकामदुघे देवि सर्वतिर्थाभिषेचिनी।पावनी सुरभीश्रेष्ठे देवि तुभ्यं नमो नमः।।सवत्स गवे नमःनमस्कारं समर्पयामीनमस्कार करावापुष्पांजलीनमो गोभ्यः श्रीमतीभ्यः सौरभेयीभ्य एव च।नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः।।सवत्स गवे नमःमंत्रपुष्पांजलीं समर्पयामीफुल व अक्षता वहाव्याप्रार्थनागावो ममाग्रतःसंतु गावो मे संतु पृष्ठतः।गावो मे हृदये नित्यं गवां मध्ये वसाम्यहम्।।गवामंगेषु तिष्ठंति भुवनानी चतुर्दश।यस्मात्तस्माच्छिवं मे स्यात् इहलोके परत्र च।।यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सुपारी,नाणे,गंध,अक्षता,फुल घालावे व पुढील मंत्राने गायीच्या पुढ्यात सरळ हाताने सोडावेअर्घ्यदानक्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमोस्तुते।सर्वदेवमये मात र्गृहाणार्घ्यं नमोस्तुते।।यानंतर परत हातात एक पळी पाणी घेऊन निम्नलिखीत मंत्र म्हणुन सोडावेअनेन कृत पूजनेन तेन श्री परमेश्वर प्रीयताम् न मम।तत्सत् कृष्णार्पणमस्तुयानंतर प्रारंभी प्रमाणे आचमन करावे. ।। शुभं भवतु॥

Sunday, 11 September 2022

पारंपारीक आरती “शामलवर्णा … सुरू झाली की ( ९० व्या वर्षी )वडिलांमध्ये वेगळीच उर्जा संचारते… 🙏🙏🙏श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी ।भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी ।तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥कैटभ चाणुर कंसादिक हें शौर्ये वधिले अमित अरी ।नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी ॥अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी ।दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥ २ ॥

Wednesday, 7 September 2022

🙏🙏मला असे वाटते, प्रथम वर्ष वगळून दरवर्षी दोनपार्वणात्मक करता येते हे जरी खरे असले तरी करणारे एकदाच करतात, जिथे सकृन्महालय सुद्धा यथोक्त पद्धतीने कसातरी होतो. तिथे दरवर्षी भरणी श्राद्धाचा रडच आहे, त्यापेक्षा प्रथमवर्षी करण्याचा जो पक्ष आहे, त्याचेच अनुसरण करावे. त्यात अनायासे पार्वणात्मक अनुमासिके सुरु झालेली असतातच, त्यामुळे प्रेत शब्दाचा उच्चार नाहीच. मात्र संकल्प करताना कन्यागते सवितरि महलयपक्षे अद्य भरणीन‌क्षत्रे यमधर्मराजस्यकृपाप्रसाद सिद्ध्यर्थं ----गोत्रस्य---शर्मण: मम पितु: पितृलोक गमने मार्गस्थ समस्त दारुण यातना दु:ख निवारणपूर्वक स्वर्गस्थ समस्त सुखोपभोग प्राप्त्यर्थं मम पितु: भरणीश्राद्धं सदैवं सपिंडं साग्नौकरणं पार्वणेन विधिना चट ब्राह्मण रूपेण सद्य:करिष्ये।प्रत्यक्ष ब्राह्मण मिळाले तर उत्तमच. ह्या श्राद्धाचा और्ध्वदेहिकाशी किंवा अनुमासिकाशी काहीही संबंध नाही. हा एक माता/पित्याच्या मुक्तीसाठी एक अतिरिक्त श्राद्धप्रयोग समजावा एवढेच.अर्थात हे माझे व्यक्तिगत विचार आहेत.कुठल्याही ग्रंथातील काहीही संदर्भ लावू नये. ह्यायोगे वार्षिक घनाघन:क्षोभण:समाप्त होईल असे वाटते.*वे.हरिहरशास्त्री खांडेश्वर नागपूर* @⁨Gkhandeshvar Harihar Dilli⁩

Monday, 22 August 2022

*श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.* श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे आल्यावर श्रीकैवल्याश्रम स्वामीमहाराजांच्या आग्रहावरून एक आठवडाभर म्हणजे जेष्ठ शुध्द दशमीपर्यंत अर्थात दशहरा समाप्ती पर्यंत तेथील श्रीचिदंबरनाथांच्या मंदिरात मुक्काम करून राहिले.यावेळी श्रीसीताराममहाराज श्रीस्वामीमहाराजांच्या बरोबर नव्हते.श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र नरसोबावाडीहून निघाल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी वाडी सोडली.पुढे ते शिरोळ मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरला गेले.तेथून ते श्रीगोदावरी नदीच्या तीरावरील श्रीक्षेत्र राजूर या गावी एक पर्णकुटी बांधून तेथे दीडवर्ष राहिले. श्रीस्वामीमहाराजांचा मुक्काम श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे असताना श्रीक्षेत्र नरसोबावाडीहुन श्री.परशुरामभट पुजारी वगैरे मंडळी त्यांच्या दर्शनाला आली होती.या सर्व मंडळींनी सर्व प्रकारच्या रोगांच्या व संकटाच्या शमनासाठी काहीतरी मंत्र-स्तोत्र इत्यादि द्यावे अशी प्रार्थना केली.त्यावेळी श्रीस्वामीमहाराजांनी सर्व लोकांच्या प्रार्थनेप्रमाणे सर्वरोगशमनार्थ पुढील" श्रीदत्तस्तवस्तोत्र " त्यांना करून दिले व त्यांना त्या स्तोत्राच्या पठणाचे फल सांगताना ते असे म्हणाले की," जो कोणीही स्त्री-पुरुष शुचिर्भूतपणे या स्तोत्राचे त्रिकाल पठण करील त्याला कोणतीही रोगबाधा होणार नाही." श्रीथोरल्यास्वामीमहाराजांनी संसारतापाने तप्त झालेल्या व घोर संकटात सापडलेल्या साधकभक्तांना प्राप्त संकटातून पार पाडून त्यांना श्रीदत्तप्रीती म्हणजे अप्राकृत भक्ती प्राप्त व्हावी म्हणून ही एक अपूर्व स्तोत्रवल्ली किंवा स्तोत्र महौषधी उपलब्ध करून दिली आहे.भूत, प्रेत, पिशाच्च, पाप, ताप, भीती, दैन्य, दारिद्र्य, ग्रहपिडा, खरूज, कोड, कुष्ठादि त्वचारोग, महामारी, प्लेग, संक्रमणशील रोग, उत्पात, संकटे, बाधा, शत्रूंनी केलेले जारणमारणमोहनादि सर्व प्रकारच्या अनर्थकारक गोष्टी दूर करून जय, लाभ, यश, शांती व सर्व प्रकारची प्रापंचिक सुखे प्राप्त करून देणारे हे अमोघ असे " श्रीदत्तस्तवस्तोत्र " आहे.या स्तोत्राचे माहात्म्य वर्णन करताना करताना कै. ब्रम्हश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे यांनी असे म्हटले आहे की," श्रीमद दत्तात्रेयांच्या कलियुगातील अवतारांपैकी श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर झालेल्या तिसऱ्या अवताररूप योगिराज श्रीमदवासुदेवानंदसरस्वती-महाराजांनी केलेले हे " श्रीदत्तस्तवन " रूप अत्युत्तम स्तोत्र आहे.याचे ९ श्लोक आहेत.याच्या नित्य पाठाने किंवा जपाने ऐहिक व पारलौकिक सर्व कामना पूर्ण होऊन तो भक्त श्रीदत्तमहाराजांना अत्यंत प्रिय होतो.श्रीदत्तमहाराज आपणास प्रिय वाटणे व आपण श्रीदत्तमहाराजांना प्रिय होणे या दोन गोष्टीच मनुष्यजन्माचे सार्थक करणाऱ्या आहेत व याच्यासाठीच परब्रम्हपरमात्मा श्रीदत्तांनी आपणास अत्यंत दुर्लभ असा मनुष्यजन्म दिला आहे." " या दोन गोष्टी या स्तोत्रपाठाने व निरंतर जपाने सिध्द होतात असे स्वतः श्रीस्वामीमहाराज म्हणतात.म्हणजे याबद्दल अधिक विचार करण्याचे कारण नाही.येता-जात, बसता-उठता व सोवळ्यात-ओवळ्यात केव्हाही ह्या स्तोत्राचा जप करता येतो व काळाचे सार्थक होते.नाहीतर काळ हा सुर्यरूपाने आपले आयुष्य घेऊन चाललाच आहे.तरी आपले आयुष्य फुकट न जाता आपले सर्वतोपरी कल्याण व्हावे, या करिता विचारी माणसाने या स्तोत्राचा शक्य तितका जप करून आपला उध्दार करून घ्यावा." श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे आले आहेत असे कळल्यावर त्यांच्या दर्शनासाठी दररोज शेकडोशे मंडळी सारखी येत होती.त्याचप्रमाणे रोज चार-पाचशेपर्यंत मंडळी भोजनासाठी तेथे असत यावरून तेथील गर्दीची कल्पना येईल.याठिकाणी दररोज भजन, कीर्तन, पुराण इत्यादी विविध कार्यक्रम सारखे सुरू होते.यावेळीच प्रसिद्ध वेदांती श्री बाबा गर्दे हे श्रीस्वामीमहाराजांच्या सत्संगतीचा लाभ व्हावा या हेतूने मुद्दाम श्रीक्षेत्र गुर्लहोसूर येथे येऊन राहिले होते.या ठिकाणीच परमभक्त श्रीबोठे स्वामींचे व श्रीस्वामीमहाराजांचे श्रीमलप्रभा नदीमध्ये प्रेमालिंगन झाले.त्यामुळे दोघांनाही परमसंतोष झाला.*|| श्री दत्तस्तवस्त्रोत्रम ||*भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||यन्नमस्मरणाद्-दैन्यं पापं तापश्च नश्यति ||भीतिग्रहर्तिदु:स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तं || २ ||दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ||नश्यन्ति अन्येSपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ३ ||संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ||शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तं || ४ ||सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ||यन्नाम शान्तिदं शीघं दत्तात्रेयं नमामि तं || ५ ||त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम ||यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तं || ६ ||वैयादिकृतम्न्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ||नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ७ ||यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ||य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || ८ ||जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम ||भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्-दत्तप्रियो भवेत || ९ ||*इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं**दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम ||*

*मूलपुरुषापासून अशौच कमी करण्याचे विधान*.मूलपुरुषापासून सात पिढी पर्यंत सपिण्ड, ते १४ पर्यंत सोदक, १५ ते २१ पर्यंत सगोत्र अशी गणना आहे. सपिंडाना ८० दिवस, सोदकाना ३ दिवस सगोत्राना ६ दिवस अशौच असून २६ व्या नंतर केवळ सरमानमात्र आहे. *८ ते १४ पर्यंत अशौच कमी करण्याचे विधान*८व्या पिढीतील पुरुष दुसऱ्या ८ व्या पिढीतील पुरुषाचे अशौच ३ दिवस पाळावे. त्याचे विधान - आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य मम मूलपुरुषतः प्रवृत्त सात पौरुष- सापिण्ड्य कारण दशाहाशौच- निवृत्तिद्वारा सोदकत्वप्रयुक्त त्रिरात्राशौच परिपालनाथ नदी स्नानं देवताप्रार्थनां पुनर्नदी स्नान मई करिष्ये ।असे संकल्प सोडून नदी स्नान करून मन्दिरात येवून देवा पुढे मी या पुढे तीन दिवस अशौच पाळतो असे प्रार्थना करून पुनः नदीस्तान करणे. *१४ ते २१ पिढी पर्यंत अशौच करण्याचे विधान*१५ पिढीतला मनुष्य दुसऱ्या १५ पिढीतील मनुष्याचेअशौच 3 दिवस पाळावे. त्याचे विधान -आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य मम मूलपुरुषतः प्रवृत्त- समानोदकत्व प्रत्युवल कारणक त्रिरात्रा शौच निवृत्तिद्वारा सगोत्रत्वप्रयुक्त एकरात्रा - गौच परिपालनार्थ नदीस्त्रानं, देवताप्रार्थनां पुनर्नदी स्नानमहं करिष्ये । -असे संकल्प करून नदी स्नान, देवता प्रार्थना २ पुनः नदी स्नान करून (यापुढे मी ३ दिवस अशौच पाळतो असे प्रार्थना करून) संपविणे.२६ च्या नंतर चा पुरुष- मम मूलपुरुषतः प्रवृत्त सगोत्रत्व - कारणक एकरात्रौ शौचनिवृत्तिद्वारा अवस्मरण निमित्तक स्मरणा शौच परिपालनाय स्थानमात्र करिष्ये असा संकल्प करून नदी स्नानादि करणे. संबन्धराजेश्वरशास्त्री धारवाड

Sunday, 29 May 2022

श्रीशनिजयंती २०२२ लेखक - सचिन मधुकर परांजपे (पालघर) नमस्कार मित्रांनो,दिनांक ३० मे २०२२ रोजी म्हणजे येत्या सोमवारी श्रीशनि जयंती आहे. शनि महाराजांची जयंती हा दिवस म्हणजे तुम्हाआम्हा समस्त शनि भक्तांसाठी एक पर्वणीच असते. शनि महाराज हे कट्टर शिवभक्त असल्याने सोमवारच्या वैशाख अमावस्या म्हणजे शनि जयंतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः मकर, कुंभ आणि मीन या साडेसाती सुरु असलेल्या आणि कर्क व वृश्चिक या अडीचकी सुरु असलेल्या राशीच्या मंडळींनी हा दिवस शनि साधनेसाठी राखून ठेवावा अशी मी अतिशय मनापासून आग्रहाची विनंती करतो आहे. त्याचप्रमाणे इतर सर्व लोकांनी, सर्व राशीच्या स्त्रीपुरूषांनीही पुढील साधना आवर्जून करावी.या दिवशी सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुसरे दिवशी मंगळवारी सूर्योदयापर्यंत कोणत्याही प्रकारे मांसाहार, मद्यपान, अंडी, नशेचे पदार्थ अजिबात सेवन करु नये. उपवास करायची आवश्यकता नाही, एकवेळ केला तर उत्तमच. या दिवशी कायावाचामानसे ब्रह्मचर्यव्रत पालन करावे. या दिवशी जुगार आणि भांडण वादविवाद टाळणे. ही बंधने या पर्वणी पुढील नैमित्तिक साधना करणाऱ्यांसाठी बंधनकारक आहेत.सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून, तुमची दैनंदिन पूजाअर्चा, वाचन वगैरे काही असेल ते करुन तयार होऊन शक्यतो सकाळी ९ ते ११ या कालावधीत शिवालयात जाऊन पिंडीचे प्रार्थनापूर्वक दर्शन घेऊन पिंडीवर शुध्द जल आणि पंचामृत अभिषेक करुन बेल आणि पांढरी फुले अर्पण करून थोडावेळ ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करुन देवळातून घरी यावे. घरी क्षणभर बसून पायधूळ झाडून तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यानंतर तुमची दैनंदिन कामे वगैरे करुन, जेवण विश्रांती वगैरे करुन दुपारी २.१५ ते संध्याकाळी ५ या कालावधीत खालील श्रीशनिकवचाचे जितके शक्य होतील तितके पाठ करावेत. हे पाठ पश्चिम दिशेला तोंड करून मग करावेत. देवासमोर बसूनच करायला हवेत असं नाही. बेडरुममधे नकोत. खाली चटई घालून बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून करा. शक्यतो पाठ सुरु असताना मधेच बोलणे, खाणाखुणा करणे, मोबाईल वगैरे टाळावे. मधे उठून थांबून येरझारे करु शकता. चहा कॉफी पाणी पिऊ शकता. या पावणेतीन तासात किमान २१ पाठ होणे क्रमप्राप्त आहे. अधिक झाल्यास उत्तम. स्त्रीची मासिक पाळी, सोयरसुतक असेल तर मनाने नुसता नमस्कार करा. ही साधना करु नये. कालमानसापेक्ष ज्या देशात जेव्हा ३० मे सोमवार येईल तेव्हा तेव्हा हेच फॉलो करुन याच वेळी साधना करावी. उच्चार कठीण वाटले तर युट्यूबवर शनिवज्रपंजरकवच सर्च करुन उच्चारण ऐका. काय वाट्टेल ते करा पण साधना त्या पर्वणीकाळात कराच. मनःशांती, सुयश, रोगमुक्ती, संरक्षण आणि लाभासाठी ही साधना आहे ती अवश्य करा. पोस्ट अत्यंत काळजीपूर्वक वाचा. थोडं स्वतःचं लॉजिक वापरा आणि त्यातून काही प्रश्न आलेत तर विचारा. पोस्ट ढापून, थोडे फेरबदल करुन आणि माझं नाव खोडून फॉरवर्ड करण्याची घोडचूक अजिबात करु नका. परिणाम विचित्र होतील हे तुम्हीही जाणता. तेव्हा नावासकट संपूर्ण पोस्ट फेसबुक शेअर, व्हॉट्सप करु शकता. धन्यवाद -सचिन मधुकर परांजपे (पालघर) श्रीशनिवज्रपंञ्जरकवचश्री गणेशाय नमः ॥विनियोगः ।ॐ अस्य श्रीशनैश्चरवज्रपञ्जर कवचस्य कश्यप ऋषिः,अनुष्टुप् छन्दः, श्री शनैश्चर देवता,श्रीशनैश्चर प्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ऋष्यादि न्यासः । श्रीकश्यप ऋषयेनमः शिरसि ।अनुष्टुप् छन्दसे नमः मुखे ।श्रीशनैश्चर देवतायै नमः हृदि ।श्रीशनैश्चरप्रीत्यर्थे जपे विनियोगाय नमः सर्वाङ्गे ॥ध्यानम् ।नीलाम्बरो नीलवपुः किरीटी गृध्रस्थितस्त्रासकरो धनुष्मान् ।चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद् वरदः प्रशान्तः ॥ १॥ब्रह्मा उवाच ॥श‍ृणुध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत् ।कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् ॥ २॥कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम् ।शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् ॥ ३॥ॐ श्रीशनैश्चरः पातु भालं मे सूर्यनन्दनः ।नेत्रे छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानुजः ॥ ४॥नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा ।स्निग्धकण्ठश्च मे कण्ठं भुजौ पातु महाभुजः ॥ ५॥स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु-शुभप्रदः ।वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्तथा ॥ ६॥नाभिं ग्रहपतिः पातु मन्दः पातु कटिं तथा ।ऊरू ममान्तकः पातु यमो जानुयुगं तथा ॥ ७॥पादौ मन्दगतिः पातु सर्वांगं पातु पिप्पलः ।अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दनः ॥ ८॥इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य यः ।न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः ॥ ९॥व्यय-जन्म-द्वितीयस्थो मृत्युस्थानगतोऽपि वा ।कलत्रस्थो गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनिः ॥ १०॥अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे ।कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित् ॥ ११॥इत्येतत्कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा ।द्वादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशयते सदा ।जन्मलग्नस्थितान् दोषान् सर्वान्नाशयते प्रभुः ॥ १२॥॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे ब्रह्म-नारदसंवादेशनिवज्रपंजरकवचं सम्पूर्णम् ॥

Saturday, 21 May 2022

*पौराण पुण्याहवाचनम्*सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्धृता । अनंत सस्य दात्री या तां नमामि वसुंधराम् । इति भृमिं स्पृष्ट्‌वा ।जमिनीस हात लावावा.या साम्यायकः सोमो राजायाः शोभना स्मृता । ओषध्यः प्रक्षिपाम्यत्र ता अद्य कलशार्चने । द्वौ धान्यराशीं कृत्वा ।पाटावरील तांदळास हात लावावा.कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रः समाश्रितः । मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ।कुक्षौतु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोथ यजुर्वेदो सामवेदोह्यर्वणः । अंगैश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः ।अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु मम शांत्यर्थ दुरितः क्षयकारकाः । कलशौ संस्थाप्य ।दोन्ही कलशांना हात लावावा.गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वति । कावेरि नर्मदे सिंधो कुंभेऽस्मिन् सन्निधिं कुरु । कलशौ जलेन पूरयित्वादोन्ही कलशांत पळीने थोडे पाणी घालावे.मलयाचल संभूतं घनसारं मनोहरम् । ह्रदयानंदनं दिव्यं चंदनं प्रक्षिपाम्यहम् । कलशयोर्मध्ये गंधं प्रक्षिप्य ।कलशाला गंध लावावे किंवा गंध लावलेले फूल कलशात घालावे.त्वं दूर्वेऽमृत जन्मासि वंदितासि सुरैरपि । सौभाग्य संतति करी सर्वकार्येषु शोभना । इति दूर्वाः ।दोन्ही कलशांत थोड्या दूर्वा घालाव्यात.अश्वत्थोदुंबर प्लक्षचूतन्यग्रोध पल्लवाः । पंचभंगा इतिख्याताः सर्व कर्मसु शोभना । इति पंचपल्लवान् ।कलशातीलांब्याच्या पानांना हात लावावा.फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् । कलशेस्मिन् क्षिपामीदं सर्व कर्म फलप्रदम् । इति कलशद्वये पूगीफले ।कलशांमध्ये एक एक सुपारी घालावी.कनकं कुलिशं नीलं पद्मरागोथ मौक्तिकं । एतानि पंचरत्‍नानि कुंभेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहम् । इति पंचरत्‍नानि ।कलशात पंचरत्‍ने पैसा घालावीत.हिरण्य गर्भ गर्भस्थं हेमबीजो विभावसोः । अनंत पुण्य फलदं कुंभेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहम् । इति हिरण्यम् ।कलशात नाणी घालावीत.सितं सूक्ष्मं सुखस्पर्ष मीशानादेः प्रियं सदा । वासोहि सर्व दैवत्यं देहालंकरणं परम् । इति वस्त्रेण (सूत्रेण वा) संवेष्ट्य ।कलशाला वस्त्र गुंडाळावे.पूर्णपात्रमिदं दिव्यं सिततंडुल पूरितं । देवता स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहम् । इति पूर्णपात्रे कलशद्वये विनस्य ।कलशावर तांदळाने भरलेली वाटी व त्यावर एक सुपारी ठेवावी किंवा कलशावर नारळ ठेवावा.यानंतर उत्तर कलशावर अक्षता वाहून वरुणाचे आवाहन करावे.उत्तर कलशे वरुणं आवाहयेदेवम् ।पाशहस्तं च वरुणं यादसांपतिमीश्वरं । आवाहयामि यज्ञेस्मिन् पूजनार्थं नमातिं तं । कलशे वरुण सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।कलशे वरुणाय नमः । आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । श्री वरुणाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । श्री वरुणाय नमः ।हरिद्रां कुंकुमम् सौभाग्यं द्रव्यं समर्पयामि । श्री वरुणाय नमः । श्री सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि । श्री वरुणाय नमः ।पुष्पं समर्पयामि । श्री वरुणाय नमः । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि । श्री वरुणाय नमः । धूप दीपं च समर्पयामि ।श्री वरुणाय नमः । नैवेद्यार्थे गुड खाद्य नैवेद्यं समर्पयामि ।ॐ प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः ।ब्रह्मणे नमः । नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामिपुनर्नैवेद्यं । ॐ प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।गुळखोबर्‍या भोवती दोन वेळा पाणी सोडावे. त्यानंतर हातावरून तीन वेळा पाणी सोडावे.उत्तरापोशनं समर्पयामि । हस्त प्रक्षालनं समर्पयामि । मुख प्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।फुलाला गंध लावून ते फूल वहावे.मुखवासार्थे पूगीफल तांबुलं सुवर्णनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि ।एका विड्यावर पाणी सोडावे.नमस्करोमि ।नमस्कार करावा.पाशहस्तं च वरुणं यादसांपतिमीश्वरं । आवाहयामि यज्ञेस्मिन् पूजनार्थं नमामि तं । श्री वरुणाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।एक फूल वहावे.इति पंचोपचारैः संपूज्य ।अनेन कृत पूजनेन अपांपति वरुणः प्रीयताम्हातावरून पाणी सोडावे. या नंतर वरुणाची हात जोडून पुढील प्रार्थना करावी.कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रः समाश्रितः । मूले तत्र स्थितो ब्रह्मामध्ये मातृगणाः स्मृताः । कुक्षौतु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ।ऋग्वेदोथ यजुर्वेदो सामवेदोह्यथर्वणः । अंगैश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः । अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा ।आयांतु मम शांत्यर्थं दुरितः क्षयकारकाः । सर्वे समुद्राः सरितास्तीर्थानि जलदा नदाः । आयांतु मम शांत्यर्थं दुरितः क्षयकारकाः ।उत्तर कलशे अक्षतां क्षिपेत्उत्तरेकडील कलशावर चार वेळा अक्षता घालाव्यात.मातृदेवो भव । पितृदेव भव । आचार्य देवो भव । अतिथि देवो भव । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ।ब्राह्मणांच्या मस्तकावर अक्षता घालाव्यात. या नंतर यजमानाने कमळाप्रमाणे दोन्ही हातांची ओंजळ करून मस्तकावर धरावी.ततः अवनीकृत जानुमंडलः कमलमुकुल सदृशं अंजलिं शिरसाद्याय दक्षिणेन पाणिना सुवर्ण पूर्ण कलशं धारयित्वा आशिषः प्रार्थयंते ।एताः सत्या आशिषः संतु ।उजव्या हाताने उत्तर कलश उचलून यजमानाने आपल्या पत्‍नीच्या मस्तकास लावावा व नंतर स्वतःच्या मस्तकास लावावा. नंतर कलश पाटाला टेकवावा.असे तीन वेळा करावे. त्यावेळी मंत्र म्हणावा तो असा-दीर्घा नागा नद्यो गिरयस्त्रीणि विष्णुपदानि च तेन आयुः प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु इति भवतः ब्रुवंतु । तेन आयुः प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुः इतित्रिः ।(३ वेळा) नंतर २-४ ब्राह्मणांच्या हातावर गंध अक्षता फूल विडा व दक्षिणा म्हणून एखादे नाणे ठेवावे. पुढे प्रत्येकास प्रतिवचने द्यावीत.ब्राह्मण हस्ते शिवा आपः संतु । संतु शिवाः आपः । सौमनस्यमस्तु । अस्तु सौमनस्यम् । अक्षतं चारिष्टं चास्तु । गंधाः पांतु ।सौमंगल्यमस्तु । अक्षताः पांतु । आयुष्यमस्तु । पुष्पाणि पांतु । सौश्रियमस्तु । तांबुलानि पांतु । ऐश्वर्यमस्तु । दक्षिणाः पांतु ।बहुदेयं चास्तु । दीर्घामायुः श्रेयः शातिः पुष्टिश्चास्तु । श्रीर्यशा विद्या विनयं वित्तं बहुपुत्रंचायुष्यं चास्तु ।यंकृत्वा सर्व वेद यज्ञ क्रियाकारण कर्मारंभाः शुभाः शोभनाः प्रवर्तंते तमहमोंकारमादिकृत्वा ऋग्यजु सामाशीर्वचनंबहुऋषिमतं संविज्ञातं भवद्‌भिरनुज्ञातः पुण्यं पुण्याहं वाचयिष्ये । वाच्यताम् ।मा विघ्नं मा च मे पापं मा संतु परिपंथिनः । सौम्या भवंतु सुखिनः सर्वे लोकाः सुखावहः । तथास्तु ।करोतु स्वस्ति ते ब्रह्मा स्वस्तिवापि द्विजातयः । सरीसृपाश्च ये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा । स्वस्ति तेऽस्तु द्विपादेभ्यःश्चतुष्पादेभ्य एव च ।स्वस्त्यस्त्व पादकेभ्यश्च सर्वेभ्यः स्वस्ति सर्वदा । व्रत नियम तपः स्वाध्याय क्रतु दमदान विशिष्टायां ब्राह्मणानां मनः समाधियतां ।