Sunday, 3 June 2018

कालसर्प योग

घातक कालसर्प दोष जातकाच्या पत्रिकेत राहू दहाव्या घरात आणि केतू चवथ्या   घरात असून इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला  घातक कालसर्प दोष  / योग म्हणतात. जातकाच्या जन्मकुंडलीत घातक कालसर्पदोष असल्यास त्याच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. राहू दहाव्या घरात असल्यामुळे त्याला व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. असमाधानकारक नोकरी तसेच व्यवसायामुळे अशा जातकाला सतत नोकरी तसेच व्यवसाय बदलत राहावे लागतात. जातकाला आपल्या आईशिवाय किंवा आपल्या मातृभूमीपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते. जातकाच्या आईला जातकापासून विभाजनाला सामोरे जावे लागू शकते. अशा जातकाच्या आई आणि वडिलांचे आरोग्य खराब असू शकते.
विषधर कालसर्प दोष जातकाच्या पत्रिकेत राहू अकराव्या  घरात आणि केतू पाचव्या  घरात असून इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला  विषधर कालसर्प दोष  / योग म्हणतात. जातकाच्या जन्मकुंडलीत विषधर कालसर्पदोष असल्यास त्याच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. जातकाला डोळे तसेच ह्रिदयाचे विकार होऊ शकतात. त्याचे /तिचे मोठ्या भावंडांशी चांगले संबंध राहत नाहीत. अशा व्यक्तीकडे पैसे अत्यल्प असतो, तसेच असा व्यक्ती अभ्यासात प्रगती साडू शकत नाही. शिक्षण देखील पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्याला आयुष्यात खूप संघर्षाला सामोरे जावे लागते. अशा जातकास अर्थार्जनासाठी घरापासून दूर राहावे लागते. अशा जातकास विषधर कालसर्पमुळे आरोग्य चांगले नसलेली अपत्ये होऊ शकतात.
शेषनाग कालसर्पदोष जातकाच्या पत्रिकेत राहू बाराव्या   घरात आणि केतू सहाव्या   घरात असून इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला  शेषनाग कालसर्प दोष  / योग म्हणतात. जातकाच्या जन्मकुंडलीत शेषनाग कालसर्प दोष असल्यास, अशा व्यक्तीस गवतात सापाचे भय सतत सतावते. काहीही कारण नसताना अशा व्यक्तीस अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. सततच्या तब्बेतीच्या तक्रारींमुळे अशा जातकास सतत रूग्णालयात दाखल करावे लागू शकते. अशा व्यक्तीस चांगल्या अर्थार्जनासाठी मातृभूमीपासून दूर जावे लागते. अशा जातकास उजव्या पायास अपघातामुळे दुखापत होऊ शकते. अशा व्यक्तीचे डोळ्यांचे शस्त्रकर्म होऊ शकते. अशा जातकास दोनदा विवाहाचे योग असू शकतात.

No comments:

Post a Comment