Sunday, 17 May 2020

रुद्रसुक्त

🌹 *ऋग्वेद* 🌹

*मण्डल १ सूक्त ४३ ( रुद्र, मित्रावरुण, सोम सूक्त )*
*ऋषि - काण्व घौर : देवता - रुद्र, मित्रावरुण, सोम : छंद - गायत्री, अनुष्टुभ्*

*कद्रु॒द्राय॒ प्रचे॑तसे मी॒ळ्हुष्ट॑माय॒ तव्य॑से ॥ वो॒चेम॒ शंत॑मं हृ॒दे ॥ १ ॥*

*कत् रुद्राय प्रचेतसे मीळ्हुःऽतमाय तव्यसे ॥ वोचेम शंऽतमं हृदे ॥ १ ॥*

अत्यन्त प्रज्ञाशील, अतिशय उदार, अतिशय बलवान व हृदयास अत्यंत प्रमोददायक अशा रुद्राप्रित्यर्थ आम्ही केव्हां स्तोत्र म्हणावे बरें ? ॥ १ ॥

*यथा॑ नो॒ अदि॑तिः॒ कर॒त्पश्वे॒ नृभ्यो॒ यथा॒ गवे॑ ॥ यथा॑ तो॒काय॑ रु॒द्रिय॑म् ॥ २ ॥*

*यथा नः अदितिः करत् पश्वे नृऽभ्यः यथा गवे ॥ यथा तोकाय रुद्रियम् ॥ २ ॥*

ह्या योगाने आमच्या मुलाबाळांवर, गाईवर, नोकरमाणसांवर व जनावरांवर अदितिदेवी रुद्राचे उत्तम आशिर्वाद आणील, ॥ २ ॥

*यथा॑ नो मि॒त्रो वरु॑णो॒ यथा॑ रु॒द्रश्चिके॑तति ॥ यथा॒ विश्वे॑ स॒जोष॑सः ॥ ३ ॥*

*यथा नः मित्रः वरुणः यथा रुद्रः चिकेतति ॥ यथा विश्वे सऽजोषसः ॥ ३ ॥*

व ह्या योगाने मित्र, वरुण, रुद्र, व त्यांचे सहवर्तमान असलेले सर्व देव ह्यांना आमची ओळख राहील. ॥ ३ ॥

*गा॒थप॑तिं मे॒धप॑तिं रु॒द्रं जला॑षभेषजम् ॥ तच्छं॒योः सु॒म्नमी॑महे ॥ ४ ॥*

*गाथऽपतिं मेधऽपतिं रुद्रं जलाषऽभेषजम् ॥ तत् शंऽयोः सुम्नं ईमहे ॥ ४ ॥*

सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो. ॥ ४ ॥

*यः शु॒क्र इ॑व॒ सूर्यो॒ हिर॑ण्यमिव॒ रोच॑ते ॥ श्रेष्ठो॑ दे॒वानां॒ वसुः॑ ॥ ५ ॥*

*यः शुक्रःऽइव सूर्यः हिरण्यंऽइव रोचते ॥ श्रेष्ठः देवानां वसुः ॥ ५ ॥*

हा रुद्र देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे. ॥ ५ ॥

*शं नः॑ कर॒त्यर्व॑ते सु॒गं मे॒षाय॑ मे॒ष्ये ॥ नृभ्यो॒ नारि॑भ्यो॒ गवे॑ ॥ ६ ॥*

*शं नः करति अर्वते सुऽगं मेषाय मेष्ये ॥ नृऽभ्यः नारिऽभ्यः गवे ॥ ६ ॥*

हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो. ॥ ६ ॥

*अ॒स्मे सो॑म॒ श्रिय॒मधि॒ नि धे॑हि श॒तस्य॑ नृ॒णाम् ॥ महि॒ श्रव॑स्तुविनृ॒म्णम् ॥ ७ ॥*

*अस्मे सोम श्रियं अधि नि धेहि शतस्य नृणाम् ॥ महि श्रवः तुविऽनृम्णम् ॥ ७ ॥*

हे सोमा, आमचेसाठीं शेंकडो मनुष्यांचे धन व अनेक शूरांचे यश सिद्ध करून ठेव. ॥ ७ ॥

*मा नः॑ सोमपरि॒बाधो॒ मारा॑तयो जुहुरन्त ॥ आ न॑ इन्दो॒ वाजे॑ भज ॥ ८ ॥*

*मा नः सोमऽपरिबाधः मा अरातयः जुहुरंत ॥ आ नः इन्दो इति वाजे भज ॥ ८ ॥*

सोमास त्रास देणारे अथवा आमच्याशीं शत्रुत्व करणरे लोक आम्हांस उपद्रव न करोत. हे इंद्रा, सामर्थ्याचें कृत्य चाललें असतांना तूं आमचे सन्निध रहा. ॥ ८ ॥

*यास्ते॑ प्र॒जा अ॒मृत॑स्य॒ पर॑स्मि॒न्धाम॑न्नृ॒तस्य॑ ॥*
*मू॒र्धा नाभा॑ सोम वेन आ॒भूष॑न्तीः सोम वेदः ॥ ९ ॥*

*याः ते प्रऽजा अमृतस्य परस्मिन् धामन् ऋतस्य ॥*
*मूर्धा नाभा सोम वेनः आऽभूषंतीः सोम वेदः ॥ ९ ॥*

तूं अमर आहेस. जो तुझा प्रजानन नीतिमत्तेच्या अत्युच्च स्थलावर अधिष्ठित होतो, त्यास हे सोमा, तूं आपल्या पोटाशीं धरलें आहेस - त्यास तूं आपल्य मस्तकावर धारण केलें आहेस. ते दिव्यतेजानें विभूषित झाले हें तुला माहित आहे. ॥ ९ ॥

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Sunday, 10 May 2020

विष्णुसहस्रनामाने

*विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा,वास्तुदोष,पितृदोष,स्वभावदोष नाहीसे होतात.विघ्ने, संकटे दूर पळतात.*

१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.
२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो,म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.
४)एकादशीच्या रात्री १२वाजता स्नान करून विष्णुपुढे(राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको)तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .
.५)४०दिवसांच्या रोज १२वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.
६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा तूप किंवा तुपलावलेल्या तिळांनी विष्णुसहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.
.७)बालकृषणाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते
८)वास्तु दोष जाण्या करिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत,याची सुरुवात बुधवारीच करावी.तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.
.९)बाहेरच्या त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.
१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन
शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.
११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.
.१२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.
.१२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.
१३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.
१४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.
.१५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत,गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.
१६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४वेळा नारायण,नारायण,नारायण नारायण असे नाम घ्यावे.

CP post

Wednesday, 6 May 2020

*नवग्रह कलश स्थापन

🌹 *नक्षत्र जननशांती* 🌹

*नवग्रह कलश स्थापन*

*नवग्रह पीठाच्या ईशान्येस कलश स्थापन*

नवग्रह पीठाच्या ईशान्येस पुण्याहवाचनातील *सर्वोषामाश्रया भूमि०*
इत्यादी सर्व मंत्रांनी वास्तुपीठ कलश जसा स्थापन केला त्याप्रमाणे कलश स्थापन करावा. वरुण पूजा करावी. त्यानंतर वरुणाची प्रार्थना करावी.
*देवदानव संवादे मथ्यमाने महोदधौ । उत्पन्नौऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ।*
यानंतर नवग्रहांचे आवाहन करावे.

*नवग्रह आवाहन मंत्र*

(सूर्याचे मुख पूर्वेला असते.)
*१. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्दुतिं । तमोरों सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ।*
*कलिंग देशोद्भव काश्यपसगोत्र भो सूर्य इहागच्छ इह तिष्ठ । सूर्याय नमः । सूर्यं आवाहयामि ।*
(सोमाचे मुख पश्चिमेस असते)
*२. दधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभव । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।*
*यमुना तीरोद्भव आत्रेयसगोत्र भो सोम इहागच्छ इह तिष्ठ । सोमाय नमः । सोमं आवाहयामि ।*
(मंगळाचे मुख दक्षिणेस असते.)
*३. धरणी गर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ।*
*अवंति देशोद्भव भारद्वाजसगोत्र भो भौम इहागच्छ इह तिष्ठ । भौमाय नमः । भौमं आवाहयामि ।*
(बुधाचे मुख उत्तरेस असते.)
*४. प्रियंगु कलिका श्यामं रूपेणा प्रतिमं बुधं । सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ।*
*मगध देशोद्भव आत्रेयसगोत्र भो बुध इहागच्छ इह तिष्ठ । बुधाय नमः । बुधं आवाहयामि ।*
(गुरूचे मुख उत्तरेस असते.)
*५. देवानांच ऋषिणांच गुरुं कांचन संन्निभं । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं ।*
*सिंधु देशोद्भव आंगिरसगोत्र भो बृहस्पति इहागच्छ इह तिष्ठ । बृहस्पतये नमः । बृहस्पतिं आवाहयामि ।*
(शुक्राचे मुख पूर्वेला असते.)
*६. हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं । सर्व शास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ।*
*भोजकटक देशोद्भव भार्गवसगोत्र भो शुक्र इहा गच्छ इह तिष्ठ । शुक्राय नमः । शुक्रं आवाहयामि ।*
(शनिचे मुख पश्चिमेस असते.)
*७. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ।*
*सौराष्ट्र देशोद्भव काश्यपसगोत्र भो शनैश्चर इहा गच्छ इह तिष्ठ । शनैश्चराय नमः । शनैश्चरं आवाहयामि ।*
(राहूचे मुख दक्षिणेस असते.)
*८. अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिका गर्भ संभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ।*
*राठिनापुरोद्भव पैठीनसगोत्र भो राहू इहा गच्छ इह तिष्ठ । राहवे नमः । राहुं आवाहयामि ।*
(केतूचे मुख दक्षिणेस असते.)
*९. पलाशपुष्प संकाशं तारकाग्रह मस्तकं । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहम् ।*
*अंतर्वेदी समुद्भवं जैमिनिसगोत्र भो केतू इहा गच्छ इह तिष्ठ । केतवे नमः । केतुं आवाहयामि ।*

*नवग्रहांच्या उजव्या अंगास असलेल्या अधिदेवता*

ग्रहांची मुखे ज्या दिशेस असतात त्याप्रमाणे उजवी बाजू धरावी.
रविच्या उजव्या अंगास रुद्र (ईश्वर) अधिदेवता-
*१. रुद्रोदेवो वृषारूढश्चतुर्बाहु स्त्रिलोचनः । त्रिशूल खट्वा वरदा भयपाणिर्नमामि ते । ईश्वराय नमः । ईश्वरं आवाहयामि ।*
*२. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते । उमायै नमः । उमां आवाहयामि ।*
मंगळाच्या उजव्या अंगास स्कंद अधिदेवता-
*३. रक्तांबर बर्हिवाहं चतुर्बाहुं षडानन । कुक्कुट ध्वज घंटा शक्त्युपेतं प्रणमाम्यहम् । स्कंदाय नमः स्कंद आवाहयामि ।*
बुधाच्या उजव्या अंगास नारायण आधिदेवता-
*४. कौमोदकी पद्मशंख चक्रोपेतं चतुर्भुजं । नमामि पुरुषं देवं पन्नगाशन वाहनम् । नारायणाय नमः । नारायणं आवाहयामि ।*
गुरूच्या उजव्या अंगास ब्रह्मा अधिदेवता-
*५.रक्तवर्णश्चतुर्बाहुं हंसारूढश्चतुर्मुखः । पद्माक्ष सूत्र वरदा भय पाणीर्नमामि तं । ब्रह्मणे नमः । ब्रह्माणं आवाहयामि ।*
शुक्राच्या उजव्या अंगास इंद्र अधिदेवता-
*६. इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः । इंद्राय नमः । इंद्रं आवाहयामि ।*
शनिच्या उजव्या अंगास यम अधिदेवता-
*७. दंडहस्तं यमं देवं महामहिष वाहनम् । वैवस्वतं पितृपतिं नौमि नित्यं महाबलम् । यमाय नमः । यमं आवाहयामि ।*
राहूच्या उजव्या अंगास काल अधिदेवता-
*८. कराल वदनं भीमं पाश दंडधरं सदा । सर्पवृश्चिक रोमाणं तं कालं प्रणमाम्यहम् । कालाय नमः । कालं आवाहयामि ।*
केतूच्या उजव्या अंगास चित्रगुप्त अधिदेवता-
*९. उदीच्य वेषः सौम्यश्च लेखनी पत्र संयुतः । चित्रगुप्तो लिपिकरस्तस्मै नित्यं नमो नमः । चित्रगुप्ताय नमः । चित्रगुप्तं आवाहयामि ।*

