joshi bhataji blog
Sunday, 5 October 2025
अंबाजोगाईची आरतीदंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई,भवानी अंबाजोगाई।भावभक्तिने तुला आरती योगेश्वरी आई,गात मी योगेश्वरी आई।।ध्रु।।दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू,माते तुजला ओवाळू।सत्कर्मांचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळू।।तव पदकमलीं लीन निरंतर,पाव झणी माते,मजला पाव झणी माते।धावत येई अघराशींचा नाश करायाते।।सद्भावांच्या फुलवेलीवर भक्तिफुले आली,माते भक्तिफुले आली।वेचुनिया ती तव पदकमली प्रेमे अर्पियली।।तुझ्या कृपेने दैन्य दुःख मम लोपुनिया गेले,वरदे सौख्य घरा आले।शांतिसुखाने मानस माझे आनंदित झाले।।योगेश्वरि मम कुलस्वामिनी आशीर्वच द्यावा,माते आशीर्वच द्यावा।तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा।।नारायण नतमस्तक चरणी,प्रार्थितसे आई,प्रेमे प्रार्थितसे आई।हृदयमंदिरी वास कराया,यावे लवलाही।।
Friday, 19 September 2025
काशीच्या मणिकर्णिका घाटावर चिता शांत झाल्यावर मुखाग्नी देणारा व्यक्ती चितेच्या भस्मावर ९४ लिहितो. ही गोष्ट सर्वांना माहीत नसते. फक्त खरेखुरे बनारसी लोक किंवा आजूबाजूचे लोकच ही परंपरा जाणतात. बाहेरून आलेले शवदाह करणारे लोक हे जाणत नाहीत.जीवनाचे शतपथ म्हणजे १०० शुभकर्मे असतात. १०० शुभकर्म करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुढचा जन्म त्या कर्मांच्या आधारावर शुभ किंवा अशुभ मिळतो. त्यापैकी ९४ कर्म मनुष्याच्या अधीन असतात. ती तो करू शकतो. परंतु ६ कर्मांचे फळ ब्रह्मदेवाच्या अधीन असते.हानि–लाभ, जीवन–मरण, यश–अपयश ही ६ कर्मे विधीच्या नियंत्रणात असतात. म्हणून चितेसोबत तुझे ९४ कर्म भस्म झाले, आता पुढील ६ कर्मेच तुझ्यासाठी नवीन जीवनाची निर्मिती करतील. म्हणूनच १०० – ६ = ९४ असे लिहिले जाते.गीतेतही सांगितले आहे की मृत्यूनंतर मन पाच ज्ञानेद्रियांना घेऊन पुढे जाते. म्हणजेच संख्या ६ होते – मन आणि पाच ज्ञानेंद्रिये. पुढचा जन्म कोणत्या देशात, कुठे आणि कोणत्या लोकांमध्ये होईल हे निसर्गाव्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही. म्हणून ९४ कर्मे भस्म होतात आणि ६ सोबत जातात.विदा प्रवासी, तुझे ६ कर्म तुझ्यासोबत आहेत.आता या १०० शुभकर्मांची सविस्तर यादी दिली आहे. ही जीवनाला धर्म आणि सत्कर्मांच्या दिशेने घेऊन जाते आणि तुझ्या जीवनात सत्कर्म करण्याची प्रेरणा देईल.१०० शुभकर्मांची गणनाधर्म आणि नैतिकतेची कर्मे१. सत्य बोलणे२. अहिंसा पाळणे३. चोरी न करणे४. लोभ टाळणे५. क्रोधावर नियंत्रण ठेवणे६. क्षमा करणे७. दयाभाव ठेवणे८. इतरांना मदत करणे९. दान देणे (अन्न, वस्त्र, धन)१०. गुरूची सेवा करणे११. आई–वडिलांचा सन्मान करणे१२. अतिथी सत्कार१३. धर्मग्रंथांचे अध्ययन१४. वेद आणि शास्त्रांचा अभ्यास१५. तीर्थयात्रा करणे१६. यज्ञ व हवन करणे१७. मंदिरात पूजा–अर्चना करणे१८. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे१९. संयम व ब्रह्मचर्याचे पालन करणे२०. नियमित ध्यान आणि योग करणेसामाजिक आणि कौटुंबिक कर्मे२१. कुटुंबाचे पालन–पोषण२२. मुलांना चांगले शिक्षण देणे२३. गरीबांना अन्न देणे२४. रोग्यांची सेवा करणे२५. अनाथांची मदत करणे२६. वृद्धांचा सन्मान करणे२७. समाजात शांती स्थापन करणे२८. खोट्या वादविवादापासून दूर राहणे२९. इतरांची निंदा न करणे३०. सत्य आणि न्यायाचे समर्थन करणे३१. परोपकार करणे३२. सामाजिक कार्यात भाग घेणे३३. पर्यावरणाचे रक्षण करणे३४. वृक्षारोपण करणे३५. जलसंवर्धन करणे३६. पशुपक्ष्यांचे रक्षण करणे३७. सामाजिक ऐक्य वाढवणे३८. इतरांना प्रेरित करणे३९. दुर्बल घटकांचा उत्थान करणे४०. धर्मप्रसारात सहकार्य करणेआध्यात्मिक आणि वैयक्तिक कर्मे४१. नियमित जप करणे४२. भगवानाचे स्मरण करणे४३. प्राणायाम करणे४४. आत्मचिंतन करणे४५. मन शुद्ध ठेवणे४६. इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे४७. लोभाचा त्याग करणे४८. मोह–मायेपासून दूर राहणे४९. साधे जीवन जगणे५०. स्वाध्याय करणे५१. संतांचे सहवास घेणे५२. सत्संगात सहभागी होणे५३. भक्तीत लीन होणे५४. कर्मफळ भगवानाला समर्पित करणे५५. तृष्णेचा त्याग करणे५६. ईर्ष्या टाळणे५७. शांतीचा प्रसार करणे५८. आत्मविश्वास राखणे५९. इतरांशी उदार राहणे६०. सकारात्मक विचार ठेवणेसेवा आणि दानाची कर्मे६१. भुकेल्यांना अन्न देणे६२. नग्नांना वस्त्र देणे६३. बेघरांना आसरा देणे६४. शिक्षणासाठी दान करणे६५. उपचारासाठी मदत करणे६६. धार्मिक स्थळांची निर्मिती करणे६७. गायींची सेवा करणे६८. प्राण्यांना चारा देणे६९. जलाशयांची स्वच्छता करणे७०. रस्त्यांची निर्मिती करणे७१. यात्रेकरूंकरिता निवास बांधणे७२. शाळांना मदत करणे७३. वाचनालय सुरू करणे७४. धार्मिक उत्सवांत सहकार्य करणे७५. गरीबांसाठी मोफत अन्नदान७६. वस्त्रदान७७. औषधदान७८. विद्यादान७९. कन्यादान८०. भूमिदाननैतिक आणि मानवी कर्मे८१. विश्वासघात न करणे८२. वचन पाळणे८३. कर्तव्यनिष्ठ राहणे८४. वेळेचे पालन करणे८५. धैर्य राखणे८६. इतरांच्या भावनांचा सन्मान करणे८७. सत्यासाठी संघर्ष करणे८८. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे८९. दुःखितांचे अश्रू पुसणे९०. मुलांना नैतिक शिक्षण देणे९१. निसर्गाबद्दल कृतज्ञता ठेवणे९२. इतरांना प्रोत्साहन देणे९३. मन–वचन–कर्म शुद्ध ठेवणे९४. जीवनात संतुलन राखणेविधीच्या अधीन असलेली ६ कर्मे९५. हानि९६. लाभ९७. जीवन९८. मरण९९. यश१००. अपयश९४ कर्मे मनुष्याच्या अधीनवरील यादीतील १ ते ९४ पर्यंतची कर्मे मनुष्य स्वतःच्या विवेक, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांद्वारे करू शकतो. ही धर्म, सत्य आणि नैतिकतेवर आधारित असून जीवनाला सार्थक बनवतात.६ कर्मे विधीच्या अधीनशेवटची ६ कर्मे (हानि, लाभ, जीवन, मरण, यश, अपयश) मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. ती भाग्य, निसर्ग किंवा परमेश्वराच्या इच्छेनुसार घडतात. 🙏आपली जीवन तत्वे माणसाच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करून तयार केली आहेत. #समीर_गुप्ते_यांचे_मुखपुस्तिकेवरुन_साभार
