Sunday, 5 October 2025
अंबाजोगाईची आरतीदंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई,भवानी अंबाजोगाई।भावभक्तिने तुला आरती योगेश्वरी आई,गात मी योगेश्वरी आई।।ध्रु।।दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू,माते तुजला ओवाळू।सत्कर्मांचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळू।।तव पदकमलीं लीन निरंतर,पाव झणी माते,मजला पाव झणी माते।धावत येई अघराशींचा नाश करायाते।।सद्भावांच्या फुलवेलीवर भक्तिफुले आली,माते भक्तिफुले आली।वेचुनिया ती तव पदकमली प्रेमे अर्पियली।।तुझ्या कृपेने दैन्य दुःख मम लोपुनिया गेले,वरदे सौख्य घरा आले।शांतिसुखाने मानस माझे आनंदित झाले।।योगेश्वरि मम कुलस्वामिनी आशीर्वच द्यावा,माते आशीर्वच द्यावा।तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा।।नारायण नतमस्तक चरणी,प्रार्थितसे आई,प्रेमे प्रार्थितसे आई।हृदयमंदिरी वास कराया,यावे लवलाही।।
Subscribe to:
Comments (Atom)