सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन कालचा उपनयन विषय पुढे नेतो.
आश्वलायन गृह्यसुत्रानुसार (अध्याय -1 कंडिका -19) अष्टमे वर्षे ब्राह्मण मुपनयने .या खंडात उपनयाचे सार दिले आहे.जन्मापासुन आठव्या वर्षी किंवा गर्भावस्थेपासुन आठव्या वर्षी संस्कार करावा.प्रा.शिंत्रे यांनी भाषांतर केलेल्या पोथीत 15 कंडिकेतील पहिल्या सुत्रांतुन येथे "कुमारम् "अशि अनुवृत्ति येत असल्याने हा व यापुढिल व्रतरुप संस्कार मुलीचे होत नाहित. तसेच इतर स्मृतीतहि वैवाहिको विधि:स्त्रिणामौपनायनिक: स्मृत: असे म्हटले आहे.मुलींच्या उपनयना संबधी हे मत आहे.विवाह हाच मुलींचा व्रतबंध आहे.विषयांतर करुन सांगतो.आठव्या वर्षी मुलाची मुंज व आठव्या वर्षी (अष्ट वर्षात. वगैरे श्लोकात उल्लेख आहेच) मुलीचा विवाह हे दोन्हि व्रतबंधच आहेत.मुलाचा मुंजीनंतर व मुलीचा विवाहा नंतर पुनर्जन्म होतो.म्हणुन दोन्हि कर्म आई पाहत नाहि हे कारण असावे.मुलगा पुनर्जन्माचे प्रतिक म्हणुन जानवे घालतो.मुलगी मंगळसुत्र घालते.दुसर्या जन्माची गर्भाशयाचे प्रतिक म्हणुन बटु खांद्यावर उपरणे घेतो.मुलगी शेला घेते.मुलाची शुत्धि व्हावी म्हणुन अंजली क्षारण आहे. मुलीसाठि कन्यादान आहे. (अंजली क्षारण च आहे एका प्रकारचे) मुलाचा पुनर्जन्म होतो म्हणुन उपनयनात नक्षत्र नामाने संबोधन करतात.आणी याच कारणास्तव मुलीचे नाव विवाहात बदलतात.
आता मुद्याकडे येउ क्षत्रियाचे उपनयन अकराव्या वर्षी व वैश्याचे बाराव्या वर्षी करावे. सोळा वर्षापर्यंतचा काल हा ब्राह्मण कुमारासाठि अतिक्रांत न झालेला समजावा.बावीस वर्षांपर्यंत क्षत्रिय व चौविस वर्षा पर्यंत वैश्यांना मुभा आहे. (अपवाद) या नंतर मात्र कुमार पतितसावित्रीक. समजावेत.यांना गायत्री अधिकार नाहित.किंवा यांचाशी संबध ठेवु नयेत.अशी वेऴ आली असता व्रात्यस्तोम संस्कार व योग्य प्रायश्चित्त घेउन उपनयन करावे.ब्राह्मणाची मेखला मोळ्याची (दर्भाचा प्रकार) , क्षत्रियाची मौर्वी ची (धनुष्याच्या दोरी साठि वापरतात) , वैश्याची मेंढिच्या लोकरीपासुन केलेली घ्यावी.दंडासंबधी ब्राह्मणाला पळसाचा दंड, क्षत्रियाला औदुंबराचा दंड, वैश्याला बेलाचा दंड धारण करण्यासाठि द्यावा.ब्राह्मणाचादंड केस उगवतात एवढा, क्षत्रियाचा कपाऴापर्यंत पोचेल एवढा, वैश्यांचा नाकापर्यंत पोचेल एवढ्या मापाचा असावा.अल्पज्ञानाने मांडणी करतो आहे चुका असतील त्या निदर्शनास आणाव्यात.हि विनंती.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले.
Thursday, 20 August 2015
उपनयन2
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment