Thursday, 12 April 2018

गळ दोष कसा दूर

मंगळ दोष कसा दूर कराल?
  

मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.

मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो.

मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.

* प्रथम स्थानातील मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमला आणि चतुर्थ दृष्टीचा मंगळ चवथ्या घराकडे बघतो. याची तामसिक प्रवृत्ती दांपत्य
जीवन व घर दोघांना प्रभावित करते.

* चतुर्थ स्थानातील मंगळ मानसिक संतुलन बिघडवतो, दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो.

* सप्तम स्थानातील मंगळ जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात.

* अष्टम स्थानातील मंगळ संतती सुखांना प्रभावित करून आपल्या जोडीदाराचे आयुष्म कमी करतो.

* द्वादश स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. या स्थानातील मंगळ दु:खाचे कारक आहे.

मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

* मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
* कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे).
* उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
* शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
* पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.

सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment