Wednesday, 30 July 2025
" जानवे " जानव्या संबंधित ५ प्रश्न?१) जानवे म्हणजे नेमके काय?२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात का आणी कसे आले?३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे?४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?५) जानवे घातल्याने होणारे याचे फायदे कोणते?ह्याची उत्तरे तूम्हाला माहित. नसेल तर, नक्की वाचा!१) जानवे म्हणजे नेमके काय ?जानवे हे हिंदू धर्मातील प्रत्येक पुरुष व्यक्तींच्या व्यवच्छेदक चिन्हांपैकी एक चिन्ह मानले जाते. जानव्याला यज्ञोपवीत, ब्रह्मसुत्र, यज्ञासुत्र, जनेऊ अशा विविध संज्ञा आहेत.जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत म्हणजे जानवे अशी व्याख्या केली जाते.जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात. तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून एक विशिष्ट गाठ(ब्रह्मगाठ) "ग्रंथी " मारली म्हणजे जानवे तयार होते. अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात. सुतावरुन स्वर्ग गाठणे ह्या मराठी म्हणीतील सूत (बासूत्र ) ते हेच.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना व धारण करताना विशिष्ट मंत्र म्हणतात, तो कोणता ते पुढे जाणून घेऊ. तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात. जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात.यज्ञोपवितामध्ये तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदरांचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सुक्षमतंतू असे नऊ पदर म्हणजेच तंतू असतात. जानव्यातील एकूण ९ तंतूंपैकी• पहिल्या तंतूवर ओमकार असतो.• दुसर्यावर अग्नी असतो.•तिसर्यावर नवनाग असतो.• चौथ्यावर सोम असतो.• पाचव्यावर पितर असतो.• सहाव्यावर प्रजापती असतो.• सातव्यावर वायू असतो.• आठव्यावर यम असतो.• नवव्यावर विश्वदेव असतो.असे नऊ सुत्रिंचे (तंतू) तीन पदर म्हणजेच – •सत्व•रज•तम• हे तिन गुण.हे तीन गुण असलेल्या दोर्याच्या ९६ आंगुळे इतक्या लांब दोऱ्याचे जानवे बनलेले असावे.(जानवे ९६ बोटे लांब असावे असा शास्त्रात उल्लेख आहे.)शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चारअंगुळे )लांबी असलेल्या सूतास, कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून, त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते.जानव्यावर जी "ब्रह्मगाठ" मारली असते, ती अद्वैताची गाठ म्हणजेच “जिव व ब्रम्ह एकच आहे” हा सिद्धांत.चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे “जिवो ब्रम्हैव ना पर” हिच शिकवण देतात.माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात.तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नाचा हारू न फेङितले दिनकरू प्रकाश जैसा ज्ञाने.यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू हा मुख्य धागा होय. देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात.तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे.यज्ञोपविततील तीन मुख्य पदर पुढील त्रयींचे प्रतिनिधित्व करतात.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे तीन आश्रम;गार्हपत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय हे तीन अग्नीसत्व, रज, तम हे तीन गुणपृथ्वी, अंतरीक्ष, दृह्यू हे तीन लोकखांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते.३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते.जानव्याच्या सुताची लांबी ९६ चौंगे असण्यामागे काही कारणे आहेत, ती अशी –प्रथम कारण – चतुर्वेदेषु गायत्री चतुर्विन्शत्येकाक्षरा | तस्मात् चतुर्गुणं कृत्वा ब्रह्मसुत्रं मदिरयेत् ||म्हणजे:-२४ अक्षरयुक्त गायत्री चारही वेदांमध्ये आलेली असल्यामुळे त्यानुसार ब्रह्मसुतांची लांबी (२४×४=९६) ९६ असते.दुसरे कारण म्हणजे –तिथि वार च नक्षत्र तत्ववेद गुणान्वितम् । कालत्रयम् च मासाश्च ब्रह्मसूत्र हि षण्णाव ||म्हणजे :-४ वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद )+ ३ काळ +२५ तत्वे (प्रकृती, पुरुष, महतत्व, अंहकार, पंच महाभुते,पंच विषय, पंच ज्ञानेद्रिय, पचं कर्मेद्रिय, मन) +३ गुण ( सत्व, रज, तम ) +१५ तिथी +७ वार +२७ नक्षत्रे +१२ महिने = ९६;ह्या सर्वांच्या बेरजेनुसार लांबी ९६ येते.तीसरे कारण म्हणजे –सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुलांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्याची सरासरी ९६ अंगुळे येते.हिंदू धर्मात एकूण १६ संस्कार आहेत. ते असे:-1. भूमिका2. गर्भाधान संस्कार3. पुंसाधन संसकार4. सीमन्तोन्नयन5. जातकर्म6. नामकरण संस्कार (बारसे)7. निष्क्रमण8. अन्नप्राशन संस्कार (बोळव)9. मुंडन/चूड़ाकर्म संस्कार (जावळ)10. विद्यारंभ संस्कार11. कर्णवेध संस्कार (कान टोचणे)12. यज्ञोपवीत /उपनयन संस्कार (मुंज)13. वेदारंभ संस्कार14. देशात संस्थार15. समावर्तन संस्कार16. विवाह संस्कारअन्त्येष्टि संस्कार आणि श्राद्ध संस्कारयांतील एका संस्कारात जानव्याचा उल्लेख केलेला आढळतो.पण, वर्णन केलेला उपनयन संस्कार / मौंज म्हणजे नेमके काय?गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, मौंज, व्रतबंध किंवा मौंजीबंधन असेही म्हणतात. गुरूंच्या जवळ राहून, ब्रम्हचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध होय. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. पहिला जन्म आई-बाबांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापसून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात कसे आले?प्राचीन काळी जेव्हा यज्ञाविधी किंवा कर्मकांड केले जात असे, तेव्हा विधी करणाऱ्याच्या शरीराच्या वरच्या भागावर ‘उत्तरीय’ पांघरलेले असावे, असा नियम होता. हे उत्तरीय डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या काखेखालून घेतले जात असे. प्राचीन काळी क्षत्रिय देखील यज्ञाविधि करायचे, त्या मुळे तेही ‘उत्तरीय’ पांघरत असत. पण तेव्हा हे उत्तरीय फक्त विधी चालू असताना पंघरणे बंधनकारक होते. नंतर ते काढून ठेवले तरी चालायचं. मनुष्य प्राणी वस्त्रहीन जन्माला येतो. आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे तो प्राण्याप्रमाणे वावरू शकतो. परंतु माणसाकडे संस्कृतीचा वारसा आणि जबाबदारी असते, म्हणून प्रौढत्त्वाकडे आणि स्वायत्ततेकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणून उपवस्त्र अर्थात् वरून घालायचा कपडा दिला जात असे. उपनयन अर्थात् मुंज हा तोच प्रकार आहे.मुंजीनंतर सदैव उपवस्त्र परिधान करावेच लागते. अंतर्वस्त्राशिवाय तर मुळीच वावरता येत नाही. मुंज झाल्यापासून “सत्यं वद। धर्म चर।” या आदेशाचे पालन अत्यावश्यक, मुंजीच्या आधीची सगळी पापे माफ असतात असे मानतात ते त्यासाठीच हा प्रकार फक्त हिंदुतच नव्हे तर जरतुष्टी (पारशी), ज्यू, आफ्रिकेतील मसाई अशा इतर समाजांतही असतो. जर तुष्टी (पारशी) धर्म हा वैदिक धर्माच्या जवळचा धर्म आहे. वैदिकांत ज्याप्रमाणे उपनयन हा द्वितीय जन्म मानला जातो आणि त्यावेळी बटूला यज्ञोपवित आणि मेखला दिली जाते, जरतुष्टी धर्मात नवजोत (नवीन जन्म) हा विधी असतो ज्यात बटूला सदरा (उपवस्त्र) आणि खुश्ती (मेखला) दिली जाते. ज्यू धर्मात मुलाच्या १३व्या वर्षी त्यावर बार मित्स्वा हा संस्कार केला जातो. वडील मुलाला तालित नामक शाल देतात जी धार्मिक विधी करताना डोक्या आणि खांद्यावरून ध्यायची असते, ह्या संस्कारानंतर मुलग्याचा पुरूष झाला असे समजले जाते. प्राचीन रोमन समाजात स्वतंत्र पराधीन/गुलाम नसलेल्या रोमन नागरिकाचा मुलगा १२-१३ वर्षांचा झाला की त्याल्या त्याचा पहिला तोगा (Toga) नामक लोकरी शाल दिली जात असे.जानव्याप्रमाणेच हा तोगा डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून असा घ्यायचा असतो. धार्मिक कार्यात तोग्याला विशेष महत्व असे. यज्ञ, बळी आदि धार्मिक विधी करताना यजमान त्याचा एक भाग आपल्या डोक्यावर घेत. रोमच्या पवित्र शहराच्या वेशीच्या (Pomerium) आत प्रत्येक रोमन नागरिकाने किमान सार्वजनिक ठिकाणी तरी तोग्याशिवाय फिरू नये असा प्रघात होता. याउलट रोमनेतरांनी आणि गुलामांनी तोगा घालू नये असा देखील नियम होता.आपल्या देशातील उष्म हवामान परिस्थितीमुळे आणि यज्ञकुंडाजवळ बसून राहावे लागत असल्याने ते दिर्घ काळ पांघरून ठेवणे कठीण होत असे. मग त्यावर पर्याय म्हणून तीन धाग्याचे प्रतिकात्मक उत्तरीय म्हणून जानवे किंवा यज्ञोपवीत अस्तित्वात आले.पुढे कालौघात ब्राह्मण जानवे सर्वकाळ घालू लागले आणि ते मग पुढे ब्राह्मण जातीचे प्रतीक बनले.रोमन सम्राट आणि महान तत्त्वज्ञानी पार्कस् ओरेलिअर ला बळी देताना अग्नि समक्ष उभ्या यजमानाने तागा डोक्यावरून घेतला आहे तर यजमानाच्या मागच्या माणसाने तो सामान्यपणे घातला आहे. कुह्राड धरलेला दास मात्र उघडा आहे.महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट ही त्याच्याशीच संबंधित आहे. द्रौपहीचे वस्त्रहरण म्हणजे बलात्काराचा प्रकार असा आजच्या काही लोकांत समज आहे. परंतु त्या काळी वस्त्रहरणाचा अर्थ वेगळा होता. दोन्ही बाबी लज्जास्पद आहेत पण आपण आपल्या आजच्या संदर्भात मूळ अर्थ पाहू शकत नाही. द्रौपदीला जेव्हा सभेत आणले जाते तेव्हा ती पाहते की पांडव बंधु स्वतः उपवस्त्राशिवाय बसले आहेत म्हणजे ते द्युद्धात आपले स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. आजच्या काळात साडी एका कापडाची असते, पण त्या काळी उत्तरीय (ओढणी) आणि अंतरीय (धोतर किंवा परकर) असे दोन प्रकार असत. वस्त्रहरणात द्रौपदीचे उत्तरीय खेचून घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडक्यात तिला गुलामासारखी वागणुन देण्याचा प्रयत्न केला. गेला नंतर दुर्योधन स्वतःची डावी मांडी थोपटतो. डावी मांडी ही पत्नीसाठी असते. उदाहरणार्थ: रामरक्षेत आलेले “वामाङ्कारूढसीता” अर्थात् रामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीता थोडक्यात कुठे त्या पांडवांसोबत गुलाम बनतेस? माझी पत्नी बन. एखाद्या स्त्रीसाठी आणि विशेषतः राजकुळातील स्त्रीसाठी हा घोर अपमान आहे. पण तो आजच्या काळी बलात्कार नाही. पण त्या प्रकरणातून उपवस्त्राचे त्या काळच्या समाजमानसातील महत्त्व दिसून येते. आजच्या काळातही आपण कोणाचा सत्कार करायचा झाला तर शाल किंवा उपरणे देतो.पण,फक्त ब्राह्मण लोकच जानवे घालतात का? नाही,काही लोकांचा असा गैरसमज आहे की ब्राह्मण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी जानवे घालतात. वास्तव मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. पूर्व वैदिक काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण अस्तित्वात होते. वैश्य ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास तो विश् (अर्थात् गाव) या शब्दावरून येतो असे दिसते. वैश्य म्हणजे गावकरी, अर्थात् जनसामान्य ह्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांनाही उपवस्त्राचा (जानव्याचा) अधिकार होता. उत्तर वैदिक काळात जसा समाज अधिक जटिल होते गेला तशी वैश्य समाजाची विभागणी झाली, आणि त्यातून वैश्य (व्यावसायिक) आणि शूद्र (कामगार) समाजाची निर्मिती झाली. हा प्रकार नैसर्गिक आहे आणि तो इतर समाजांतही झालाचे आढळते. युरोपात औद्योगिकरणाच्या काळात भूतपूर्व शेतमजूर समाजाची औद्योगिक आणि मजूर समाजांत विभागणी झाली. शूद्र समाजाचे मूळ हे नक्की सांगता येणे कठीण आहे, पण ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या भागात तरी शूद्रांचा उल्लेख सापडत नाही. तो पहिला दिसतो तो पुरुषसुक्तात, जे फार नंतर रचले गेले. असो. नंतरच्या काळात ब्राह्मणेतर समाजात जानवे घालण्याचे प्रमाण कमी होत गेले. पण वैदिक अनुष्ठानाने हाच पेशा असल्यामुळे ब्राह्मणांत ते तसेच राहिले. आजच्या काळात जेव्हा ब्राह्मण इतर व्यवसायांकडे वळले आहेत, ब्राह्मण समाजातही जानव्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. अनेक प्राचीन देवालयांच्या मूर्तीत देव, दानव, ब्राह्मण, राजे, जनसामान्य, स्त्री देवता सगळेच जानवी घातलेले दिसतात.३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे ?जानवे कसे घालावे त्या विषयी शास्त्र संकेत असा की, ब्रह्मचार्याने एक आणि गृहस्थ व वानप्रस्थिय ह्यांनी दोन जानवी घालावी.उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो.ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. ब्रह्मचाऱ्याने एक, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हटले आहे.प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत. तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हटले आहे. ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दोऱ्याचे आणि वैश्याने बकऱ्याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे. (मनू २.४४)तसेच जानवे बदलत असताना देखील एक मंत्रोपचार सांगितला आहे:-एतावद् दिन पर्यंन्तं ब्रह्मं त्वं धारितं मया |जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सुत्र यथा सुखम् ||म्हणजे:-हे यज्ञोपवीता, आजपर्यंत मी तुला धारण केले. पण, आता तुझ्या जिर्ण होण्यामुळे मी तुला त्यागत आहे.४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?जानवे डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात.पण,जानवे डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंस च उतरते का घालायचे?वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!परब्रह्मोपनिषद – १०ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताची मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहेकृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलले जाते. जानवे धारण केल्याशिवाय अन आणि पाणी ग्रहण केले जात नाही.आंघोळीच्या वेळेस जानवे खांद्या वरुन खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करावे.याज्ञवल्क्य ने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हटले आहे. यज्ञोपवितातील लांबी जास्तीतजास्त कमरे पर्यंत असावी आणि कमीतकमी बेंबीपर्यंत असावी. ही लांबी उपरोक्त प्रमाणात यावी म्हणूनच यज्ञोपविताच्या मुख्यसुताची लांबी ते धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगुलीप्रमाणानुसार असावी असे शास्त्र सांगते.ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे. जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनी जानवे बदलावे असे शास्त्र सांगते.निवीती दक्षिणकर्ने यज्ञोपवितं कृत्वा मुत्रपुरीषे विसृजेत ह्या शास्त्र वचनानुसार शौचसमयी व मूत्र विसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक आहे.आपली अशुचि अवस्था सूचीत करण्यासाठी देखील ही कृती उपयोगी पडते.शौचालयास जाऊन आल्यावर हातपाय धुऊन चुळा भरल्यावर मगच जानवे कानावरुन काढावे.रजस्वला, ओळी बाळंतीण, मृतदेह, चीतकाष्ठ, चिताधूम ह्यांचा शरीराला स्पर्श झाला असेल तर शितोदकाने सचैल स्नान करून अभिमांत्रित करून नवीन जानवे घालावे आणि पूर्वीचे विसर्जन करावे. एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनंतर जानवे बदलावे असा नियम सांगितला आहे.मुत्रविसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक सांगितले आहे.मग हातपाय धुवून चुळ भरल्यावर जानवे कानावरून काढावे. ह्या मागे शास्त्रीय कारण असे की शरीराचा नभी प्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र आणि खालचा भाग अपवित्र मानला गेला आहे.५) जानवे घातल्याने होणारे फायदे कोणते? शौचालयात जाताना हेच जानवे कानाला लावायचीही रीत आहे. कानाला जानवे दोन वेळा लपेटून घेतले तर कानाच्या दोन नसा ज्या पोटाच्या आतड्यांशी संबंधित असतात त्या जागृत होऊन अपचनासारखे विकार दूर होतात हा एक शास्त्रीय फायदा आहे.ॲसिडिटी, पोटाचे विकार, ब्लड प्रेशर आणि इतकंच नाही, तर हृदयरोग या क्रियेमुळे दूर राहू शकतात.मूत्र विसर्जन करताना डाव्या कानाला जानवे लपेटून ठेवल्यामुळे शुक्र बिजांचे रक्षण होते असंही म्हटलं जातं.ज्या पुरुषांना स्वप्रदोषासारखे विकार आहेत त्यांनी कानाला जानवे लपेटून झोपले तरीही फरक पडू शकतो.एकदा जानवे गळ्यात घातले की, माणसाचे विचार, आचार बदलून ते शुद्ध होतात. त्याच्या शब्दांमध्ये माधुर्य येते.आदित्य, वसू, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल, प्रभुती देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने केवळ स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते.उजव्या कानाला सुत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो हे आयुर्वेदशास्त्र दृष्ट्या सिध्द झालेले आहे..तात्पर्य:- केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने यज्ञोपवीत घालणे हे उपकारक असल्यामुळेही यज्ञोपवीत सदा धारण केलेले असावे.
Saturday, 19 July 2025
Copy pasteस्थिर चित्त स्तोत्र :-सध्या आजूबाजूला अनेक विचित्र घटना घडत आहेत. स्पर्धेच्या युगात अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत . दरवेळी अपेक्षापुर्ती होत नाही . अशावेळी मन स्थिर रहाणे ही अवघड गोष्ट झाली आहे. त्यासाठी खालील स्तोत्र उपयोगी पडू शकेल .----------------------------------------------------------------------------- मन स्थिर करण्यासाठी जपावयाचे स्तोत्र -🚩🔸श्री दत्त स्तोत्र 🚩🔸||1||अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते | सर्व देवाधिदेवत्वं मम चित्तंस्थिरि कुरु !! ||2||शरणागत दिनार्त तारका-खिलकारक | सर्व चालक देवत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !! ||3|| सर्व मंगल मांगल्ये सर्वाधि व्याधी भेषज |सर्व संकट हारिनत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||4|| स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशन: | भुक्ति मुक्ति प्रद: सत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||5|| सर्वपापक्षयकरस्ताप दैन्य निवारन: |यो-भीष्टद :प्रभु :सत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !!||6|| य एतत्प्रयत : श्लोक पंचकंप्रपठेत्सुधी : | स्थिर चित्त : स भगवत्कृपा पात्रं भविष्यति ||6|| इति श्री .प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतिविरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् |☄☄☄🌾🌾☄☄☄🌟हे स्तोत्र अतिशय प्रभावी असून या स्तोत्र पठनाने चित्त एकाग्र होते🌟🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🌞श्री गुरुदेव दत्त🌞अनसूया अत्रिपासून संजात ! दत्तात्रेया तू महाबुध्दिमंत !सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात ! माझे चित्त करी स्थिर !! १ !!शरण आलेल्यांचा जगात ! दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात !सर्वचालक देवा तू त्वरित ! माझे चित्त करी स्थिर !! २ !!सर्व मंगलाचे मंगल पावन ! सर्व आधिव्याधींचे औषध महान !सर्व संकटांचा हर्ता तू शोभन ! माझे चित्त करी स्थिर !! ३ !!स्मरताक्षणी स्वभक्तांना ! भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना !भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना ! माझे चित्त करी स्थिर !! ४ !!सर्व पापांचा क्षय करी ! ताप दैन्य सारे निवारी !अभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी ! माझे चित्त करी स्थिर !! ५ !!जो हे श्लोक पंचक वाचतील ! नित्यनेमें नियम चित्त निर्मळ !स्थिर चित्त तो होईल ! भगवतकृपापात्र जगती !! ६ !!इति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् !!
Subscribe to:
Posts (Atom)