विप्राः समाहित मनसः स्मः । प्रसीदंतु भवंतः । विप्राः- प्रसन्नाः स्मः । कुंभाज्जलं पात्रे गृहीत्वा तदन्यपात्रे दर्व्या पातयन्वदेत् ।कलशातील थोडे पाणी आपल्या पंचपात्रात काढावे. समोर दोन पात्रे ठेवावीत. पत्‍नीने आपला उजवा हात लावून ठेवावा.दक्षिणेकडील पहिल्या पात्रात पंचपात्रातील पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सतत सोडीत रहावे व ब्राह्मणांनी (खरे तर यजमानाने म्हणावे. परंतु यजमानास म्हणता येत नसल्यामुळे ब्राह्मणांनी) म्हणावे-शांतिरस्तु । पुष्टिरस्तु । तुष्टिरस्तु । वृद्धिरस्तु । अविघ्नमस्तु । आयुष्यमस्तु । आरोग्यमस्तु । शिवं कर्मास्तु ।कर्म समृद्धिरस्तु । धर्म समृद्धिरस्तु । वेद समृद्धिरस्तु । शास्त्र समृद्धिरस्तु । पुत्र समृद्धिरस्तु । धनधान्य समृद्धिरस्तु । इष्ट संपदस्तु । बहिर्देशे -पत्‍नीने लावलेला हात काढावा. यजमानाने दुसर्‍या पात्रात पाणी सोडावे.सर्वारिष्ट निरसनमस्तु । यत्पापं तत् प्रतिहतमस्तु ।पत्‍नीने हात लावावा. यजमानाने पुन्हा पहिल्या पात्रात पाणी सोडावे.यच्छ्रेयस्तदस्तु । उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु । उत्तरोत्तरम हरहरभिवृद्धिरस्तु । उत्तरोत्तरः क्रियाः शुभाः शोभनाः संपद्यंताम् ।इष्टाः कामाः संपद्यंताम् । तिथि करण मुहुर्त नक्षत्र संपदस्तु । तिथि करण मुहुर्त नक्षत्र ग्रह लग्नादि देवताः प्रीयंताम् ।तिथि करणे मुहुर्त नक्षतेर सग्रहे सदैवते प्रीयेताम् । दुर्गा पांचाल्यौ प्रीयेताम् । अग्नि पुरोगा विश्वेदेवाः प्रीयंताम् ।इंद्र पुरोगा मरुद्‌गणाः प्रीयंताम् । ब्रह्म पुरोगा सर्वे वेदाः प्रीयंताम् । विष्णु पुरोगा सर्वे देवाः प्रीयंताम् ।माहेश्वरी पुरोगा उमा मातरः प्रीयेताम् । वसिष्ठ पुरोगा ऋषिगणाः प्रीयेताम् । अरुंधति पुरोगा एकपत्‍न्यः प्रीयंताम् ।ऋषयश्छंदास्याचार्या वेदा देवा यज्ञाश्च प्रीयंताम् । ब्रह्म च ब्राह्मणाश्च प्रीयंताम् । श्री सरस्वत्यौ प्रीयेताम् । श्रद्धा मेधे प्रीयेताम् ।भगवती कात्यायनी प्रीयेताम् । भगवती माहेश्वरी प्रीयेताम् । भगवती पुष्टिकरी प्रीयेताम् । भगवती तुष्टिकरी प्रीयेताम् ।भगवती ऋद्धिकरी प्रीयेताम् । भगवती वृद्धिकरी प्रीयेताम् । भगवंतौ विघ्नविनायकौ प्रीयेताम् ।भगवान् स्वामी महासेनः सपत्‍नीकः ससुतः सपार्षदतः सर्वस्थानगतः प्रीयेताम् । हरिहर हिरण्यगर्भाः प्रीयंताम् ।सर्वा ग्रामदेवताः प्रीयंताम् । सर्वाः कुलदेवताः प्रीयंताम् । सर्वा वास्तुदेवताः प्रीयंताम् । बहिरपः -पत्‍नीने लावलेला हात काढावा. यजमानाने दुसर्‍या पात्रात पाणी सोडावे.हता ब्रह्मद्विषः । हता परिपंथिनः । हता अस्य कर्मणो विघ्नकर्तारः । शत्रवः पराभवं यांतु ।शाम्यंतु घोराणि । शाम्यंतु पापानि । शाम्यंत्वीतय । अंतः-पत्‍नीने हात लावावा. यजमानाने पुन्हा पहिल्या पात्रात पाणी सोडावे.शुभानि वर्धंताम् । शिवा आपः संतु । शिवा ऋतवः संतु । शिवा अग्नयः संतु । शिवा आहुतयः संतु । शिवा ओषधयः संतु ।शिवा वनस्पतयः संतु । शिवा अतिथयः संतु । अहोरात्रे शिवेस्त्याताम् ।शुक्रांगारक बुध बृहस्पति शनैश्चर राहुकेतु सोमसहिता आदित्य पुरोगा सर्वे ग्रहाः प्रीयंताम् । भगवान् नारायणः प्रीयताम् ।भगवान पर्जन्यः प्रीयताम् । प्रीयताम् स्वामी महासेनः । पुण्याह कालान् वाचयिष्ये । वाच्यताम्ब्राह्मं पुण्यं महद्दिव्यं स्वस्त्युत्पादन कारकम् । वेदवृक्षोद्भवं नित्यं तत्पुण्यहं भो ब्रवंतु नः ।यजमानाने म्हणावे -मह्यं सकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनं अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रहमख वास्तुशांत्याख्यस्य कर्मणः पुण्याहं भवंतो ब्रवंतु ।विप्रांनी यजमानाच्या मस्तकावर अक्षता टाकीत तीन वेळा म्हणावे-अस्तु पुण्याहं । अस्तु पुण्याहं । अस्तु पुण्याहं ।