नमस्कार सर्व गुरुजनांना वंदन करुन आजपासुन उपनयन हा विषय मांडतो.आपण सर्व याज्ञिक कर्मातील तज्ज्ञ आहात प्रयोगासंबधी आपण अधिक जाणता मी अल्पमतीने प्रयत्न करेन.
मनु: - ब्रह्मवर्चस कामस्यकार्यं विप्रस्यपंचमे।विष्णु: -षष्ठेतुधनकामस्य विद्याकामस्य सप्तमे अष्टमेसर्वकामस्य नवमेकांतिमिच्छत: ।।संग्रहे: -सप्तमेचाष्टमेवर्षे नवमेदशमेतथा।एकादशेद्वादशेवाह्युपनयने वा द्विजातय़:।।ब्रह्मवर्चस्यमायुष्यंतेजोनाद्यंतथेंद्रियम्।पशून्कामयमानावैप्राप्नुवंतियथा क्रमम्।।
सनातन वैदिक हिंदु धर्मातील महत्वाचा संस्कार म्हणजे उपनयन शब्दश: अर्थ घेतला तर "नवीन डोळ्यांची प्राप्ती "असा होईल काहि जण तर डोऴे येणे अशा साथीशी संबध जोडतील. "ज्ञानचक्षुंची प्राप्ती" हा अधिक संयुक्तीक अर्थ होईल.उपनीत म्हणजे जवऴ नेणे गुरुंच्या जवऴ नेणे .तीसरे नाम व्रतबंध ब्रह्मचर्यपालन, गुरुसेवन, अध्ययन या व्रतांशी बंधन कारक राहणे म्हणजेच व्रतबंध. श्रुतीमताने मते गर्भधारणेपासुन आठवे वर्षी उपनयन करावे.ब्रह्मवर्चस् प्राप्ती कामनेसाठि पाचव्या वर्षी करावे.धनप्राप्तीकरता सहाव्या वर्षी, विद्याप्राप्तीकरता सातव्या वर्षी, सर्वकामना पुर्तीकरता अाठव्या वर्षी करावे.अकरा बारा वर्षांपर्यंत मर्यादा मानली गेली आहे. ब्रह्मचर्य, आयुष्य, आरोग्य, तेज व इंद्रिय निग्रह हा उपनयनाचा हेतु आहे.अन्यथा पशु प्रमाणेच आपले वर्तन होईल.
आपला धर्म व आपले आचार विचार हे उपनयनासारख्या महत्वाचा संस्काराचा "ईव्हेंट " केल्याने मलीन होताहेत.मुंजीचे "सेलिब्रेशन" हॉटेल मध्ये या सारखे दुर्दैव नाहि.घोड्या वरुन नाच गाणे करुन भिक्षा मागणे हा उपनयनाचा हेतु नाहि.मामा मुलगी देणार हा काम विषय ब्रह्मचारी बटुला शास्त्र म्हणुन सांगा हे जोपर्यंत आपण यजमानांना पटवुन देत नाहि तोपर्यंत धर्माचे रक्षक कसे तयार होतील.
यातील चांगले ते तुम्हि ठेवा चुकीच्या गोष्टि निदर्शनास आणा. क्षत्रिय, वैश्य यांच्याहि उपनयना संबधात, अपंग मुलांच्या उपनयना विषयी पुढे बोलुच.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
आताच एक गुरुजींची शंका होती की "मम कामचार कामवाद. "हा संकल्पातील काम म्हणजे काय? कामना असा अर्थ घ्यावा कामभावना हा तिथे अभिप्रेत नाहि. बाल्यअवस्थेत हट्टाने केलेले चुकीचे आचार, हट्ट किंवा अट्टहास, कामनेने केलेले काहि भक्षण (उदा. कांदा लसुण वगैरे ) हा अर्थ तिथे घ्यावा असे माझे मत आहे
हा संकल्प कुमाराकडून करवून न घेता पित्याकडूनच करवावा.
Thursday, 20 August 2015
उपनयन वर्ग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment