ब्राह्मणाचे आठ प्रकार
१) मात्र
२) ब्राह्मण
३) क्षोत्रिय
४) अनूचान
५) भ्रूण
६) ऋषिकल्प
७) ऋषि
८) मुनी
मात्र : जो ब्राह्मण कुळात जन्मला असून उपनयन संस्कार व वैदिक कर्मांना पारखा आहे.
ब्राह्मण : व्यक्तिगत स्वार्थाला टाकून जो आचाराने विचारांचे पालन करतो, जो सरळ, एकान्तिय, सत्यवादी, दयाळू आहे.
क्षोत्रिय : जो वेदाच्या कोणत्याही एका शाखेचा सहा वेदांगासहित अभ्यास करतो, तो धर्मज्ञ विप्र, सदाचारी असा ब्राह्मण.
अनूचान : जो वेद आणि वेदांगांचा पूर्ण तत्त्वज्ञ असून पापरहित, शुद्धचित्त, आणि श्रेष्ठ असतो, असा क्षोत्रिय ब्राह्मणाला शिकविणारा विद्वान.
भ्रूण : अनूचानाचे समग्र गुण धारण करणारा, केवळ यज्ञ व स्वाध्यायात रमणारा, यज्ञनिष्ठ अन्नाचे भोजन करणारा, इन्द्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा.
ऋषिकल्प : संपूर्ण वैदिक व लौकिक विषयांचे ज्ञान प्राप्त करून, मन व इंद्रियांवर विजय मिळवितो आणि आश्रमातच नित्य वास करतो.
मुनी : जो ब्रह्मचारी असून नियमित व अत्यल्प भोजन करतो. सदेरहित आहे, शाप आणि वर या दोन्हीचे सामर्थ्य ज्या ठायी आहे, जो सत्यप्रतिज्ञ असून आत्मसाक्षात्कारी ज्ञाता आहे, ज्याने कामक्रोध जिंकले आहेत, जो ध्याननिष्ठ, निष्क्रिय म्हणजे अनासक्त, जितेन्द्रिय आणि माती - सोन्याला समान मानणारा असा जो श्रेष्ठ.
या आठांची गुणवत्ता चढत्या श्रेणीने आहे.
अशा प्रकारे वंश, विद्या आणि वृत्त (सदाचार) यांनी परिपूर्ण तो "त्रिशुक्ल" होय.
!"अष्टैब्राह्मणान सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति "
ऋषीची व्याख्या -"ऊर्ध्वरेताः तपस्युग्रो नियताशी न संशयः । शापानुग्रहयोश्शक्तः सत्यसन्धो भवेदृषिः ।।"
अर्थात , ऊर्ध्वरेता(योगसाधनेने वीर्य ज्याचे पतन होत नाही असा), उग्र तपस्वी, नियत आहार घेणारा, शाप व अनुग्रह करण्यास समर्थ, सत्याचरणास बद्ध अशा व्यक्तीस ऋषी असे म्हणतात.
No comments:
Post a Comment