*नवग्रहांच्या डाव्या अंगास असलेल्या प्रत्यधिदेवता*

रविच्या डाव्या अंगास अग्नि प्रत्यधिदेवता-
*१. आग्न्येः पुरुषोरक्तः सर्व देव मयोऽव्ययः । धूम्रकेतू रजोध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः । अग्नये नमः । अग्निं आवाहयामि ।*
सोमाच्या डाव्या अंगास आप प्रत्यधिदेवता-
*२. स्त्रीरूपाः पाश कलश हस्ता मकर वाहनाः । श्वेता मौक्तिक भूषाढ्या अद्भ्यस्ताभ्यो नमो नमः । अद्भ्यो नमः । अपः आवाहयामि ।*
मंगळाच्या डाव्या अंगास भूमि प्रत्यधिदेवता-
*३. सवेषामाश्रया भूमिर्वराहे समुद्धृता । अनंत सस्य दात्री या तां नमामि वसुंधराम् । भूम्यै नमः । भूमिं आवाहयामि ।*
बुधाच्या डाव्या अंगास विष्णु प्रत्यधिदेवता-
*४. कौमोदकी गदापद्म शंखोपेतं चतुर्भुजं । नमामि विष्णुं देवेशं कृष्णं गरुडवाहनं । विष्णवे नमः । विष्णुं आवाहयामि ।*
गुरूच्या डाव्या अंगास इंद्र प्रत्यधिदेवता-
*५. चतुर्दंत गजारूढं वज्रांकुश धरं सुरं । शचीपति नौमि नित्यं नानाभरणं भूषितं । इंद्राय नमः । इंद्रं आवाहयामि ।*
शुक्राच्या डाव्या अंगास इंद्राणी प्रत्यधिदेवता -
*६. शक्रप्रिया या संतान मंजरी वरदायुधा । इंद्राणी द्विभुजा देवी तस्मै नित्यं नमो नमः । इंद्राण्यै नमः । इंद्राणीं आवाहयामि ।*
शनिच्या डाव्या अंगास प्रजापति प्रत्यधिदेवता-
*७. स्रुवाक्षमाला करक पुस्तकाढ्यं चतुर्भुजम् । प्रजापतिं हंसयान मेकवक्त्रं नमामि तं । प्रजापतये नमः । प्रजापतिं आवाहयामि ।*
राहूच्या डाव्या अंगास सर्प प्रत्यधिदेवता-
*८. अनंतो वासुकिश्चैव कालियो मणिभद्रकः । शंखश्च शंखपालश्च कर्कोटक धनंजयौ । धृतराष्ट्रश्च ये सर्पास्तेभ्यो नित्यं नमो नमः ।*
*सर्पेभ्यो नमः । सर्पान् आवाहयामि ।*
केतूच्या डाव्या अंगास ब्रह्मा प्रत्यधिदेवता-
*९. यज्ञाध्यक्षश्चतुर्मूर्तिर्वेदावासः पितामहः । पद्मयोनिश्चतुर्वक्त्रस्तस्मै नित्यं नमो नमः । ब्रह्मणे नमः ब्रह्माणं आवाहयामि ।*