स्वस्तिर्या चाविनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा । विनायक प्रिया नित्यं तां स्वस्तिं भो ब्रवंतु नः । यजमानाने म्हणावे -मह्यं सकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनं अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रहमख वास्तुशांत्याख्ये कर्मणि स्वस्तिं भवंतो ब्रवंतु ।आयुष्मते स्वस्ति । आयुष्मते स्वस्ति । आयुष्मते स्वस्ति ।सागरस्य तु या ऋद्धिर्महालक्ष्म्यादिभिः कृता । संपूर्णा पूर्ण चंद्रे या तामृद्धिं भो ब्रवंतु नः ।मह्यं सकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनं अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रहमख वास्तुशांत्याख्यस्य कर्मणः ऋद्धिं भवंतो ब्रवंतु ।कर्मऋद्ध्यताम् । कर्मऋद्ध्यताम् । कर्मऋध्यताम् । ऋद्धिः समृद्धिः ।यानंतर एका सुवासिनीस बोलावून तिच्याकडून गणपति व वरुण यांची हळदकुंकू, अक्षता, फुले घालून पूजा करून घ्यावी. निरांजन ओवाळावे.त्यानंतर यजमान पत्‍नीस हळद-कुंकू व यजमानास फक्त कुंकू लावून औक्षण करावे. यजमानाने त्या सुवासिनीस एक नारळ विडा वगैरे द्यावा.क्षीरोदधि समुद्धूता मथ्यमाने महोदधौ । विष्णोश्चैव प्रिया नित्यं तां श्रियं भो ब्रवंतु नः ।मह्यं सकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनं अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रहमख वास्तुशांत्याख्ये कर्मणः श्रीरस्विति भवंतो ब्रवंतु ।अस्तु श्रीः । अस्तु श्रीः । अस्तु श्रीः ।वर्षशतं पूर्णमस्तु । अमुक गोत्राभिवृद्धिरस्तु । कर्मांग देवताः प्रीयंताम् ।यानंतर यजमानाने उजव्या हाताने उत्तरेकडील कलश व डाव्या हाताने दक्षिणेकडील कलश धरून उचलावा. हात सरळ करून त्या कलशातील पाणीआपल्या ताम्हनात काढावे व पुन्हा कलश पूर्वीच्या जागी ठेवावेत.ततः उत्तर कलशं दक्षिण हस्ते दक्षिण कलशं वाम हस्ते गृहीत्वा ताभ्यां धाराद्वयं संततं पात्रे निषिंच्य तेभिर्मंत्रैः ।वास्तोष्पते भूमिशयान देव पाहि त्वमस्मान् सकलादरिष्टात् । चतुष्पदां च द्विपदां शिवं नो भवत्वभीक्ष्णं तव सुप्रसादात् । शिवं । शिवं । शिवं ।यजमान पत्‍नीं वामतः उपविश्य पात्र पतित जलेन आम्रपल्लवं दूर्वाभिर्वा उदङ्‌मुखं तिष्ठतो विप्रैः यजमान भाले अभिषेकं कार्यम् ।यजमान पत्‍नीने उठून यजमानाच्या डाव्या बाजूस येऊन बसावे. विप्रांनी त्या ताम्हनात काढलेल्या पाण्याचा कलशातीलच घेतलेल्या आंब्याच्या पानांनी किंवा दुर्वांनी व दर्भांनी यजमान पती-पत्‍नीवर अभिषेक करावा. त्यावेळी विप्रांनी उभे राहून आपले मुख उत्तरेस करावे.सुरस्त्वाम् अभिषिंचंतु ब्रह्माविष्णु महेश्वराः । वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः । प्रद्युम्नश्च अनिरुद्धश्च भवंतु विजयाय ते ।आखंडलोऽग्निर्भगवान् यमो वै निऋतिस्तथा । वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवा । ब्रह्मणा सहिताः सर्वे दिक्पालाः पांतु ते सदा ।कीर्तिर्लक्ष्मीअर्धृतिर्मेधा पुष्टिः श्रद्धा क्रियामतिः । बुद्धिर्लज्जा वपुः शांतिः कांतिःस्तुष्टिश्च मातरः । एतेत्वां अभिशिंचंतु देवपत्‍न्यः समाश्रिताः ।आदित्यश्चंद्रमा भौमो बुधजीवसितार्कजाः । ग्रहास्त्वां अभिषिंचंतु राहुः केतुश्च तर्पिताः । देवदानव गंधर्वा यक्षराक्षस पन्नगाः ।ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च । देवपत्‍न्यो द्रुमा नागा दैत्याश्चाप्सरसां गणाः अस्त्राणि सर्व शस्त्राणि राजानो वाहनानि च ।औषधानि च रत्‍नानि कालस्या वयवाश्च ये । सरितः सागराः शैलास्तीर्थानि जलदा नदा । एते त्वां अभिषिंचंतु सर्व कामार्थ सिद्धये ।बलाय श्रियै यससेऽन्नाद्याय अमृताभिशकोऽस्तु शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । शांतिः । शांतिः । शांतिः ।यजमान पत्‍नीने पूर्वीच्या जागी बसावे. यजमानाने म्हणावे -पुण्याह वाचन फल समृद्धिरस्तु इति भवंतो ब्रवंतु ।ब्राह्मणांनी म्हणावे -पुण्याह वाचन फल समृद्धिरस्तु ।