Thursday, 7 August 2025
लेख स्वलिखितसौ मनीषा भावसारसंदर्भ ज्योतिष ग्रंथभगवान श्री कृष्णा ची कुंडली social media वर अशी मिळाली अजून एक दुसरी सुध्दा होती पण त्यांच्या जीवन प्रवासातील घटना या कुंडलीशी मिळत्या जुळत्या वाटल्यास्वतः योग योगेश्वर भगवान श्री कृष्णाची कुंडली माझ्या सारख्या तुच्छ मानवाने सांगणे म्हणजे ..... सहस्र सुर्या समोर काजवा .. पण ज्योतिष शास्त्रानुसार मानवाचे कुतूहल हे उच्च कोटीला जाते आणि जो ईश्वर अखंड ब्रह्मांड चालवतो तो जेव्हा मानव रुपात जन्म घेतो तेव्हा त्या मोहक भगवंताचीपत्रिका कशी असेल कुठले ग्रहयोग असतील हे पाहण्याचा मोह आवरता येत नाही।।वसुदेवसुतं देवं कंस चाणुर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु।।श्रीमद भागवत पुराण( महर्षी व्यास)हरीवंश पुराण यात श्री कृष्ण जन्माची माहिती मिळतेहरीवंश पुराणातील 4 आध्याय मधील श्लोकात श्री कृष्ण जन्म चे वर्णन मिळतेभगवान मानवरूपात जन्माला आल्यावर त्याना सुद्धा ग्रह नक्षत्राच्या गती नुसार फळे मिळतात का?....वेदांचे एक अंग ज्योतिष आहे आणि देव वेदांचे अंतरंग ...ह्या प्रश्न चे उत्तर शोधावे तेहोडे या गुंत्यात माणूस गुंततो....श्री कृष्ण हे श्री विष्णूचे आठवे अवतार आहेत त्यानी मानव रुपात जन्म घेतला गीते च्या 4 अध्यातील 7 व श्लोकात कृष्ण म्हणतात यदा यदा ही .... धर्मस्य. ....या श्लोकात स्वतः कृष्ण सांगतात ' जेव्हा,जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल ....तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्यसाठी मी जन्म घेईन 'स्वतः कृष्णच त्यांच्या जन्माची कथा सांगत आहे...कुंडली विश्लेषण....कृष्ण अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता जेल मध्ये देवकी व वासुदेव यांच्या पोटी जन्म अष्टमी तिथी ही अपार सौंदर्याची तिथी श्री कृष्णा च्या कुंडलीत सुद्धा प्रभू रामाच्या कुंडली प्रमाणे 5 ग्रह उच्च आहेत....चंद्र,गुरू,बुध, शनी आणि मंगळलग्न व राशी स्वामी शुक्र आहे वृषभ लग्न वृषभ रास म्हणजेच अति सुंदर मनमोहक रूप ...हृदयाचा ठाव घेणारे स्मित हास्य ....राजस सुकुमार मदनाचा पुतळा ...सुंदर डोळे खरे तर कृष्ण म्हणजेच आकर्षण चंद्र उच्चीचा म्हणून देवकी व यशोदे कडून भरपूर प्रेम मिळाले पित्या चा कारक सूर्य स्वराशीचा नंद व वसुदेव हे आध्यत्मिक पिते मिळालेचंद्र मनाचा कारक उच्चीचा अनेक विद्या अवगत होत्या चंद्र पराक्रमेश लग्नात उच्चीचा त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पराक्रम करावा लागला मंगळाची दृष्टी पराक्रम स्थनावर ....कारक स्थनावर जिंकण्यासाठी च पराक्रम झाले मंगळ बंधू चा कारक बलराम सारखा भाऊ मिळाला उच्चीचा बुध पंचमात तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रदान करतो...महाभारतातील कृष्ण शिष्टाई आपण जाणतोचत्रितीयतील उच्चीचा गुरू व पंचमातील बुध जगाला गीते चे ज्ञान दिले ....गुरू ची दृष्टी मंगळावर त्यामुळे युद्ध करूनच धर्माची स्थापना झाली ...पण अगोदर युध्द क्षेत्रावर कर्तव्य पूर्ती चे ज्ञान दिले ..संपूर्ण विश्वात भगवद्गीते सारखा दुसरा ग्रंथ नाही तो एकमेवाद्वितीय आहेषष्ठात उच्चीचा शनी व राहू शत्रू हंता योग करत आहेत पण शत्रू चा निप्पात सुद्धा संयमाने केला हा उच्चीचा शनी लोकशाही दाखवतो ते सामान्य गोपगोपिका मध्ये रमले शनी ची पूर्ण दहावी 10 वी दृष्टी गुरुवार ते गूढ ज्ञान व योग योगेश्वर बनले ....माना मानव व परमेश्वर . मी स्वामी पतितांचा ...भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा .....उच्चीचा गुरू धर्म स्थनावर दृष्टी संदीपनी ऋषी सारखे गुरू लाभले ...चंद्र बुध मंगळ नवपंचम योग हा धर्मत्रिकोणात घटित होत आहेसप्तमेश मंगळाची दृष्टी लग्नावर व लाभेशावर बहू भार्या योग झाला आणि अष्टमेश व लाभेश गुरू दृष्टी सुध्दा सप्तमावर त्यांचे विवाह हे युद्ध करून झाले रुख्मिनी स्वयंवर किंवा 16 सहस्त्र नारी वरतांना त्याना युद्ध करावे लागले ....भूषण रामा एक पत्नीव्रत मला नको तसले ....तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अबला गुरू ची दृष्टी जशी धर्म भावावर धर्म स्थापने साठी जन्म आणि गुरू दृष्टी लाभ भावावर धनसंपदा वाढली अनेक लाभ मिळाले धनेश बुध पंचमात प्रद्युम्न योग करत आहे ....सोन्याची द्वारका होती त्याना प्रद्युम्न नावाची शिवशंकरच्या आशीर्वादाने झालेली अतिशय हुशार संतती लाभली होती म्हणजे पंचम भाव खूप स्ट्रॉंग होता वाणी चा कारक बुद्ध पंचमात उच्चीचा ते दिव्य वाणी चे धनी होते ,मंत्र शास्त्र पारंगत ,मित्राचे मित्र होते ..सुदामा प्रेम आपण जाणतोच काही संघर्ष....षष्ठात राहू मामा कडून त्रास ,आजोळी त्रास व्यएश मंगळाची दृष्टी लग्नेश शुक्रावर बंधन योगात जेल मध्ये जन्म ,शनी राहू षष्ठात सर्व आयुष्य शत्रूचा निप्पात करण्यात गेले ...त्याचा दशमेश शनी षष्ठात राहू सोबत पित्याला जेल योग झाला शष्टेश चतुर्थेश युती अनेक जागा बदलाव्या लागल्या व्यएश मंगळाची दृष्टी चतुर्थावर व त्यातील ग्रहावर आई वडिलांना त्रास भोगावा लागला व्यएश मंगळाची दृष्टी लाभेश गुरुवार मोठया बंधू ना त्रास झाला मोक्ष भावात केतु म्हणजे शरीर सोडताना पूर्ण जीवन मुक्त होतेमृत्युतून सुध्दा त्यानी कर्म भोगाचा संदेश दिला ....मोह न मजला कीर्ती चा मी नाथ अनाथांचा .....भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा ....कृष्ण नावाची मोहिनी अशीच अविरत राहो हीच प्रार्थनावरील कुंडली नेट वर मिळाली तशी घेतली कुंडली विश्लेषणात काही चुका असतील तर मार्गदर्शन करावे कुंडली ही फक्त लग्न कुंडली नुसार पहावी लागली राधे कृष्ण🙏सौ मनीषा भावसारManesha @astro