*क्रतु साद्गुण्य देवता*

(सूर्याजवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे)

*१. अभीप्सितार्थ सिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः । गणपतये नमः । गणपतिं आवाहयामि ।*
*२. तामग्नि वर्णां तपसाज्वल्म्तीं सर्व कामदां । भक्तानां वरदां नित्यं दुर्गादेवीं नमाम्यहं । दुर्गायै नमः । दुर्गां आवाहयामि ।*
*३. वरदान ध्वजधरो धावध्दरिण पृष्ठगः । धुम्रवर्णश्चयो वायुस्तस्मै नित्यं नमो नमः । वायवे नमः । वायुं आवाहयामि ।*
*४. चंद्रार्कौपेतमाकाशं षंधंनीलोत्पलप्रभं । नीलांबर दरं चैव तस्मै नित्यं नमो नमः । आकाशाय नमः । आकाशं आवाहयामि ।*
*५. सर्वैद्यावश्विनौदेवौ द्विभुजौ शुक्लवर्णकौ । सुधाकलश संयुक्तौ वंदे करक धारिणौ । अश्विभ्यां नमः । अश्विनौ आवाहयामि ।*
*६. शूलव्याल कपाल दुंदुभिधनुर्घंटासि चर्मायुधो । दिग्वासा असितः सुदंष्ट्रभृकुटी वक्राननः कोपनः । सर्पव्रात युतांग ऊर्ध्व चिकुरस्त्रक्षोऽहि कौपिनको ।*
*यः स्यात्क्षेत्रपतिः सनोस्तु सुखदस्तस्मै नमः सर्वदा । क्षेत्रपालाय नमः । क्षेत्रपालं आवाहयामि ।*
*७. वास्तोष्पते नमस्तुभ्यं भूशैय्या भिरत प्रभो । प्रसीद पाहि मां देव सर्वारिष्टं विनाशय । वास्तोष्पतये नमः । वास्तोष्पतिं आवाहयामि ।*

*क्रतु संरक्षक देवता*

*१. इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः । इंद्राय नमः । इंद्रं आवाहयामि ।*
*२. आग्नेयः पुरुषोरक्तः सर्व देव मयोऽव्ययः । धूम्रकेतू रजोऽध्यक्शस्तस्मै नित्यं नमो नमः । अग्नये नमः । अग्निं आवाहयामि ।*
*३. दंडहस्तं यमं देवं महामहिष वाहनम् । वैवस्वतं पितृपतिं नौमि नित्यं महालबम् । यमाय नमः । यमं आवाहयामि ।*
*४. निऋतिं खङ्गहस्तं च सर्व लोकैक पावनम् । नरवाहनमत्युग्रं वंदेऽहं कालिकाप्रियं । निऋतये नमः । निऋतिं आवाहयामि ।*
*५. वरुणं पाशहस्तंच यादसांपतिमीश्वरं । अपांपति महं वंदे देवं मकर वाहनम् । वरुणाय नमः । वरुणं आवाहयामि ।*
*६. अनाकारो महौजाश्च यश्चादृष्ट गतिर्दिवि । जगत्पूज्यो जगत्प्राणस्तं वायुं प्रणमाम्यहम् । वायवे नमः । वायुं आवाहयामि ।*
*७. सर्व नक्षत्र मध्ये तु सोमो राजा व्यवस्थितः । तस्मै नक्षत्रपतये देवाय सततं नमः । सोमाय नमः । सोमं आवाहयामि ।*
*८. सर्वाधिपो महादेव ईशानश्चंद्र शेखरः । शूलपाणिर्विरूपाक्षस्तस्मै नित्यं नमो नमः । ईशानाय नमः । ईशानं आवाहयामि ।*
यानंतर
*आदित्यादि नवग्रह देवतोभ्यो नमः ।*
असे म्हणून नवग्रहांची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यावर यजमान पती पत्नीच्या हस्ते पंचोपचार पूजा करावी.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*