Tuesday, 6 March 2018

विवाह आणि ज्योतिषशास्त्र लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना. त्यामुळे आपले लग्न कधी होईल, कुणाशी होईल लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना. त्यामुळे आपले लग्न कधी होईल, कुणाशी होईल, कसे होईल याविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रश्न असतात. ज्योतिषशास्त्र या प्रश्नांविषयी काय सांगतं? आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. प्रत्येकालाच आपला विवाह केव्हा व कुठे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपला जोडीदार कसा असेल, तो काय करत असेल, त्याची शारीरिक- मानसिक- आíथक क्षमता कशी असेल. कुंडलीतील सातव्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते, कारण सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान मानले गेले आहे. परंतु लग्न पाहत असताना कुंडलीतील १, २, ५, ७ या स्थानांचा विचार करावा. किंवा अशा ग्रहांचा विचार करावा लागतो की, ज्यांच्या दशा अंतर्दशात विवाह होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत शुक्र व मुलींच्या बाबतीत गुरू ग्रहाच्या दशा अंतर्दशेत विवाह होऊ शकतो. जोडीदार कुठला असेल याचा विचार करायचा, तर पत्रिकेत १-४ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जन्मस्थानापासून २५ कि.मी.च्या दरम्यान जोडीदार असेल. ५-७ या स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परिचित, ओळखीचा अथवा नात्यातील असेल. ८-११ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार व्यवसाय अथवा नोकरीनिमित्ताने ओळखीचा असेल. ९-१२ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परदेशात राहणारासुद्धा असू शकतो. गोचरी गुरू लग्नी तिसऱ्या पाचव्या अथवा अकराव्या स्थानात येतो त्यावर्षी लग्न होण्याची शक्यता जास्त असते, परंतु त्यावेळेस शनीची दृष्टी लग्नावर किंवा सप्तमावर नको. अडचणी येतात. जन्म राशीवरून गोचरी राहूचे भ्रमण असताना लग्न होण्याची शक्यता असते. शनी व गुरू गोचरी केंद्रात येतील त्यावेळेस लग्न होण्याची शक्यता असते. मुलांच्या कुंडलीत गोचरी गुरू जेव्हा चौथ्या स्थानी येतो त्या वेळेस विवाह होण्याची शक्यता असते. गोचरी बुध व शुक्र दुसऱ्या अथवा सातव्या स्थानात येतो त्यावेळेस विवाह होण्याची शक्यता असते. माहिती संकलन. श्री दीपक कुळकर्णी.

विवाह आणि ज्योतिषशास्त्र

लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना. त्यामुळे आपले लग्न कधी होईल, कुणाशी होईल
लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना. त्यामुळे आपले लग्न कधी होईल, कुणाशी होईल, कसे होईल याविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रश्न असतात. ज्योतिषशास्त्र या प्रश्नांविषयी काय सांगतं?

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. प्रत्येकालाच आपला विवाह केव्हा व कुठे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपला जोडीदार कसा असेल, तो काय करत असेल, त्याची शारीरिक- मानसिक- आíथक क्षमता कशी असेल. कुंडलीतील सातव्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते, कारण सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान मानले गेले आहे. परंतु लग्न पाहत असताना कुंडलीतील १, २, ५, ७ या स्थानांचा विचार करावा. किंवा अशा ग्रहांचा विचार करावा लागतो की, ज्यांच्या दशा अंतर्दशात विवाह होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत शुक्र व मुलींच्या बाबतीत गुरू ग्रहाच्या दशा अंतर्दशेत विवाह होऊ शकतो.

जोडीदार कुठला असेल याचा विचार करायचा, तर पत्रिकेत १-४ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जन्मस्थानापासून २५ कि.मी.च्या दरम्यान जोडीदार असेल. ५-७ या स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परिचित, ओळखीचा अथवा नात्यातील असेल. ८-११ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार व्यवसाय अथवा नोकरीनिमित्ताने ओळखीचा असेल. ९-१२ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परदेशात राहणारासुद्धा असू शकतो.

गोचरी गुरू लग्नी तिसऱ्या पाचव्या अथवा अकराव्या स्थानात येतो त्यावर्षी लग्न होण्याची शक्यता जास्त असते, परंतु त्यावेळेस शनीची दृष्टी लग्नावर किंवा सप्तमावर नको. अडचणी येतात. जन्म राशीवरून गोचरी राहूचे भ्रमण असताना लग्न होण्याची शक्यता असते. शनी व गुरू गोचरी केंद्रात येतील त्यावेळेस लग्न होण्याची शक्यता असते. मुलांच्या कुंडलीत गोचरी गुरू जेव्हा चौथ्या स्थानी येतो त्या वेळेस विवाह होण्याची शक्यता असते. गोचरी बुध व शुक्र दुसऱ्या अथवा सातव्या स्थानात येतो त्यावेळेस विवाह होण्याची शक्यता असते.

माहिती संकलन. श्री दीपक कुळकर्णी.

No comments:

Post a Comment