Wednesday, 30 July 2025
" जानवे " जानव्या संबंधित ५ प्रश्न?१) जानवे म्हणजे नेमके काय?२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात का आणी कसे आले?३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे?४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?५) जानवे घातल्याने होणारे याचे फायदे कोणते?ह्याची उत्तरे तूम्हाला माहित. नसेल तर, नक्की वाचा!१) जानवे म्हणजे नेमके काय ?जानवे हे हिंदू धर्मातील प्रत्येक पुरुष व्यक्तींच्या व्यवच्छेदक चिन्हांपैकी एक चिन्ह मानले जाते. जानव्याला यज्ञोपवीत, ब्रह्मसुत्र, यज्ञासुत्र, जनेऊ अशा विविध संज्ञा आहेत.जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत म्हणजे जानवे अशी व्याख्या केली जाते.जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात. तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून एक विशिष्ट गाठ(ब्रह्मगाठ) "ग्रंथी " मारली म्हणजे जानवे तयार होते. अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात. सुतावरुन स्वर्ग गाठणे ह्या मराठी म्हणीतील सूत (बासूत्र ) ते हेच.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना व धारण करताना विशिष्ट मंत्र म्हणतात, तो कोणता ते पुढे जाणून घेऊ. तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात. जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात.यज्ञोपवितामध्ये तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदरांचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सुक्षमतंतू असे नऊ पदर म्हणजेच तंतू असतात. जानव्यातील एकूण ९ तंतूंपैकी• पहिल्या तंतूवर ओमकार असतो.• दुसर्यावर अग्नी असतो.•तिसर्यावर नवनाग असतो.• चौथ्यावर सोम असतो.• पाचव्यावर पितर असतो.• सहाव्यावर प्रजापती असतो.• सातव्यावर वायू असतो.• आठव्यावर यम असतो.• नवव्यावर विश्वदेव असतो.असे नऊ सुत्रिंचे (तंतू) तीन पदर म्हणजेच – •सत्व•रज•तम• हे तिन गुण.हे तीन गुण असलेल्या दोर्याच्या ९६ आंगुळे इतक्या लांब दोऱ्याचे जानवे बनलेले असावे.(जानवे ९६ बोटे लांब असावे असा शास्त्रात उल्लेख आहे.)शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चारअंगुळे )लांबी असलेल्या सूतास, कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून, त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते.जानव्यावर जी "ब्रह्मगाठ" मारली असते, ती अद्वैताची गाठ म्हणजेच “जिव व ब्रम्ह एकच आहे” हा सिद्धांत.चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे “जिवो ब्रम्हैव ना पर” हिच शिकवण देतात.माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात.तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नाचा हारू न फेङितले दिनकरू प्रकाश जैसा ज्ञाने.यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू हा मुख्य धागा होय. देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात.तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे.यज्ञोपविततील तीन मुख्य पदर पुढील त्रयींचे प्रतिनिधित्व करतात.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे तीन आश्रम;गार्हपत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय हे तीन अग्नीसत्व, रज, तम हे तीन गुणपृथ्वी, अंतरीक्ष, दृह्यू हे तीन लोकखांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते.३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते.जानव्याच्या सुताची लांबी ९६ चौंगे असण्यामागे काही कारणे आहेत, ती अशी –प्रथम कारण – चतुर्वेदेषु गायत्री चतुर्विन्शत्येकाक्षरा | तस्मात् चतुर्गुणं कृत्वा ब्रह्मसुत्रं मदिरयेत् ||म्हणजे:-२४ अक्षरयुक्त गायत्री चारही वेदांमध्ये आलेली असल्यामुळे त्यानुसार ब्रह्मसुतांची लांबी (२४×४=९६) ९६ असते.दुसरे कारण म्हणजे –तिथि वार च नक्षत्र तत्ववेद गुणान्वितम् । कालत्रयम् च मासाश्च ब्रह्मसूत्र हि षण्णाव ||म्हणजे :-४ वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद )+ ३ काळ +२५ तत्वे (प्रकृती, पुरुष, महतत्व, अंहकार, पंच महाभुते,पंच विषय, पंच ज्ञानेद्रिय, पचं कर्मेद्रिय, मन) +३ गुण ( सत्व, रज, तम ) +१५ तिथी +७ वार +२७ नक्षत्रे +१२ महिने = ९६;ह्या सर्वांच्या बेरजेनुसार लांबी ९६ येते.तीसरे कारण म्हणजे –सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुलांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्याची सरासरी ९६ अंगुळे येते.हिंदू धर्मात एकूण १६ संस्कार आहेत. ते असे:-1. भूमिका2. गर्भाधान संस्कार3. पुंसाधन संसकार4. सीमन्तोन्नयन5. जातकर्म6. नामकरण संस्कार (बारसे)7. निष्क्रमण8. अन्नप्राशन संस्कार (बोळव)9. मुंडन/चूड़ाकर्म संस्कार (जावळ)10. विद्यारंभ संस्कार11. कर्णवेध संस्कार (कान टोचणे)12. यज्ञोपवीत /उपनयन संस्कार (मुंज)13. वेदारंभ संस्कार14. देशात संस्थार15. समावर्तन संस्कार16. विवाह संस्कारअन्त्येष्टि संस्कार आणि श्राद्ध संस्कारयांतील एका संस्कारात जानव्याचा उल्लेख केलेला आढळतो.पण, वर्णन केलेला उपनयन संस्कार / मौंज म्हणजे नेमके काय?गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, मौंज, व्रतबंध किंवा मौंजीबंधन असेही म्हणतात. गुरूंच्या जवळ राहून, ब्रम्हचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध होय. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. पहिला जन्म आई-बाबांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापसून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात कसे आले?प्राचीन काळी जेव्हा यज्ञाविधी किंवा कर्मकांड केले जात असे, तेव्हा विधी करणाऱ्याच्या शरीराच्या वरच्या भागावर ‘उत्तरीय’ पांघरलेले असावे, असा नियम होता. हे उत्तरीय डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या काखेखालून घेतले जात असे. प्राचीन काळी क्षत्रिय देखील यज्ञाविधि करायचे, त्या मुळे तेही ‘उत्तरीय’ पांघरत असत. पण तेव्हा हे उत्तरीय फक्त विधी चालू असताना पंघरणे बंधनकारक होते. नंतर ते काढून ठेवले तरी चालायचं. मनुष्य प्राणी वस्त्रहीन जन्माला येतो. आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे तो प्राण्याप्रमाणे वावरू शकतो. परंतु माणसाकडे संस्कृतीचा वारसा आणि जबाबदारी असते, म्हणून प्रौढत्त्वाकडे आणि स्वायत्ततेकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणून उपवस्त्र अर्थात् वरून घालायचा कपडा दिला जात असे. उपनयन अर्थात् मुंज हा तोच प्रकार आहे.मुंजीनंतर सदैव उपवस्त्र परिधान करावेच लागते. अंतर्वस्त्राशिवाय तर मुळीच वावरता येत नाही. मुंज झाल्यापासून “सत्यं वद। धर्म चर।” या आदेशाचे पालन अत्यावश्यक, मुंजीच्या आधीची सगळी पापे माफ असतात असे मानतात ते त्यासाठीच हा प्रकार फक्त हिंदुतच नव्हे तर जरतुष्टी (पारशी), ज्यू, आफ्रिकेतील मसाई अशा इतर समाजांतही असतो. जर तुष्टी (पारशी) धर्म हा वैदिक धर्माच्या जवळचा धर्म आहे. वैदिकांत ज्याप्रमाणे उपनयन हा द्वितीय जन्म मानला जातो आणि त्यावेळी बटूला यज्ञोपवित आणि मेखला दिली जाते, जरतुष्टी धर्मात नवजोत (नवीन जन्म) हा विधी असतो ज्यात बटूला सदरा (उपवस्त्र) आणि खुश्ती (मेखला) दिली जाते. ज्यू धर्मात मुलाच्या १३व्या वर्षी त्यावर बार मित्स्वा हा संस्कार केला जातो. वडील मुलाला तालित नामक शाल देतात जी धार्मिक विधी करताना डोक्या आणि खांद्यावरून ध्यायची असते, ह्या संस्कारानंतर मुलग्याचा पुरूष झाला असे समजले जाते. प्राचीन रोमन समाजात स्वतंत्र पराधीन/गुलाम नसलेल्या रोमन नागरिकाचा मुलगा १२-१३ वर्षांचा झाला की त्याल्या त्याचा पहिला तोगा (Toga) नामक लोकरी शाल दिली जात असे.जानव्याप्रमाणेच हा तोगा डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून असा घ्यायचा असतो. धार्मिक कार्यात तोग्याला विशेष महत्व असे. यज्ञ, बळी आदि धार्मिक विधी करताना यजमान त्याचा एक भाग आपल्या डोक्यावर घेत. रोमच्या पवित्र शहराच्या वेशीच्या (Pomerium) आत प्रत्येक रोमन नागरिकाने किमान सार्वजनिक ठिकाणी तरी तोग्याशिवाय फिरू नये असा प्रघात होता. याउलट रोमनेतरांनी आणि गुलामांनी तोगा घालू नये असा देखील नियम होता.आपल्या देशातील उष्म हवामान परिस्थितीमुळे आणि यज्ञकुंडाजवळ बसून राहावे लागत असल्याने ते दिर्घ काळ पांघरून ठेवणे कठीण होत असे. मग त्यावर पर्याय म्हणून तीन धाग्याचे प्रतिकात्मक उत्तरीय म्हणून जानवे किंवा यज्ञोपवीत अस्तित्वात आले.पुढे कालौघात ब्राह्मण जानवे सर्वकाळ घालू लागले आणि ते मग पुढे ब्राह्मण जातीचे प्रतीक बनले.रोमन सम्राट आणि महान तत्त्वज्ञानी पार्कस् ओरेलिअर ला बळी देताना अग्नि समक्ष उभ्या यजमानाने तागा डोक्यावरून घेतला आहे तर यजमानाच्या मागच्या माणसाने तो सामान्यपणे घातला आहे. कुह्राड धरलेला दास मात्र उघडा आहे.महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट ही त्याच्याशीच संबंधित आहे. द्रौपहीचे वस्त्रहरण म्हणजे बलात्काराचा प्रकार असा आजच्या काही लोकांत समज आहे. परंतु त्या काळी वस्त्रहरणाचा अर्थ वेगळा होता. दोन्ही बाबी लज्जास्पद आहेत पण आपण आपल्या आजच्या संदर्भात मूळ अर्थ पाहू शकत नाही. द्रौपदीला जेव्हा सभेत आणले जाते तेव्हा ती पाहते की पांडव बंधु स्वतः उपवस्त्राशिवाय बसले आहेत म्हणजे ते द्युद्धात आपले स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. आजच्या काळात साडी एका कापडाची असते, पण त्या काळी उत्तरीय (ओढणी) आणि अंतरीय (धोतर किंवा परकर) असे दोन प्रकार असत. वस्त्रहरणात द्रौपदीचे उत्तरीय खेचून घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडक्यात तिला गुलामासारखी वागणुन देण्याचा प्रयत्न केला. गेला नंतर दुर्योधन स्वतःची डावी मांडी थोपटतो. डावी मांडी ही पत्नीसाठी असते. उदाहरणार्थ: रामरक्षेत आलेले “वामाङ्कारूढसीता” अर्थात् रामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीता थोडक्यात कुठे त्या पांडवांसोबत गुलाम बनतेस? माझी पत्नी बन. एखाद्या स्त्रीसाठी आणि विशेषतः राजकुळातील स्त्रीसाठी हा घोर अपमान आहे. पण तो आजच्या काळी बलात्कार नाही. पण त्या प्रकरणातून उपवस्त्राचे त्या काळच्या समाजमानसातील महत्त्व दिसून येते. आजच्या काळातही आपण कोणाचा सत्कार करायचा झाला तर शाल किंवा उपरणे देतो.पण,फक्त ब्राह्मण लोकच जानवे घालतात का? नाही,काही लोकांचा असा गैरसमज आहे की ब्राह्मण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी जानवे घालतात. वास्तव मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. पूर्व वैदिक काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण अस्तित्वात होते. वैश्य ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास तो विश् (अर्थात् गाव) या शब्दावरून येतो असे दिसते. वैश्य म्हणजे गावकरी, अर्थात् जनसामान्य ह्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांनाही उपवस्त्राचा (जानव्याचा) अधिकार होता. उत्तर वैदिक काळात जसा समाज अधिक जटिल होते गेला तशी वैश्य समाजाची विभागणी झाली, आणि त्यातून वैश्य (व्यावसायिक) आणि शूद्र (कामगार) समाजाची निर्मिती झाली. हा प्रकार नैसर्गिक आहे आणि तो इतर समाजांतही झालाचे आढळते. युरोपात औद्योगिकरणाच्या काळात भूतपूर्व शेतमजूर समाजाची औद्योगिक आणि मजूर समाजांत विभागणी झाली. शूद्र समाजाचे मूळ हे नक्की सांगता येणे कठीण आहे, पण ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या भागात तरी शूद्रांचा उल्लेख सापडत नाही. तो पहिला दिसतो तो पुरुषसुक्तात, जे फार नंतर रचले गेले. असो. नंतरच्या काळात ब्राह्मणेतर समाजात जानवे घालण्याचे प्रमाण कमी होत गेले. पण वैदिक अनुष्ठानाने हाच पेशा असल्यामुळे ब्राह्मणांत ते तसेच राहिले. आजच्या काळात जेव्हा ब्राह्मण इतर व्यवसायांकडे वळले आहेत, ब्राह्मण समाजातही जानव्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. अनेक प्राचीन देवालयांच्या मूर्तीत देव, दानव, ब्राह्मण, राजे, जनसामान्य, स्त्री देवता सगळेच जानवी घातलेले दिसतात.३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे ?जानवे कसे घालावे त्या विषयी शास्त्र संकेत असा की, ब्रह्मचार्याने एक आणि गृहस्थ व वानप्रस्थिय ह्यांनी दोन जानवी घालावी.उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो.ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. ब्रह्मचाऱ्याने एक, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हटले आहे.प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत. तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हटले आहे. ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दोऱ्याचे आणि वैश्याने बकऱ्याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे. (मनू २.४४)तसेच जानवे बदलत असताना देखील एक मंत्रोपचार सांगितला आहे:-एतावद् दिन पर्यंन्तं ब्रह्मं त्वं धारितं मया |जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सुत्र यथा सुखम् ||म्हणजे:-हे यज्ञोपवीता, आजपर्यंत मी तुला धारण केले. पण, आता तुझ्या जिर्ण होण्यामुळे मी तुला त्यागत आहे.४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?जानवे डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात.पण,जानवे डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंस च उतरते का घालायचे?वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!परब्रह्मोपनिषद – १०ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताची मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहेकृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलले जाते. जानवे धारण केल्याशिवाय अन आणि पाणी ग्रहण केले जात नाही.आंघोळीच्या वेळेस जानवे खांद्या वरुन खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करावे.याज्ञवल्क्य ने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हटले आहे. यज्ञोपवितातील लांबी जास्तीतजास्त कमरे पर्यंत असावी आणि कमीतकमी बेंबीपर्यंत असावी. ही लांबी उपरोक्त प्रमाणात यावी म्हणूनच यज्ञोपविताच्या मुख्यसुताची लांबी ते धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगुलीप्रमाणानुसार असावी असे शास्त्र सांगते.ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे. जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनी जानवे बदलावे असे शास्त्र सांगते.निवीती दक्षिणकर्ने यज्ञोपवितं कृत्वा मुत्रपुरीषे विसृजेत ह्या शास्त्र वचनानुसार शौचसमयी व मूत्र विसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक आहे.आपली अशुचि अवस्था सूचीत करण्यासाठी देखील ही कृती उपयोगी पडते.शौचालयास जाऊन आल्यावर हातपाय धुऊन चुळा भरल्यावर मगच जानवे कानावरुन काढावे.रजस्वला, ओळी बाळंतीण, मृतदेह, चीतकाष्ठ, चिताधूम ह्यांचा शरीराला स्पर्श झाला असेल तर शितोदकाने सचैल स्नान करून अभिमांत्रित करून नवीन जानवे घालावे आणि पूर्वीचे विसर्जन करावे. एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनंतर जानवे बदलावे असा नियम सांगितला आहे.मुत्रविसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक सांगितले आहे.मग हातपाय धुवून चुळ भरल्यावर जानवे कानावरून काढावे. ह्या मागे शास्त्रीय कारण असे की शरीराचा नभी प्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र आणि खालचा भाग अपवित्र मानला गेला आहे.५) जानवे घातल्याने होणारे फायदे कोणते? शौचालयात जाताना हेच जानवे कानाला लावायचीही रीत आहे. कानाला जानवे दोन वेळा लपेटून घेतले तर कानाच्या दोन नसा ज्या पोटाच्या आतड्यांशी संबंधित असतात त्या जागृत होऊन अपचनासारखे विकार दूर होतात हा एक शास्त्रीय फायदा आहे.ॲसिडिटी, पोटाचे विकार, ब्लड प्रेशर आणि इतकंच नाही, तर हृदयरोग या क्रियेमुळे दूर राहू शकतात.मूत्र विसर्जन करताना डाव्या कानाला जानवे लपेटून ठेवल्यामुळे शुक्र बिजांचे रक्षण होते असंही म्हटलं जातं.ज्या पुरुषांना स्वप्रदोषासारखे विकार आहेत त्यांनी कानाला जानवे लपेटून झोपले तरीही फरक पडू शकतो.एकदा जानवे गळ्यात घातले की, माणसाचे विचार, आचार बदलून ते शुद्ध होतात. त्याच्या शब्दांमध्ये माधुर्य येते.आदित्य, वसू, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल, प्रभुती देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने केवळ स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते.उजव्या कानाला सुत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो हे आयुर्वेदशास्त्र दृष्ट्या सिध्द झालेले आहे..तात्पर्य:- केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने यज्ञोपवीत घालणे हे उपकारक असल्यामुळेही यज्ञोपवीत सदा धारण केलेले असावे.
Saturday, 19 July 2025
Copy pasteस्थिर चित्त स्तोत्र :-सध्या आजूबाजूला अनेक विचित्र घटना घडत आहेत. स्पर्धेच्या युगात अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत . दरवेळी अपेक्षापुर्ती होत नाही . अशावेळी मन स्थिर रहाणे ही अवघड गोष्ट झाली आहे. त्यासाठी खालील स्तोत्र उपयोगी पडू शकेल .----------------------------------------------------------------------------- मन स्थिर करण्यासाठी जपावयाचे स्तोत्र -🚩🔸श्री दत्त स्तोत्र 🚩🔸||1||अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते | सर्व देवाधिदेवत्वं मम चित्तंस्थिरि कुरु !! ||2||शरणागत दिनार्त तारका-खिलकारक | सर्व चालक देवत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !! ||3|| सर्व मंगल मांगल्ये सर्वाधि व्याधी भेषज |सर्व संकट हारिनत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||4|| स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशन: | भुक्ति मुक्ति प्रद: सत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||5|| सर्वपापक्षयकरस्ताप दैन्य निवारन: |यो-भीष्टद :प्रभु :सत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !!||6|| य एतत्प्रयत : श्लोक पंचकंप्रपठेत्सुधी : | स्थिर चित्त : स भगवत्कृपा पात्रं भविष्यति ||6|| इति श्री .प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतिविरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् |☄☄☄🌾🌾☄☄☄🌟हे स्तोत्र अतिशय प्रभावी असून या स्तोत्र पठनाने चित्त एकाग्र होते🌟🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🌞श्री गुरुदेव दत्त🌞अनसूया अत्रिपासून संजात ! दत्तात्रेया तू महाबुध्दिमंत !सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात ! माझे चित्त करी स्थिर !! १ !!शरण आलेल्यांचा जगात ! दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात !सर्वचालक देवा तू त्वरित ! माझे चित्त करी स्थिर !! २ !!सर्व मंगलाचे मंगल पावन ! सर्व आधिव्याधींचे औषध महान !सर्व संकटांचा हर्ता तू शोभन ! माझे चित्त करी स्थिर !! ३ !!स्मरताक्षणी स्वभक्तांना ! भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना !भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना ! माझे चित्त करी स्थिर !! ४ !!सर्व पापांचा क्षय करी ! ताप दैन्य सारे निवारी !अभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी ! माझे चित्त करी स्थिर !! ५ !!जो हे श्लोक पंचक वाचतील ! नित्यनेमें नियम चित्त निर्मळ !स्थिर चित्त तो होईल ! भगवतकृपापात्र जगती !! ६ !!इति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् !!
Friday, 20 June 2025
यजमानांचे नजरेतुन अंत्यक्रीया. फेसबुकवर आलेला लेख आहे प्रसिद्ध लेखिका सौ शेफाली वैद्य यांचे मातोश्रींचे नुकतेच निधन झाले त्याबाबतीत त्यांनी मांडलेले विचार आहेत हिंदू अंत्येष्टी – शोक व्यक्त करण्याची पवित्र प्रक्रियाआईच्या जाण्याबद्दलचा हा माझा शेवटचा सार्वजनिक लेख. हा लेख अंतिम संस्कारांकडे डोळसपणे पाहणारी एक श्रद्धावान आणि जिज्ञासू हिंदू व्यक्ती ह्या भूमिकेतून मी लिहिलाय. इथे मला आधीच हे स्पष्ट करायचंय की मी ना कोणी धर्मशास्त्रज्ञ आहे, ना संस्कृत पंडित, ना मी पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा करतेय. पण मातृशोकातून जाताना आणि हिंदू अंत्येष्टीची सर्व कर्मकांडे श्रद्धापूर्वक पार पाडताना देखील विवेकी जिज्ञासेचा तिसरा डोळा उघडा ठेवून सामान्य माणसाला कधी कधी अगम्य, क्वचित भयावह वाटू शकणाऱ्या या विधींमागचा गहन अर्थ समजून घ्यायचा मी यथाशक्ती प्रयत्न केला. त्यासाठी मी मन्मथनाथ दत्त यांनी केलेला गरुडपुराणाचा संपूर्ण अनुवाद परत एकदा वाचला. Tibetan Book of the Dead आधीच वाचलं होतं. त्याशिवाय ग्रिफ मॅनेजमेंट ह्या विषयावर आधारित बरंच पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिलेलं मानसशास्त्रीय साहित्य वाचलं आणि अर्थातच, प्रत्यक्ष विधी सुरु असताना आमच्या पुरोहितांना हजार प्रश्न विचारले. त्यांनीही अतिशय शांतपणे आणि न कंटाळता माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या सर्वाचा परिपाक म्हणजे हा लेख. ह्यात जे काही लिहिलंय, ते माझ्या वैयक्तिक अनुभवावर आणि मी मिळवलेल्या धार्मिक माहितीवर आधारित आहे. हे इथे शेअर करण्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे मला जे उमगलं ते इतरांनांही कळावं. बरेचदा आपण ही सारी कर्मकांडे करतो पण त्या मागचा अर्थ कोणी सहजासहजी आपल्याला नीट उलगडून सांगत नाही. जवळच्या माणसांच्या मृत्यूनंतरचे विधी सर्वांनाच कधी ना कधी करावे लागतात, पण त्यामागचा सांकेतिक अर्थ जर कळला तर नक्कीच वियोगाच्या दुःखावर फुंकर मारल्यासारखं होतं हे मी स्वतः गेल्या १२ दिवसात अनुभवलेलं आहे. इतर कुणाच्या शोकप्रवासात जर हा लेख थोडी तरी सोबत करू शकला तर मी भरून पावेन. मी एक श्रद्धावान हिंदू आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक वेळा वेगवेगळ्या स्वरूपात अग्नीची आराधना केली आहे, कधी देवापुढे दिवा लावून तर कधी घरी होम करवून. अनेक यज्ञही मी पाहिले आहेत, पण ज्या दिवशी माझ्या भावाने माझ्या आईच्या चितेला अग्नी दिला, त्या दिवशी मला खर्या अर्थाने कळलं की अग्नी ही संक्रमणाची देवता आहे. चितेला अग्नी देण्याचा क्षण हा केवळ लाकूड जाळण्याचा क्षण कधीच नसतो. तो एका रूपाचं अरूपात रूपांतर करण्याच्या प्रवासाचा आरंभक्षण असतो. चिताग्नी हा तो अग्नी आहे जो वेदात वर्णिला गेलाय, साक्षी, शुद्धिकर्ता, आणि आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जाणारं दिव्य वाहन.अंत्येष्टी हा हिंदू सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार. शेवटची आहुती. आपण जिवंत असताना जसे यज्ञ किंवा होम करताना अग्नीला आहुती देतो, तसाच हा कुठल्याही व्यक्तीचा शेवटचा यज्ञ, आणि याची आहुती म्हणजे त्याचं स्वतःचं नश्वर शरीर. यज्ञांमध्ये सामान्यतः अग्नी हा केवळ वाहक असतो. पण अंत्येष्टिमध्ये तो आहुतीचा भक्षकही असतो आणि ती हवी देवांपर्यंत पोचवणारा वाहकही असतो. ज्या पंचमहाभूतांपासून देह बनलेला असतो त्याच पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांमध्ये देह परत विलीन होतो. मी लहान असताना माझ्या आजोबांना पत्रात हा मजकूर लिहिताना अनेक वेळा वाचलं होतं की अमुक अमुक यांचा देह पंचमहाभूतांत विलीन झाला. तेव्हा या वाक्याचा पूर्ण अर्थ कधीच कळला नव्हता. पण गेल्या बारा दिवसात तो नीटच कळला. आईला मुखाग्नी द्यायच्या आधी माझा भाऊ जो कर्ता होता, त्याने चितेला तीन उलट्या प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला मातीचा माठ होता, ज्याला भटजी एका छोट्या दगडाने प्रत्येक प्रदक्षिणेत एकेक भोक पाडत होते ज्यातून आतलं पाणी गळत होतं, आधी छोटी धार आणि नंतर मोठी. प्राण जसा हळूहळू शरीर सोडतो, तसंच हे पाणी माठातून निःशब्दपणे निघून जात होतं. तीन प्रदक्षिणा झाल्यावर त्याने तो माठ मागे न पाहता डाव्या खांद्यावरून जमिनीवर जोरात फेकून फोडला. घटभेदन — अंत्येष्टीतील सर्वात विदारक क्षण. जो आपल्याला शिकवतो की त्या माठासारखं मृत शरीर कितीही सुंदर दिसत असलं, तरी आत प्राण नसताना ते नुसतंच एक रिकामं कवच असतं आणि ते नष्ट करावंच लागतं. किंबहुना आपण ते नाही केलं तर निसर्ग ते शरीर नष्ट करणारच असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा स्मशानात गेलो, आईच्या अस्थी संकलनासाठी. खाली वाकून तिच्या अस्थी अलगद उचलून एका तांब्याच्या कलशात ठेवताना मला खूप भरून येत होतं. ज्या प्रेमाने आम्ही भावंडं तिच्या गालावरून हात फिरवायचे, त्याच मायेने आणि हळुवारपणे आम्ही त्या अस्थी आणि थोडीशी रक्षा कलशात भरली. उरलेली सर्व राख आम्ही कुंकळ्ळीच्या पवित्र आणि वीरप्रसवा साळ नदीत विसर्जित केली. काही काळ प्रवाहावर तरंगून ती राख हळूहळू पाण्यात विरत गेली. त्यानंतर आम्ही तिच्या अस्थी कारवारच्या काली नदीत विसर्जित केल्या. कारवार आईचं जन्मगाव. काली नदी आईला खूप आवडायची. जिथे काली नदीचं गोडं पाणी सागराशी एकरूप होतं तिथेच तिच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. जीवाचं ब्रह्मात विलीन होणं, अस्तित्वाचं अव्यक्तात विलीन होणं ह्याचंच जणू प्रतीक असलेली ती जागा होती. ते पहिले तीन दिवस आणि त्यानंतरचे सात दिवस अशौचाचे होते, शोकाचे आणि सामाजिक निवृत्तीचे. ना नवे कपडे, ना देवपूजा, ना चमचमीत जेवण, फक्त विरहाच्या शांततेत डुंबलेलं घर आणि एकत्र बसून आईच्या आठवणी काढणारे आम्ही कुटुंबीय. कोणी शोक प्रदर्शनासाठी येई तेव्हाही त्याच आठवणी निघत, आमचं दुःख हळूहळू हलकं होत होतं. प्रत्येक दिवशी आईच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तिलोदक अर्पण करत होतो. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसापर्यंत मृत व्यक्तीचा आत्मा पितृलोकात जात नसतो. तो अजूनही पृथ्वी लोकातच भटकत असतो धूसर अवस्थेत, गोंधळलेल्या मनस्थितीत. तिलोदक आत्म्याला दिशा देतं, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी.दहाव्या दिवशी, पुरोहितांना घेऊन आम्ही पुन्हा स्मशानात गेलो. धर्मशास्त्राप्रमाणे आता आईची पुढच्या प्रवासाची तयारी झाली होती. आता ती केवळ ‘आई’ राहिलेली नव्हती — ती आता आमची पूर्वज बनणार होती. आमच्या पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण करत तांदूळ आणि तिळाचे दहा पिंड तयार केले. ते सूक्ष्म शरीराचे प्रतीक होते. त्या पिंडांसोबत दर्भाच्या लहानश्या छत्र्या आणि ज्योती अर्पण केल्या गेल्या, दिवसा सावलीसाठी, रात्री प्रकाशासाठी. पुरोहितांनी जेव्हा त्या दर्भाच्या छोट्या मशाली तुपात भिजवून प्रज्वलित केल्या तेव्हा त्यांचा उजेड आमच्याही दुःखाचा अंधार हळूहळू नष्ट करत होता. हिंदू धर्मात कोणीही एकटा जात नाही. प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर कुलपरंपरेत पूर्वज म्हणून सामील केला जातो. हिंदू धर्म संस्कृतीचा अविरत प्रवाह मानतो.अकराव्या दिवशी पुरोहितांनी येऊन घरी होम घातला आणि आमचं घर आणि आम्ही मृत्यूनंतरच्या अशौचातून परत शुद्ध झालो. पंचगव्य शिंपडून घर पवित्र केलं गेलं. आम्हीही सर्वजण एकेक थेंब प्यायलो. आता आम्हीही इतके दिवस थांबवून ठेवलेल्या आयुष्याच्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी तयार होतो. बाराव्या दिवशी सपिंडीकरण होते. अंत्येष्टी संस्कारातला सर्वांत शेवटचा आणि निर्णायक विधी. आईचा पिंड आणि आमची आजी, पणजी, आणि शेणजी यांचे पिंड भावाने विधीपूर्वक एकत्र केले. धर्मानुसार आता आमची आई पितृ झाली होती. आता ती फक्त आमची आई नव्हती, आता ती आमच्या संपूर्ण कुळाची मार्गदर्शिका होती. आता ती आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांची पूर्वज बनली होती. हा निरोप नव्हता. ही होती नवीन नात्याची जाणीव. आमच्या कुलपरंपरेच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहात माझी आई एक नवी लाट बनून विलीन झाली होती. त्यानंतर आला शेवटचा विधी, शुभस्वीकार. अशौचाचा, दुःखाचा काळ आता संपला होता. आता आम्ही पुन्हा आयुष्याला आनंदाने सामोरे जायला मोकळे होतो. इतके दिवस दहन संस्कार करताना वापरलेला कोरा सुती पंचा नेसून सर्व विधी करणाऱ्या माझ्या भावाने आता ते कपडे सोडून रंगीत रेशमी कद परिधान केला, कपाळावर शुभसूचक कुंकुमटिळक लावला आणि हवन केलं. आईच्या द्वादशश्राद्धाला आमचे आप्तेष्ट जमले होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. बारा दिवसांच्या संयम आणि शोकानंतरचं पहिलं एकत्रित जेवण. जेवताना आईच्या आठवणी निघाल्या, तिच्या विनोदांची उजळणी झाली, तिच्या मायेच्या स्पर्शाची सर्वानी आवर्जून आठवण काढली. आमच्या मनावरचं दुःखाचं, शोकाचं सावट हळूहळू दूर होत होतं. ह्या बारा दिवसांच्या प्रवासात मला जाणवलं की हिंदू धर्म जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. बारा दिवस मनसोक्त शोक करू देतो. आपली कर्मकांडे म्हणजे दुःखाचा नीट, शास्त्रोक्त निचरा करायचा एक फॉर्मुला आहे. आपले विधी केवळ धार्मिक नाहीयेत तर मानसशास्त्रीयदृष्ट्या फार अचूक आणि सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वसुरींनी रचलेले आहेत.साधे मंत्र उच्चारतानाही अतिशय विचार करून शब्द योजले गेले आहेत. देवांना आहुती दिली जाते तेव्हा ‘स्वाहा’ म्हटलं जातं.पितरांना काही अर्पण केलं की ‘स्वधा’ हा शब्द उच्चारतात तर प्रेतात्म्याला बोलावताना पुरोहित म्हणतात — ‘उपतिष्ठत’. शब्द बदलतात. अर्थ बदलतो. ध्वनी स्पंदन बदलतं. यज्ञोपवीताची दिशा सुद्धा बदलते. देवकार्य करताना ते डाव्या खांद्यावर असतं — सव्य. पितृकार्य करताना उजव्या खांद्यावर — अपसव्य. ते करत असताना कर्ता वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित असतो, त्याच्या शोकाचे रूपांतर कर्मात होते. त्याचे दुःख तिळातिळाने कमी होत जाते. हिंदू अंत्यसंस्कार फक्त मृत व्यक्तीसाठी कधीच नसतात. ते मागे राहिलेल्या शोकमग्न कुटुंबासाठीही तितकेच महत्वाचे असतात. ते शोकाला एक आकार देतात. त्याला व्यक्त होऊ देतात. त्याला आदराने हात जोडतात आणि मग, हळूहळू, शोकाचं रूपांतर संस्कारात करतात.आपले ऋषी मृत्यूला घाबरत नव्हते. त्यांनी मृत्यू समजून घेतला होता. मृत्यूनंतरच्या शोकातून जीवनाकडे कसा प्रवास करायचा ह्याचा नकाशा त्यांनी ह्या कर्मकांडांद्वारे तयार केला होता. पाण्याचा माठ का फोडायचा? पिंड का तयार करायचा? यज्ञोपवीताची दिशा का बदलते? ह्या सगळ्याला उत्तर आहे. शोकाचेही एक व्याकरण आहे जे आपल्या पूर्वसुरींना ठाऊक होते. — शेफाली वैद्य
Friday, 6 June 2025
दशदाने ः-गो.भू.तिल.हिरण्य.आज्य.वस्त्र.धान्य.गुळ.चांदी.लवणअष्टदाने: - आमान्न.उदकुंभ.गोदान.वस्त्र.भू. शय्या.छत्री. आसनचतुर्दश विशेष दाने:-आमान्न. उदक. चप्पल. कमंडलू. छत्री.वस्त्र.काठी.लोहदंड. बॅटरी(विजेरी. कंदील)दिपदान.तांबूल.चंदन.पुष्प.तिलअन्य विशेष दानेसिद्धस्थाली (पातेली )शाल. कंबल.तिलपात्र.पंखा.तुलसीपत्र.गोपीचंदन.कापूर.आरसा.हळद.कापूस.आसन. शालग्राम.बाणलिंग.माला.पुस्तक.यज्ञोपवितवृषोत्सर्ग ( ३ आमान्ने)
Subscribe to:
Comments (Atom)