Thursday, 12 April 2018

गळ दोष कसा दूर

मंगळ दोष कसा दूर कराल?
  

मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.

मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो.

मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.

* प्रथम स्थानातील मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमला आणि चतुर्थ दृष्टीचा मंगळ चवथ्या घराकडे बघतो. याची तामसिक प्रवृत्ती दांपत्य
जीवन व घर दोघांना प्रभावित करते.

* चतुर्थ स्थानातील मंगळ मानसिक संतुलन बिघडवतो, दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो.

* सप्तम स्थानातील मंगळ जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात.

* अष्टम स्थानातील मंगळ संतती सुखांना प्रभावित करून आपल्या जोडीदाराचे आयुष्म कमी करतो.

* द्वादश स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. या स्थानातील मंगळ दु:खाचे कारक आहे.

मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

* मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
* कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे).
* उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
* शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
* पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.

सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे.

Tuesday, 10 April 2018

हाचा स्वभाव व प्रभाव

ग्रहाचा स्वभाव व प्रभाव

  

सूर्य -पुरुष जातीचा, रक्त वर्ण, पित्त प्रकृतीचा, पूर्वेचा स्वामी. हा आत्मा, आरोग्य, स्वभाव, राज्य यांचा सूचक व जनक आहे. याच्याद्वारे शरीरातील अपचन, अतिसार मंदाग्नी, डोकेदुखी, क्षय, मानसिक रोग, डोळ्यांचे विकार, नैराश्य, अपमान व भांडणाचे विचार केले जातात. मणका, स्नायू, काळीज, डोळे या अवयांवर याचा प्रभाव आहे. याच्याकडून वडिलांच्या बाबतीत विचार केला जातो. सूर्य लग्नाच्या सातव्या स्थानात बळी तर मकर राशीपासून सहाव्या राशीपर्यंत चेष्टाबली मानले जाते सूर्याला तापग्रह म्हटले जाते.

चंद्र -स्त्री जातीचा, पांढरा रंगाचा, जलीय म्हणजेच वायव्य दिशेचा स्वामी आहे. हा मन, संपत्ती, चित्त वृत्ती शारीरिक स्वास्थ, राजकीय अनुग्रह, माता-पिता तसेच जलोदर, मूत्राचे विकार, मानसिक रोगाला स्त्री रोग, निरर्थक फिरणे, पोट तसेच डोक्यासंबंधी विचार केला जातो. हा रक्ताचा स्वामी असून वातश्लेजा याचा धातू आहे. चंद्र लग्नी 4 थ्या स्थानापासून बळी तर मकर राशीपासून सहा राशीत वक्री होतो. कृष्ण पक्षाच्या षष्ठी पासून शुक्ल पक्षाच्या दशमी पर्यंत हा क्षीण असतो या अवधीत त्याला पापग्रह म्हणतात. शुक्ल पक्षाच्या दशमीपासून कृष्ण पक्षाच्या पंचमीपर्यंत हा क्षीण असतो या अवधीत त्याला पापग्रह म्हणतात. शुक्ल पक्षाच्या दशमीपासून कृष्ण पक्षाच्या पंचमीपर्यंत तो तेजस्वी असतो तेव्हा त्याला शुभ ग्रह म्हणतात. पूर्ण चंद्रच आपल्या चवथ्या स्थानात पूर्ण फळ देतो. (क्षीण चंद्र नाही).

मंगळ -हा पुरुष जातीचा, रक्त वर्णी, दक्षिणेचा स्वामी, अग्नी तत्वाचा तसाच पित्त प्रवृत्तीचा कारक व नियामक आहे. ज्योतिषशास्त्रात याला पापग्रह मानले आहे. हा उत्तेजित करणारा, तृष्णाकारक, तसेच दुःख:दायक आहे. मंगळ तिसर्‍या व सहाव्या स्थानी लाभदाक तर दहाव्या स्थानी संमिश्र फळ देणारा व चंद्राबरोबर वक्री तसेच दुसर्‍या स्थानी निष्फळ व बलहीन असतो.

बुध -हा नपुंसक जातीचा, काळसर वर्णाचा उत्तरेचा स्वामी, त्रिदोष प्रकृती तसेच पृथ्वीतत्वाचा आहे. हा ज्योतिष वैधकी, कला, शिल्पकला, कायदा, व्यवसाय, चवथ्या व 10व्या स्थानांचा कारक आहे. गुप्त रोग, ‍अतिसार, वातरोग कोड, मुकेपणा, वृद्धाश्रम, ‍‍विवेक, शक्ती जीभ तसेच शब्द बोलण्याच्या संबंधीत अवयवांचा विचार केला जातो. बुध, सुर्य, मंगळ, राहू, केतू तसेच शनी जे अशुभ ग्रह आहेत ते बरोबर असतील (युती) तर अशुभ फळे मिळतात. आणि पूर्णचंद्र, गुरु, शुक्र ह्या ग्रहांबरोबर शुभ फळ मिळते. जर बुध चवथ्या स्थानात असेल तर निष्फळ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ज्याच्याबरोबर असेल तसे फळ देतो. एकटा असताना तो शुभ ग्रह आहे.

गुरु -हा ग्रह पुरुष जाती, पीतवर्ण ईशान्येचा स्वामी, तसेच आकाशतत्वाचा आहे. हा कफ व चरबीची वृद्धी करतो. ह्याच्या साहाय्याने शोध, सृजन हे रोग, घर विद्या, पुत्र पौत्र आदी गोष्टींचा विचार केला जातो. हा हृदयाच्या शक्तीचा कारक ही मानला जातो. गुरु लग्नी असेल तर बली असतो पण चंद्राबरोबर कुठे असेल तर तो वक्री होतो. हा शुभ ग्रह आहे, ह्याद्वारे पारलौकिक आणि आध्यात्मिक सुखांचा विशेष विचार केला जातो.

शुक्र -हा ग्रह स्त्री जाती, श्याम गौर वर्ण, आग्नेयेचा स्वामी कार्य कुशल तसेच जलीय तत्त्वाचा आहे. हा कफ वीर्य या धातूंचा कारक म्हटला जातो. याच्या प्रभावामुळे शरीराचा रंग गहुवर्णीय होतो. हा काव्य, संगीत, वस्त्राभूषण, वाहन, शैय्या, पुष्प, डोळे, स्त्री, पत्नी तसेच कामेच्छाकारक आहे. याच्याद्वारे चतुरपणा आणि सांसारिक सुखासंबंधी विचार केला जातो. जर व्यक्तीचा जन्म दिवसा झाला असेल तर शुक्राच्या मदतीने आईशी असणार्‍या संबंधांचाही विचार केला जातो. हा सहाव्या स्थानी निष्‍फळ होतो. जर सातव्या स्थानी असेल तर ‍अनिष्ट फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला शुभ ग्रह मानले आहे. याद्वारे सांसारिक व व्यावहारिक सुखाचा विचार केला जातो.

शनी :हा ग्रह नपुंसक जातीचा, कृष्ण वर्णीय पश्चिमेचा स्वामी, वायुतत्वाचा व वातश्लेष्मीक प्रकृतीचा आहे. याद्वारे आयुष्य, शारीरिक बल, निश्चय, संकट, मोक्ष, यश, ऐश्वर्य, नोकरी, योगाभ्यास विदेशी भाषा, आणि मूर्च्छा या रोगांचा विचार केला जातो. जर व्यक्तीचा जन्म रात्री झाला असेल तर तो आई वडिलांना कारक आहे. शनी सातव्या स्थानी बली आहे. पण वक्री-ग्रह किंवा चंद्र यांच्या जोडीने तो वक्री होतो. शनी क्रूर तसेच पापग्रह आहे. पण अंतिम परिणाम सुखद होतो. हा माणसाला दुर्भाग्य, संकट आणि फेर्‍यात अडकवून शेवटी त्याला शुद्ध आणि सात्त्विक बनवतो.

राहू -हा काळ्या रंगाचा, क्रूर ग्रह आहे हा ज्या स्थानी बसतो तेथील प्रगती तो थांबवतो, हा गुप्त युक्तीबल कष्ट तसेच त्रुटी दर्शवतो.

केतू -हाही काळ्या रंगाचा, क्रूर ग्रह आहे. याच्याद्वारे नाक, हात, पाय, भूकेसारखे कष्ट, तसेच चर्मरोग आदी गोष्टींचा विचार केला जातो. हा गुप्त शक्ती, ताकद, कठिण कार्य, भीती तसेच कमतरतेचा कारक आहे. काही स्थितीत केतू शुभ ग्रह मानला जातो.

Sunday, 8 April 2018

नारायण_नागबली

🙏हर हर महादेव 🙏

#नारायण_नागबली

नारायण नागबली चा प्रमुख उद्देश म्हणजे अतृप्त पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा त्यांना मोक्षपद देण्यासाठी हे विधान केले जाते. कारण दुर्मरणाने मृत झालेल्यांच्या, बऱ्याचशा इच्छा वासना पूर्ण होऊ शकत नाही.काही तीव्र इच्छा मृत्यू नंतरही आत्म्याचा पिछा सोडत नाही अशा स्थितीमध्ये वायुरूप होऊन आत्मा पृथ्वीवर भ्रमण करतो . वास्तवत: जीवात्मा सूर्याचा अंश असतो जो निसर्गत: मृत्यूनंतर सूर्याकडे आकर्षित होते. परंतु वासना व इच्छा आत्म्याला वातावरणात राहण्यासाठी जबरदस्ती करतात. अशा  स्थितीमध्ये आत्म्याला फार पीडा होते आणि मुक्ती मिळवण्यासाठी वंशातील लोकांना प्रापंचिक किंवा सांसारिक समस्या निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी सामान्य मनुष्य पहिल्यांदा वैद्यकीय सहाय्य घेतो. तरीही त्या उपचारांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून मनुष्य ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो . कारण  कुंडलीमध्ये काही ग्रहांची स्थिती अशा प्रकारची असते ज्यात पितृदोष असल्याचा अनुमान काढला जातो.

नारायण नागबली विधी

#पहिला_दिवस

हा तीन दिवसांचा विधी असून प्रथम तीर्थराज कुशावर्त तीर्थावर देह शुद्धी प्रायश्चित्त स्नान करून नारायणबली पूजा (नक्षत्राप्रमाणे) केली जाते. यामध्ये आपल्या जन्मापासून दोन परिवारांचा संबंध येतो एक वडीलांकडील सात पिढ्या व दुसरी मामाकडील सात पिढ्या अशा चौदा पिढ्यांमध्ये जर काही अपमृत्यू झाले असतील.
श्राध्द तर्पणादिकांचा लोप झाला असेल तर जन्म कुंडलीत पितृदोष येतो किंवा कुंडलीमध्ये पितृदोष नसूनही आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर आपल्याला पितृशापाने त्रास होत आहे असे समजावे. आपल्या व्यवहारिक कार्यात येत असलेल्या प्रश्नांचे अडचणीचे निवारण आपण करण्यासाठी नारायण नागबली हा विधी करू शकतो.
हा विधी नारायण या नावाने व काश्यप या देवाच्या गोत्राने केला जातो. कारण आपल्या चौदा पिढ्यांचा उद्धार होऊन चौदा पिढ्यांमध्ये जे जे कोणी अपमृत्यू गेले आहे, ज्यांचा श्राद्धादि कर्माचा लोप झाला आहे. त्या सर्वांना मोक्ष सुख प्राप्त होते.

#दुसरा_दिवस

या विधीच्या दुसऱ्या दिवशी नागबली कर्म केले जाते ."अंतीसा गती" या शास्त्राच्या उक्तीप्रमाणे अंतकाळी माणसाची इच्छा आकांशा असते . तशीच त्याला गती प्राप्त होते.

#धनलोभात_मृतायेच_सर्प_योनिर्व्यवस्थि :

आपल्या चौदा पिढ्यांमध्ये जे जे कोणी धनलोभात गेले आहे त्या सर्वांना सर्प योनी प्राप्त होते. सर्पाला नैसर्गिक मृत्यू नसल्याने किंवा धनाच्या  वासनेने आपल्या घरात किंवा आसपास आपल्या दृष्टीस पडला असता , आपल्या हातून त्याची हत्या झाली असता त्याचा अपमृत्यु होतो त्यांच्या निवारणासाठी नागबली ही पूजा केली जाते.

#पुत्रस्थानगते_राहौ_कुजेनापि_निरीक्षते ।।
#कुजक्षेत्रगते_वापि_सर्प_शापानसुतक्षय:||

जर कुंडलीमध्ये पंचम स्थानात राहू मंगळाने दृष्ट अथवा मंगळाच्या राशीत असेल तर सर्प शाप योग होतो व त्यामुळे संतातीची हानी होऊ शकते . त्याच्या निवारणा करता नागबली हा विधी केला जातो .

#तिसरा_दिवस

विधीच्या तिसऱ्या दिवशी गुरुजींच्या घरी गणपती पूजन, पुण्याहवाचन , सुवर्ण नाग प्रतिमेचे पूजन दानादी संकल्प अशी पूजा केली जाते. शुभाशीर्वाद घेऊन या विधीची सांगता केली जाते.

#नारायण_नागबली_हा_विधी_त्र्यंबकेश्वर_या_क्षेत्री_च_काकरावा?

१. त्र्यंबकेश्वर

येथे "लय तत्व स्मशान" आहे काशी, उज्जेन नंतर म्हणजे उत्पत्ती व स्थिती नंतर लय महास्मशान त्र्यंबकेश्वर ला आहे . याच ठिकाणी पाप पुण्याचा क्षय होतो तसेच पितरांना आवाहन केले असता ते सद्गती घेण्यासाठी उपस्थित होतात या क्षेत्राच हे वैशिष्ट्य आहे

२. गोदावरी नदी

दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी जिला आपण गोदावरी असे म्हणतो त्या नदीच उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे म्हणून तिला दक्षिण वाहिनी असे म्हणतात

३. कुशावर्त तीर्थ

भारत वर्षातील सर्व तीर्थांचे राजा ज्याला आपण कुशावर्त तीर्थ म्हणतो ते इथे आहे. याच तीर्थामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.

४. त्र्यंबकेश्वर  ज्योतिर्लिंग मंदिर

भारतामध्ये भगवान शंकरांचे 12 ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत त्यातले एक व यामध्ये सर्वात वेगळे असे ज्योतिर्लिंग मंदीर इथे आहे कारण इथली महादेवाची मूर्तीमध्ये महादेव एकटे नसून  ब्रह्मा, विष्णू, शंकर हे तीनही देव एकत्र लिंग स्वरूपात आहे व सोबत गोदावरी माता पण शक्तिच्या रुपात आहे
म्हणून तर सर्वात वेगळे असे हे ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर  आहे

५. संगम

गोदावरी व अहिल्या या दोन्ही नद्यां चा संगम इथे आहे याचं ठिकाणी पवित्र अशी सती ची मंदिर आहेत की ज्या ठिकाणी दोन दिवस ही पूजा केली जाते

अशी ही भौगोलिक परिस्थिती हा विशेष गुण आहे
म्हणून या क्षेत्राला जास्त महत्व आहे
या क्षेत्रात जो जातक येऊन पूजा करेल त्याला त्या कर्माचे फळ लवकरात लवकर प्राप्त होते.

#महत्वपूर्ण_सूचना.

सध्याच्या काळात काही बाहेरील ब्राह्मण हा विधी काही मूठभर लोकांच्या साहाय्याने त्रंबकेश्वर बाहेरील आश्रमात करून लोकांची फसवणुक करत आहे. इथल्या स्थानिक ब्राह्मण(ज्या लोकांकडे अधिकार आहे) त्यांच्या कडून हा विधी करू शकतात. स्थानिक ब्राह्मणां च्या घराबाहेर संघाचा(पुरोहित संघ) लोगो दिला आहे त्यावरून तेथील स्थानिक आहे की नाही हे ओळखू शकता.

गुरुजी
मयुरेश महेंद्र दीक्षित
कुशावर्त तीर्थाच्या पाठीमागे
त्र्यंबकेश्वर
98 50 65 33 39
97 63 65 33 39