Sunday, 11 September 2022
पारंपारीक आरती “शामलवर्णा … सुरू झाली की ( ९० व्या वर्षी )वडिलांमध्ये वेगळीच उर्जा संचारते… 🙏🙏🙏श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी ।भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी ।तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥कैटभ चाणुर कंसादिक हें शौर्ये वधिले अमित अरी ।नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी ॥अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी ।दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥ २ ॥
Wednesday, 7 September 2022
🙏🙏मला असे वाटते, प्रथम वर्ष वगळून दरवर्षी दोनपार्वणात्मक करता येते हे जरी खरे असले तरी करणारे एकदाच करतात, जिथे सकृन्महालय सुद्धा यथोक्त पद्धतीने कसातरी होतो. तिथे दरवर्षी भरणी श्राद्धाचा रडच आहे, त्यापेक्षा प्रथमवर्षी करण्याचा जो पक्ष आहे, त्याचेच अनुसरण करावे. त्यात अनायासे पार्वणात्मक अनुमासिके सुरु झालेली असतातच, त्यामुळे प्रेत शब्दाचा उच्चार नाहीच. मात्र संकल्प करताना कन्यागते सवितरि महलयपक्षे अद्य भरणीनक्षत्रे यमधर्मराजस्यकृपाप्रसाद सिद्ध्यर्थं ----गोत्रस्य---शर्मण: मम पितु: पितृलोक गमने मार्गस्थ समस्त दारुण यातना दु:ख निवारणपूर्वक स्वर्गस्थ समस्त सुखोपभोग प्राप्त्यर्थं मम पितु: भरणीश्राद्धं सदैवं सपिंडं साग्नौकरणं पार्वणेन विधिना चट ब्राह्मण रूपेण सद्य:करिष्ये।प्रत्यक्ष ब्राह्मण मिळाले तर उत्तमच. ह्या श्राद्धाचा और्ध्वदेहिकाशी किंवा अनुमासिकाशी काहीही संबंध नाही. हा एक माता/पित्याच्या मुक्तीसाठी एक अतिरिक्त श्राद्धप्रयोग समजावा एवढेच.अर्थात हे माझे व्यक्तिगत विचार आहेत.कुठल्याही ग्रंथातील काहीही संदर्भ लावू नये. ह्यायोगे वार्षिक घनाघन:क्षोभण:समाप्त होईल असे वाटते.*वे.हरिहरशास्त्री खांडेश्वर नागपूर* @Gkhandeshvar Harihar Dilli
Subscribe to:
Posts (Atom)